Amitabh Bachchan sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : मराठी भाषेचा जलसा...!

नअस्कार! जुहूच्या आलिशान परिसरात एक सुस्वरुप तरुणी भराभरा चालत निघाली होती. जुहूत अनेक सितारे राहतात. सदरील सुस्वरुप तरुणीला बघून सगळेच माना वेळावत होते.

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! जुहूच्या आलिशान परिसरात एक सुस्वरुप तरुणी भराभरा चालत निघाली होती. जुहूत अनेक सितारे राहतात. सदरील सुस्वरुप तरुणीला बघून सगळेच माना वेळावत होते. तरुणीच्या हाती कुठलासा पत्ता होता : श्रीयुत इन्कलाब श्रीवास्तव, जलसा बंगला, (जगविख्यात लेखक रा. विश्वास पाटील यांच्या निवासस्थानानजीक), जुहू-तारा रोड, जुहू.’

जवळ गेल्यावर त्या सुस्वरुप तरुणीच्या लक्षात आलं की, हा बंगला दुसऱ्या-तिसऱ्या कुणाचाही नसून साक्षात अमिताभ बच्चन यांचा होता. सुस्वरुप तरुणीस अदबीनं बंगल्यात प्रवेश देण्यात आला. आतमध्ये वर्दी देण्यात आली. ‘‘मराठीच्या बाई शिकवणीसाठी आल्या आहेत!’’

वाचकहो, या मराठीच्या बाई म्हणजे दुसरीतिसरी कोणीही नसून मीच होत्ये! स्टोरी अशी आहे की, गेल्या आठवड्यात मा. अमिताभ बच्चन यांना पं. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अमिताभ यांनी त्यांचं जीवनभराचं दुखणं रसिकांसमोर मांडलं. दहा वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात अमिताभ भाषणाला उभे राहिले, तेव्हा प्रेक्षकांतून कुणीतरी ओरडलं. ‘‘एऽ, एऽ,

मराठी...मराठी!’’ सलीम-जावेद या लेखकद्वयानं एकही डायलॉग मराठीत न लिहिल्यानं बच्चनजींचं मराठी कच्चं राहिलं. पण ‘मराठी बोलणं मुश्कील असलं तरी नामुमकीन नाही’ असा डायलॉक मारुन बच्चनजींनी मराठी शिकण्याचं कबूल करुन वेळ मारुन नेली.

परवा दीनानाथ पुरस्काराच्या वेळी त्या प्रसंगाची आठवण त्यांना झाली. ‘हल्ली बुढाप्यामुळे वेळ बराच मिळतो, सबब मराठी शिकणार आहे’ असं त्यांनी सांगून पुन्हा वेळ मारुन नेली!!

बच्चनजींना मराठी येत नाही. पण कविता मात्र करता येते, तीही मराठीत! हा घ्या वानोळा :

काळाच्या ज्वलंत वाळूवर अनवाणी चालत होतो...

पुढच्या पाऊलापलिकडे पाहण्यास अक्षम...

कारण काय की ते अशक्य होते...

वेळच नव्हता, वेळच नव्हता!

तेव्हा कर्तव्यच उद्देश होते,

आणि कर्तव्यच कर्म होते...

हेतु...कर्तृत्त्व...सिद्धी एकच होते...

अशा...त्या रणरणत्या उन्हात

आकाशाची सावली मला लाभली,

तिचं नाव...लता मंगेशकर!

...या काव्यपंक्तींमधली टिंबे आणि विरामचिन्हेही कविवर्य अमिताभजी बच्चनजी यांची आहेत. ज्या प्रतिभावंतास मराठी येत नाही, त्यानं मराठीत कविता केली, हा मराठीच नव्हे, तर कुठल्याही भाषेतला अपूर्व चमत्कार आहे, असं मला वाटलं.

बच्चनजींना हल्ली (बुढाप्यामुळे) बराच वेळ मिळतो. तो ट्विटरवर घालवण्यापेक्षा मराठी शिकण्यावर घालवावा, असं वाटल्यामुळे त्यांनी शिकवणीची जाहिरात दिली. माझ्यापेक्षा चांगली मराठीची टीचर महाराष्ट्रात कुठे मिळायला?

वही-पेन्सिल हाती घेऊन विद्यार्थी अमिताभ शिस्तीत येऊन दाखल झाले.

‘‘गुडमॉर्निग टीचर!’’

‘‘शुभ सकाळ, म्हणावं! नाव सांगा बरं!!,’’ मी.

‘‘विजय दीनानाथ चौव्हान, उमर पैंतालिस...आँय!’’ बच्चनजी. इथंही दीनानाथ पुरस्कृत नाव!! धन्य आहे!!

‘‘खरंखुरं नाव सांगा, हे कुठलं सिनेमातलं क्यारेक्टर?,’’ मी. हा खास कोथरुड (पुणे) पुरस्कृत ॲटिट्यूड!!

‘‘मला मराठी शिकायचं आहे!,’’ विद्यार्थी अमिताभ यांनी विनयानं सांगितलं.

‘‘जमेल, जमेल! आमीर खानही गेली वीसेक वर्षं प्रयत्न करतोय. अक्षयकुमार, जॉन अब्राहाम तर मराठी मालिकेत कामंबिमं मिळतायत का, ते शोधताहेत म्हणे!,’’ मी प्रोत्साहन दिलं. उद्यापास्नं नीट बाराखडी शिकू, असं सांगून मी निघाल्ये.

बंगल्याच्या बाहेर श्रीपाद भालचंद्र जोशी उभे होते. तेही शिकवणीला आले असणार! माझ्याकडे बघून ओशाळून म्हणाले, ‘‘अमिताभ मराठीत कविता करु लागला तर बरंच आहे. तेवढ्यामुळे तरी मराठीला अभिजात दर्जा मिळतो का ते पाहायचं!’’

मी सुस्कारा टाकला. पाहायचा एकेक प्रयत्न करुन, असं मनाशीच म्हणत हेतु, कर्तृत्व, सिद्धी एकच असल्यासारखी पावलं उचलत राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

Will Jacks Video: RCB चा शतकवीर मुंबई इंडियन्सने घेतला अन् आकाश अंबानी बंगळुरूच्या संघमालकांना थँक्यू म्हणून आला

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT