movers and packers business model sakal
संपादकीय

आपण सारे ‘मूव्हर्स-पॅकर्स’!

थोडं हसूही आलं होतं. काही वर्षांनी घर बदलताना मात्र मी हेच काम करणाऱ्या एका एजन्सीची मदत घेतली होती.

सकाळ वृत्तसेवा

- मयूर भावे

काही वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा ‘मूव्हर्स अँड पॅकर्स’ची पाटी वाचली होती. त्या वेळी असं कोणी तरी असू शकतं की, जे आपलं घर आवरून देतं, घरातलं सामान व्यवस्थित बांधतं आणि नव्या घरात ते ठेवतं यावर माझा विश्‍वासच बसला नव्हता.

थोडं हसूही आलं होतं. काही वर्षांनी घर बदलताना मात्र मी हेच काम करणाऱ्या एका एजन्सीची मदत घेतली होती. घर सोडण्याचा आपला दिवस निश्‍चित असतो आणि नव्या घरात प्रवेश करण्याचा दिवसही ठरलेला असतो. ‘मूव्हर्स अँड पॅकर्स’ ठरलेल्या दिवशी येतात, सगळं घर आवरतात आणि सगळ्यासकट आपल्यालाही नव्या घरात घेऊन जातात. वर्ष सरताना आपण अगदी हेच करतोय, नाही का?

वर्ष संपत आलं! खरं म्हणजे ‘सरलं’ हा शब्द अधिक योग्य ठरेल. या दिवसांत जे मिळवलं आणि गमावलं त्या सगळ्यासकट आता ठरलेल्या दिवशी जुनं घर सोडायचं आणि नव्या वर्षाच्या घरात प्रवेश करायचा. यात कठीण काय? ‘कठीण’ काहीच नाही. तसं सगळं सोपंच आहे, पण ते साधलं नाही, तर जरा ‘अवघड’ आहे इतकंच.

एका वर्षात आपण किती तरी गोष्टी ठरवतो. त्यातल्या बऱ्यापैकी प्रत्यक्ष करण्यासाठी नियोजन करतो. थोड्या फार होतात आणि काही मोजक्याच पूर्णत्वाला जाऊन पोहोचतात. ‘रोज व्यायाम करीन’ इथपासून ‘येत्या वर्षात नवीन घर, गाडी वगैरे घेईन’ असे अनेक संकल्प आपण करतो.

त्यावर त्या त्या वेळी गंभीर चर्चा आणि अगदी विनोदही करतो. बघता बघता वर्ष सरतं. नवं वर्ष दार उघडून स्वागताला सज्ज होतं. पुन्हा एकदा मनातलं, डोक्यातलं, उरातलं आणि डोळ्यांनी पाहिलेल्या स्प्नांमधलं सगळं काही ‘पॅक’ करून आपण ‘मूव्ह’ होतो.

‘हॅपी न्यू इयर’चे मेसेज पाठवण्यापासून ते प्रत्यक्ष फोन करून शुभेच्छा देण्यापर्यंत, घरगुती जेवणापासून लेट नाईट पार्टीपर्यंत, नव्या संकल्पाच्या ‘नोट्स’ काढण्यापासून जुने हिशोब लावण्यापर्यंत आणि ‘हे इंग्रजी वर्ष आहे, आपला काही संबंध नाही’ असं म्हणणाऱ्यांपासून रात्री १२ वाजता उत्साहात फटाके फोडणाऱ्यांपर्यंत....

अशा सगळ्यांना आपल्यासोबत घेऊन हेही वर्ष सरेल आणि नव्या वर्षाचा नवा सूर्योदय एक कोरा करकरीत कागद आपल्या हाती देईल. नाटक संपल्यावर रसिकांसमोर हात जोडून उभं राहणाऱ्या अभिनेत्यासारखी आपली अवस्था होईल.

आजचा खेळ संपला, तरी उद्याचा होणार असतोच. मात्र, आजच्यासारखा उद्या होईलच असं नाही, म्हणूनच त्याला ‘प्रयोग’ म्हटलं जातं. नवीन वर्षाचा नवा ‘प्रयोग’ यशस्वी होवो, हीच प्रार्थना!

सरतेशेवटी ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्करांची ‘उषःसूक्त’ नावाची कविता आठवते. चारच ओळीत त्यांनी हा क्षण नेमका पकडलाय. तसा विचार जमला, तर ‘पॅकिंग’ करणं कठीण वाटणार नाही आणि ‘मूव्ह’ होणं अवघड जाणार नाही. धामणस्कर म्हणतात -

कालचे सर्व गंगेचे

गंगेत सोडुनी दिधले

पात्रात निरामय नूतन

दे भोग आजचे सगळे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT