rishi sunak london politics Sakal
संपादकीय

ढिंग टांग : लंडन लेटर्स...! (मराठी तर्जुमा)

काहीतरी लिहिलेच पाहिजे, असे गेली दोन-चार दिवस वाटत आहे. त्याचे काय कारण असू शकेल?

ब्रिटिश नंदी

फ्रॉम द डेस्क ऑफ

ऑनरबल पीएम ऑफ इंग्लंड

१०, डाऊनिंग स्ट्रीट, लंडन.

डिअर मि. मोदीजी, माझे हे पत्र तुमच्या उत्तम आरोग्यपूर्ण हातात पडेल, अशी आशा आहे. खूप दिवसात आपली भेट नाही, आणि बऱ्याच दिवसात पेनाने काही लिहिलेही नव्हते. काय लिहावे? असा प्रश्न स्वत:लाच पाडून घेत मी मेजाशी बसलो.

काहीतरी लिहिलेच पाहिजे, असे गेली दोन-चार दिवस वाटत आहे. त्याचे काय कारण असू शकेल? असे मी आमचे प्रमुख बटलर मि. स्मिथ यांना विचारले. त्यांनी नकारार्थी मान हलवून ‘चहा आणू का?’ असे उलट विचारले. १०, डाऊनिंग स्ट्रीट हे इंग्लंडच्या पंतप्रधानाचे निवासस्थान पेपरलेस आहे, हे नम्रपणे इथे नमूद करता येईल.

दोन-चार दिवसांपूर्वी माझे मुंबईतील मित्र मि. यूबी थॅकरे आणि त्यांचे मित्र मि. रॉऊट यांची भेट झाली. ते सध्या लंडनमध्ये आले आहेत. मि. थॅकरे आणि माझी चांगली जानपछान आहे. आम्ही लंडनमध्ये वीकेंड एकत्र घालवला. या काळात त्यांनी मला खूप चांगले मार्गदर्शन केले.

‘‘तुम्ही ताबडतोब निवडणुका जाहीर करुन टाका, आपण तुमचंच सरकार घालवू,’’ असा सल्ला मला मि. रॉऊट यांनी दिला. मला तो पटला! वास्तविक माझ्या सरकारची मुदत पुढल्या वर्षी जानेवारीपर्यंत आहे. पण मी रॉऊटसाहेबांचे ऐकून चार जुलैला निवडणुका जाहीर करुन टाकल्या. कुणीतरी आमचे सरकार पाडण्याऐवजी आपणच ते पाडलेले काय वाईट? मि. रॉऊट अत्यंत जीनिअस गृहस्थ आहेत, असे माझे मत झाले आहे.

मि. थॅकरे आणि मि. रॉऊट यांचा सक्रिय पाठिंबा असल्यामुळे चार जुलैची निवडणूक आम्हीच जिंकणार, याबद्दल आता शंका उरलेली नाही. आमची आता ‘इंग्डिया’ आघाडी झाली आहे. या आघाडीतर्फेच आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

‘फेकून द्या हे ऋषी सुनक सरकार’ अशी स्लोगनदेखील मि. रॉऊट यांनी सुचवली आहे. दुर्दैवाने आमच्या इंग्लंडमध्ये निवडणूक चिन्हाची प्रथा नाही. नाहीतर मी मशालच हातात घेतली असती!! आमच्या कॉन्झर्वेटिव पक्षाचा रंग निळा आहे. तो भगवा करता येईल का, असे मि. रॉऊट विचारत होते. मी तसा अर्ज करण्याचा विचार करतो आहे. पण रंगबदलही आमच्याकडे तसा कठीण जाईल, असे दिसते. बघू!

मि. थॅकरे आणि मि. रॉऊट भेटले तेव्हा मी त्यांना ‘हाऊ इज मि. शिंदेजी डुइंग?’ असे सहज विचारले. मागल्या वेळेला शिंदेजी भेटले तेव्हा मी त्यांना ‘हाऊ इज माय फ्रेंड यूटी डुइंग’ अशी विचारणा केली होती. त्यावेळी शिंदेजी यांनी ‘ही इज फाइन’ असे उत्तर दिले होते. पण मि. थॅकरे यांनी अतिशय कडवट तोंड केले, आणि ‘मला नाही माहीत’ असे उत्तर दिले. नंतर बराच वेळ ते काहीतरी मराठीत पुटपुटत होते. ते शब्द मला कळले नाहीत. पण खोका आणि गद्दार हे दोन शब्द मात्र कळले. जाऊ दे.

तुमच्याकडल्या निवडणुकीचे निकाल चार जूनला लागणार आहेत, असे कळले. आधीच अभिनंदन करुन ठेवतो!! ‘चारशेपार’ची पार्टी तुम्हाला द्यावी लागणार, असे दिसते. मि. रॉऊट म्हणाले की मोदीजींना चारशे सोडा, चाळीस जागाही मिळणार नाहीत!!’’

आमची पैज लागली आहे. मी जिंकलो तर ते मला मुंबईत वडापाव खाऊ घालणार असून ते जिंकले तर मी त्यांना ‘फिश अँड चिप्स’ देईन. मला वडापाव मिळेल ना? कळावे, बाकी सर्व ठीक.

तुमचाच मित्र. ऋषी. (सुनक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT