Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : रात्रीचे हलके भोजन...! (काही आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया)

जी -२० परिषदेच्या पहिल्या दिवशी व्हीआयपी पाहुण्यांना विशेष रात्रीभोजनाचे निमंत्रण होते. हा बडा खाना जगभर गाजला!

ब्रिटिश नंदी

जी -२० परिषदेच्या पहिल्या दिवशी व्हीआयपी पाहुण्यांना विशेष रात्रीभोजनाचे निमंत्रण होते. हा बडा खाना जगभर गाजला! या भोजनानंतर बहुतेक पाहुण्यांनी भारतीय व्यंजनांची वाहवा केली. ‘सबका साथ, सबको सुग्रास’ हे भोजनावळीचे घोषवाक्य होते. निवडक पाहुण्यांच्या या प्रतिक्रिया :

माय डिअर फ्रेंड मि. मोडी, सकाळी उशीरा उठलो. सबब आज परिषदेच्या ठिकाणी यायला थोडा उशीर होईल. काल रात्री आम्हा व्हीआयपी पाहुण्यांसाठी रात्री भोजनाचा थाट उडवला होता. अप्रतिम पदार्थ होते, त्याबद्दल धन्यवाद.

सीआयएचे गुप्तचर अमेरिकी राष्ट्राध्यक्षाला ‘पोटस’ या सांकेतिक नावाने संबोधतात, हे तुम्हाला माहीत असेलच. पोटाला तडस लागेपर्यंत जेवणारा प्राणी म्हणजे पोटस अशी व्याख्या असावी! रात्रीभोजनात चिक्कार पदार्थ होते. सुरवातीला नाश्त्याचे लाइट आयटेम सर्व्ह केले गेले. त्यातला एक पदार्थ बर्गरसारखाच दिसत होता. त्याचे नाव ‘मुंबई वडापाव’ असे सांगण्यात आले. मुंबईतले सगळेच लोक रोज दोन-दोन वडापाव खातात, अशी गोपनीय माहिती मला सीआयएच्या अधिकाऱ्याने दिली. म्हणून मीही दोन घेतले! त्या सीआयएच्या अधिकाऱ्याला मी आता शोधतो आहे. सापडला की लेकाच्याला...जाऊ दे.

सारांश एवढाच की आज जेवणाचा आग्रह कृपा करुन करु नये. मी आज परिषदेला रीतसर डबा घेऊन येणार आहे.

कळावे.

आपला जीवलग मित्र. (बापूसाहेब) बायडेन. अध्यक्ष, अमेरिका.

प्रिय श्रीमान मोदीजी, आमच्या लंडनमध्ये बरीच भारतीय (इंडियन म्हणायचं मी सोडलंय हं! काइण्डली नोट!!) हॉटेले आहेत. तिथे मी अधूनमधून भारतीय जेवण जेवायला सहकुटुंब जातो. घरीही भारतीयच पदार्थ खातो. महाराष्ट्राची पुरणपोळी मेनूमध्ये शोधत होतो-मिळाली नाही! आम्ही तुम्हाला वाघनखं देणार, आणि तुम्ही साधी पुरणपोळी देणार नाही, हे काही योग्य झाले नाही. तरीही जेवण चांगले होते. आज थोडा उशीराच येईन!

तुमचाच.

ऋषी सुनकाचार्य, पीएम, आंग्लभूमी (आम्हीही बदलतोय!)

हे मि. मोडीजी, गुमाँग माइट! फूड ग्रेट होतं. पण सगळं व्हेज... आम्हा कांगारुंच्या देशात घासफूस कोण खातं? पण त्या आफ्रिकन संघाला आपल्या जी-२० परिषदेची फुल मेंबरशिप दिलीत, ते काल रात्री किती जेवले, ते पाहिलंत का? माय ग्गॉड... शाकाहारी भोजन असूनही हा आहार? आफ्रिकेला वाचवा! बाय द वे, आज मी लेट येणार आहे.

तुमचाच.

अँथनी अल्बानीस. पीएम ऑस्ट्रेलया.

परमवंदनीय माननीय देवतासमान नमोजी, आमच्या आफ्रिकन देशांच्या संघाला तुम्ही जी-२० मध्ये स्थान दिलेत! तुमचा जयजयकार असो! आफ्रिकेत असता, तर आम्ही तुम्हाला एक प्रकारचे नृत्य करुन दाखवले असते. भारत मंडपमपाशी पुरेशी जागा नव्हती. त्याला शेकोटी लागते. असो. आमच्या काही प्रतिनिधींनी चुकून पँटपीस म्हणून केळीची पाने उचलून आणली! तुम्ही केळीच्या पानावर डिनर सर्व्ह केले होते. पाने पिवळी पडली असली, तरी परत करतो आहे. पुन्हा एकदा झिंगोलाला हा झिंगोलाला...म्हणजे धन्यवाद.

सदैव तुमचाच.

आजिल औसमानी, अध्यक्ष, आफ्रिका संघ.

डिअर सर, आपल्या पाहुण्यांना आजचे जेवण हलके द्यावे असे मी सुचवतो. भाताची पेज, मेतकूट आणि मऊभात एवढाच आहार द्यावा. सगळेच उशीरा येणार असल्याचे कळवत आहेत. बाकी परिषद चांगली चालली आहे, असे सीआयएने एमाय -६ला कळवल्याचे इस्रायली मोसादने पेगाससवर सांगितल्याचा गोपनीय रिपोर्ट आहे.

कळावे. आपला नम्र.

जय शंकर (दरवेळेला मी नाव सांगितले की तुम्ही ‘जे श्री क्रष्ण’ म्हणता, म्हणून खुलासा केला.),

परराष्ट्र मंत्री. (भारत) प्लीज नोट द नेमचेंज!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT