सानेगुर्जी आणि नववाचकहृद्‌गत..! sakal
संपादकीय

सानेगुर्जी आणि नववाचकहृद्‌गत..!

पुण्यात विचारवंतांचा तुटवडा नाही. ‘रुपाली’ किंवा ‘वाडेश्वर’मधल्या चहा अथवा कॉफीच्या ग्लासासमवेत (होय, चहा-कॉफीचा ग्लासच!) आपली प्रज्ञा दाखवणारे अनेक विचारवंत भेटतील. परंतु, राजीव यशवंत साने हे तत्त्वचि वेगळे!!

सकाळ वृत्तसेवा

हौस ऑफ बांबू कु. सरोज चंदनवाले

न अस्कार! ज्याला आपण सर्वसाधारणपणे आनंदित झालेला म्हणतो, किंवा मनातील हर्षोल्लासाधारित भावनांचा जो काही कल्लोळ असतो, त्याचा सम्यक विचार केला तर माझ्या मनाची अवस्था काहीशी तशीच आहे, असं म्हणावं लागेल. पुण्यात विचारवंतांचा तुटवडा नाही. ‘रुपाली’ किंवा ‘वाडेश्वर’मधल्या चहा अथवा कॉफीच्या ग्लासासमवेत (होय, चहा-कॉफीचा ग्लासच!) आपली प्रज्ञा दाखवणारे अनेक विचारवंत भेटतील. परंतु, राजीव यशवंत साने हे तत्त्वचि वेगळे!!

अस्सल विचारवंत दिसे कैसा, राही कैसा, कैसा पाहे, याची अनुभूती घ्यायची असेल तर ज्येष्ठ विचारवंत-अभ्यासक स्वातंत्र्यवादी आणि प्रगतीवादी तत्त्वज्ञानी अखिल महाराष्ट्राचे इमान्वेल काण्ट किंवा शोपेनहाऊर (किंवा फॉर दॅट म्याटर प्लेटो, अरिस्टॉटल यांच्या नामवळीतले कुणीही-) जे की, श्रीश्री रा. य. साने यांची भेट घ्यावी. हा भेटीचा योग लवकरच येण्याची शक्यता आहे. याचे कारण नुकतीच एक आनंदाची बातमी समजली. येत्या एक ऑगस्टला आमच्या या सानेगुर्जींना यंदाचा विचारवंतांना दिला जाणारा ‘‘माणूस’कार श्रीगमा पुरस्कार’ एका ‘अनौपचारिक’ कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे. रा.चिं.ढेरे संस्कृती केंद्र आणि राजहंस प्रकाशन यांच्यावतीनं दरवर्षी एका विचारवंताला हा पुरस्कार दिला जातो. २०२९मध्ये श्रीगमा शताब्दिवर्षात शेवटला पुरस्कार दिला जाणार आहे. (इच्छुक विचारवंतांनी आत्तापासूनच जोर लावावा, ही विनंती.) असो.

सर्वसाधारण उंची. डोईवर जुन्या पौराणिक चित्रपटांमध्ये कृष्णाचे सवंगडी घालतात, तशा प्रकारची टोपी. हाताला लागेल तो पेहराव अशा अवस्थेत राजीव साने सतत तत्त्वज्ञानाविषयी (मनातल्या मनात) मंथन करीत असतात. उत्तम ब्लॉग लिहितात. फेसबुकवरही अगदी सक्रिय असतात. हे सगळं असूनसुद्धा पुस्तकंही लिहितात. नुकतंच त्यांचं ताजं पुस्तक हाती पडलं- ‘स्फूर्तिवादी नीतिशास्त्र…दमनाचे दुष्टचक्र सौम्य करत नेण्यासाठी’ पुस्तकाची टॅगलाइनच केवढी बोलकी आहे बघा!!

सानेगुर्जींच्या मते आज परिवर्तनाची चळवळ कुंठित झाल्याचं चित्र आहे. कोणत्याच नीतिशास्त्राचा धड आधार न घेतल्यानं ही स्थिती ओढवली असून अभिनव असे नीतिशास्त्र नव्यानं उभारावं लागणार आहे. या कार्याला राजीव साने एव्हाना लागलेसुद्धा आहेत. भविष्याला आश्वासक अशी एक नवी पायवाटच घालून देण्याचा प्रयत्न त्यांनी ‘स्फूर्तिवादी नीतिशास्त्रा’त केला आहे. मी पुस्तक घरी आणून ठेवलंय, पण अजून वाचलेलं नाही (हे उघडच आहे.) ही धीर एकवटून करायची गोष्ट आहे. ‘युगांतर’ पुस्तक आल्यानंतर त्याचा सुलभ सारांश सांगणारं आणखी एक पुस्तक आलं होतं. तसं काही होते आहे का, याची वाट पाहण्याचाही मोह होतोय. मागे एकदा त्यांचं ‘नवपार्थहृद्‍गत’ मिळवून वाचलं होतं. हे पुस्तक सरसकट कळणं कठीण आहे; पण काहीतरी विलक्षण वाचतो आहोत, अशी जाणीव मात्र होते. ‘नवपार्थहृद्‍गत’ हे सपद्य म्हणजेच काही काव्यरचनांसहित आहे. त्यातल्या वृत्तबद्ध काव्यरचना, अस्सल मराठी शब्दकळा वाचताना मन तुडुंब भरतं. लेखकाच्या दाव्यानुसार ती एक प्रदीर्घ-सपद्य-वाद-नाट्यछटा ठरते… पण काहीही म्हणा, हे पुस्तक वाचून प्रत्यक्ष भगवंतही या ‘नवपार्था’ला काय सांगावं याच्या संभ्रमात पडले असतील! असो.

रा. साने यांचं लिखाण वाचणं आम्हासारख्या नववाचकांसाठी अंमळ जडच प्रकरण. काही जड संज्ञांचे अर्थ ते पुस्तकाच्या शेवटी देतात म्हणून बरं. पण असं असलं तरी एखाद्या सिंहाच्या छाव्यानं प्रयत्न करुन पाहायलाच हवा. जमेल!हल्ली कोण नीतिशास्त्राच्या वगैरे भानगडीत पडतो? साने त्या भानगडीत पडले आणि पुस्तक लिहून मोकळे झाले. आता जबाबदारी वाचकाची!

तूर्त पुरस्काराबद्दल आणि नव्या पुस्तकाबद्दल सानेगुर्जींचं अभिनंदन आणि त्यांची पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या संस्थांचंही. (चाळीस हजार, मानचिन्ह आणि शाल असं पुरस्काराचं स्वरुप आहे,देवा!) रा. साने इतके निखळ विचारवंत आहेत की, दिवसातल्या काही घटका ते फडताळात बसून विश्वाची चिंता करीत असावेत, असा मला संशय येतो आहे... श्रीकृष्णार्पणमस्तु!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT