MNS Party sakal
satirical-news

ढिंग टांग : स्वबळावर नवनिर्माण...!

ब्रिटिश नंदी

दादू : (खट्याळपणे फोन फिरवत) म्यांव..म्यांव...!

सदू : (बेरकीपणाने आवाज बदलून) इस रुट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोडी देर बाद डायल कीजिए...!

दादू : (हिरमुसून) सदूराया, मी ओळखला तुझा आवाज!!

सदू : (जशास तसे..) त्यात काय, मीही ओळखला!!

दादू : (सारं काही विसरुन आनंदाने) हॅप्पी बर्थ डे! तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार! जीवेत शरद: शतम!! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!

सदू : (सौहार्दानं) थँक्यू!!

दादू : (मानभावीपणानं) आमच्या महाविकास आघाडीतर्फे मोठा पुष्पगुच्छ पाठवणार होतो, पण...नाही पाठवला!

सदू : (कोरडेपणानं) बरं केलं!

दादू : (मखलाशी करत) त्या महायुतीवाल्यांकडून तुला आलाच असेल ना?

सदू : (गुळमुळीतपणाने) तसे बरेच आलेत पुष्पगुच्छ! अजूनही येतील! पण कोणाचा कुठला कसं समजणार? पुष्पगुच्छातली सगळी फुलं सारखीच दिसतात!!

दादू : (ज्येष्ठत्वाच्या नात्यानं) कसाही असलास तरी माझाच भाऊ आहेस तू! पुढं काय करायचं ठरवलं आहेस? तुझ्या भविष्याची मला भारी काळजी वाटते! किती काळ असा एकांडा शिलेदार राहणार/चांगलीशी आघाडी बघून सामील हो! पुढे सगळं छान होतं! माझ्याकडेच बघ!!

सदू : (कडवटपणाने) तुम्हा आघाडी आणि युतीवाल्यांचं काही खरं नसतं! बोलता एक, करता एक!! मी काही कुणाकडे जागा मागायला जाणार नाही! द्यायच्याच असतील तर जागा, तर काही अटीशर्तींवर स्वीकारीन!!

दादू : (तोऱ्यात) कळू देत तरी तुझ्या अटी?

सदू : (कपाळाला आठ्या घालत) तुला कशाला सांगू? मला तुमच्यात यायचंच नाहीए मुळी!!

दादू : (संशयानं) याचा अर्थ तुझं त्या कमळवाल्यांसोबत काहीतरी गॉटमॅट झालंय!! खरं खरं सांग!!

सदू : (थंडपणानं) माझी कोणाशीही काहीही बोलणी झालेली नाहीत! करणारसुद्धा नाही! आमच्या कार्यकर्त्यांनाही मी सांगून टाकलंय! दोनशे-अडीचशे जागा लढवायचं ठरवतोय! मी सेटिंगवाला नाही, हे तुला माहितीये, दादूराया!!

दादू : (व्यवहारवादी सूर लावत) हे बघ, असा दुराग्रह करु नकोस! कुणीही घरी येऊन तुझ्या हातावर सत्तेचं गुळखोबरं देणार नाही! येणारे येतील, आणि मस्तपैकी जेवून परत जातील!!

सदू : (विचारात पडत) असं म्हणतोस?

दादू : (खुंटा हलवून बळकट करत) अर्थात! मी दोन्हीकडचे अनुभव घेऊन बसलोय!! ती कमळाबाई अतिशय मतलबी बाई आहे! बोल बोल म्हणता तुला गंडवेल, आणि तिसऱ्याच्याच गळ्यात गळा घालेल! त्या मानानं आमचे महाविकास आघाडीवाले सरळ मनाचे आहेत! जे काही मिळेल ते निमूटपणे वाटून खातात!! माझे खूप लाड लाड करतात! खूप चांगली माणसं आहेत...

सदू : (छद्मीपणानं) बराच लौकर झाला साक्षात्कार!!

दादू : (दातओठ खात) ...त्या नतद्रष्ट, खोकेबाज, विश्वासघातकी, गद्दारांसोबत तू मांडीला मांडी लावून बसणार, ही कल्पनाच सहन होत नाही मला!!

सदू : (एक दीर्घ सुस्कारा सोडत) मी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे! ‘एकला चलो रे’! कुणाच्याही नादाला न लागता मी एकटा मैदानात उतरेन! महाराष्ट्राची जनता नवनिर्माणाची वाट पाहात आहे! तिला मी किती काळ तिष्ठत ठेवू? हाच तो क्षण, हीच ती वेळ!

दादू : (हतबुद्ध होत) अरे, पण मतं कोण देणाऽऽर?

सदू : (निर्धाराने) महाराष्ट्राची जनता!

दादू : (अविश्वासाने) तू कोणाच्याच सोबत जाणार नाहीस? अगदी नक्की?

सदू : (करड्या आवाजात) मी कुणाचाच नाही! मी फक्त महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT