संपादकीय

पाहा जरा आफ्रिकेकडे ! 

प्रज्ञा शिदोरे

युरोपातील देशांमध्ये "कोरोना'चा प्रादुर्भाव वाढताना दिसल्यावर आफ्रिकेतील देशांनी ताबडतोब खबरदारीची पावलं उचलली. वेळेत सावध झाल्यामुळे आज जेव्हा ब्रिटन, अमेरिकेसारखे देश चाचपडताना दिसत आहेत, तेव्हा आफ्रिकेतले काही देश आता लॉकडाउन उठवण्याच्या तयारीत आहेत. 

"कोरोना'ला कोण कसे तोंड देतं आहे, याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. त्यातही सगळ्यांचं लक्ष युरोप आणि अमेरिकेकडे जास्त प्रमाणात लागलेलं असतं. पण आफ्रिकी देश याचा सामना कसा करीत आहेत, याचीही नोंद घ्यायला हवी. त्यादृष्टीनं या लेखातील छायाचित्र बोलके आहे. त्यातील उपकरणाचं नाव आहे "व्हेरोनिका बकेट'. घानामधल्या सार्वाजनिक आरोग्य विभागात काम करणाऱ्या व्हेरोनिका बेक्वो यांनी हे उपकरण "इबोला" साथीच्या वेळेला तयार केलं होतं. एक प्लॅस्टिकची कचरापेटी आणि त्याला जोडलेला हा नळ. खाली खराब पाणी साठवायला आणखी एक बादली. जिथे सहज नळाला पाणी येऊ शकत नाही, अशा ठिकाणीही हात धुता यावेत म्हणून केलेली ही साधी रचना. 

आज "कोरोना'चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पश्‍चिम आफ्रिकेतल्या खेड्यांमध्ये, शहरांमध्ये दुकानांसमोर या "व्हेरोनिका बकेट्‌स' ठिकठिकाणी दिसतात. यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक, जागतिक प्रश्नाला उत्तर हे स्थानिक पातळीवरचे बारकावे लक्षात घेऊनच द्यायला हवं आणि दोन, संकटं आपल्याला बरंच काही शिकवतात. आफ्रिकेला गेल्या कित्येक वर्षांत विविध साथीच्या रोगांनी ग्रासलेलं आहे. एचआयव्ही एड्‌स, हिवताप, एबोला, क्षयरोग यासारख्या रोगांवर इलाज करण्याची सवय इथल्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करणा-या मंडळींना खूपच आहे. म्हणून इतर युरोपातील देशांमध्ये "कोरोना'चा प्रादुर्भाव वाढताना दिसल्यावर आफ्रिकेतील देशांनी ताबडतोब खबरदारीची पावलं उचलली. वेळेत सावध झाल्यामुळे आज जेव्हा ब्रिटन अमेरिकेसारखे देशही चाचपडताना दिसत आहेत, तेव्हा आफ्रिकेतले काही देश आता लॉकडाउन उठवण्याच्या तयारीत आहेत. 

काहींचे देवाला साकडे 
अर्थात आफ्रिकेतील सगळ्या 54 देशांमध्ये परिस्थिती चांगली नाही. टांझानियाच्या अध्यक्षांनी सगळे  प्रयत्न देवावर सोडले आहेत! ते लोकांना चर्च किंवा मशिदींमध्ये एकत्र येऊन देवाची प्रार्थना करायला सांगत आहेत. उत्तर नायजेरियामधील कोनोमध्ये न्यूमोनियासदृश आजाराने थैमान घातलं आहे. केनयामध्ये संचारबंदीत बाहेर पडल्याबद्दल 12 लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे. इथे "कोरोना'मुळे झालेले मृत्यू आहेत 14. पण, दक्षिण आफ्रिकेत आता व्यवहार हळूहळू पूर्वपदावर यायला लागले आहेत. इथला लॉकडाउन कदाचित जगात सगळ्यांत कसोशीनं पाळला गेला असेल. याबरोबरचं केनिया आणि घाना या देशांनी सुरक्षित अंतर राखणे, काही काळ संचारबंदी, दळणवळणावर काही प्रमाणात बंदी आणि सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती अशा गोष्टी पाळल्या होत्या. हे दोन देशही आता आपले नियम शिथिल करत आहेत. 

पण सगळ्यांत महत्त्वाचं काम केलं इथल्या "आफ्रिकन सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन' या संस्थेनं. इबोलाच्या फैलावानंतर अस्तित्वात आलेली ही संस्था आफ्रिकेतील सर्व देशांच्या प्रयत्नांमध्ये सुसूत्रता आणते आहे. आफ्रिकेतील आकडे कमी असल्याचं कारण - तरुण जनता, लपवलेले आकडे असं असेलही किंवा ही केवळ सुरुवातही असेल. पण आफ्रिकन "सीडीसी"च्या प्रयत्नांच्या यशावरून तरी सध्या असं वाटत नाही. ही संस्था आता लाखो आरोग्य कर्मचा-यांच्या मदतीनं "कोविड' चाचण्या करणं, संसर्गाचा माग काढणं आणि रुग्णांवर उपचार करणं यासाठी संपूर्ण आफ्रिका खंडासाठी कार्यक्रम तयार करत आहे. 

यशाची दोन कारणं 
आफ्रिकेमधल्या या यशाची दोन कारणं आहेत. एक, साथीच्या आजारांनी समाजाची, अर्थव्यवस्थेची, पुढच्या पिढीची कशी हानी होऊ शकते, हे आफ्रिकेमधल्या देशांना माहीत आहे. आजपर्यंत एड्‌समुळे 1.5 कोटी लोकांचा जीव गेला आहे. दक्षिण आफ्रिका खाड्‌कन जागी होण्याचं हेच कारण आहे. एड्‌सचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केलेल्या दिरंगाईमुळे आज वीस वर्षांनंतरही त्याचे परिणाम या देशाला भोगावे लागत आहेत. याची पुनरावृत्ती होणं त्यांना परवडण्यासारखं नाही. काहीच वर्षापूर्वी एबोलानं आफ्रिकेत थैमान घातलं. एबोलाचा परिणाम इथल्या स्रियांवर सर्वाधिक झाला. कारण रुग्णांची शुश्रूषा करण्याच्या कामात आणि मृतांची विल्हेवाट लावण्याच्या कामात त्याच असायच्या. एबोलामुळे 2014 ते 2016 या दोन वर्षांमध्ये पश्‍चिम आफ्रिकेत 11,300च्या वर लोकांना मृत्यू झाला होता. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा आफ्रिकेमधील आपल्या कार्यपद्धतीत बदल केले. तातडीची मदत पोहचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला, चाचण्यांसाठी व्यवस्था बसवल्या आणि उपचारकेंद्रांची रचना बदलली. 

एबोला दरम्यान इथल्या सार्वजिक आरोग्य क्षेत्रात काम करणार-यांची चांगली तयारी झाली. मुख्य  म्हणजे इथल्या जनतेला साथीच्या रोगांची काय किंमत मोजावी लागते हे लक्षात आलं. 

आफ्रिकेला या रोगाची महिती थोडी आधी मिळाली होती. इथले नेते चीन, मग इटली, 
ब्रिटन आणि अमेरिकेची आरोग्यव्यवस्था पुरती कोलमडताना पाहत होते. त्यांना हे माहीत होतं, की आफ्रिकेत परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्यांची आरोग्यव्यवस्था कोलमडेलच; पण त्यानंतर त्यांना सावरताही येणार नाही. गमतीनं असं म्हणतात, की दक्षिण सुदानमध्ये व्हेंटिलेटरपेक्षा उपाध्यक्षच जास्त आहेत. इथे पाच उपाध्यक्ष तर चार व्हेंटिलेटर आहेत! त्यामुळे इथल्या देशांना तातडीनं पावलं उचलण्यावाचून काहीच पर्याय नव्हता. 

नायजेरियानं फेब्रुवारीपासूनच बाहेरच्या देशांमधून येणा-या लोकांच्या तपासण्या सुरू केल्या होत्या. रवांडानं आपल्या सीमा 19 मार्चला बंद करून टाकल्या. साधनसंपत्तीचा अभाव असल्यानं कल्पकता कामाला आली. युगांडानं सौरऊर्जेवर चालणारी ऑक्‍सिजन मशीन तयार केली. सेनेगलमध्ये जलद चाचण्या करण्याची पद्धत विकसित झाली, तर केनियामध्ये मास्क तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आला. आफ्रिकेत सगळं आलबेल आहे, असं नाही. पण आफ्रिका आता पुढच्या संकटाशी सामना करण्याच्या तयारीत आहे आणि ते म्हणजे बेरोजगारी आणि वाढत असलेली आर्थिक दरी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT