Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : इंडिया का नया चेहरा..!

राजधानीत वातावरण उत्साहवर्धक होते. हवेत चांगलाच गारवा होता. आपणही ‘हुडी’वाले जाकिट घालावे, अशी प्रबळ इच्छा उधोजीसाहेबांना झाली.

ब्रिटिश नंदी

स्थळ : अशोका हॉटेल, राजधानी दिल्ली. वेळ : भोजनोत्तर वामकुक्षीची.

राजधानीत वातावरण उत्साहवर्धक होते. हवेत चांगलाच गारवा होता. आपणही ‘हुडी’वाले जाकिट घालावे, अशी प्रबळ इच्छा उधोजीसाहेबांना झाली. बैठक दुपारी तीन वाजता होणार होती. इंडिया आघाडीचे नेते आपापल्या घरी जेवून येतील, तरीही थोडेसे काहीतरी पदार्थ असू द्यावेत, अशी मोघम सूचना हॉटेल व्यवस्थापकांना मिळाली होती.

व्यवस्थापकांनी ताबडतोब सामोश्याचे पीठ मळायला घेण्याचे आदेश मुदपाकखान्याला दिले. समोसे बरे की बटाटेवडे? यावर थोडा खल झाला. कारण बटाटेवडेच बरे, असा निरोप उधोजीसाहेबांचे सुप्रसिध्द प्रवक्ते संजयाजी यांनी पाठवला होता. पण तो पोचलाच नाही! कारण निरोप कोणाला द्यायचा, हेच मुळात कुणाला कळले नाही. (म्हणून) आपल्या आघाडीला ताबडतोब एखादा निमंत्रक हवा, ही मागणी थोर नेते रा. उधोजीसाहेब यांनी ताबडतोब नोंदवली.

…नामचीन नेतेमंडळी आपापल्या गाडीतून आली. बऱ्याच जणांना जेवणावरुन उठून यावे लागल्याने वामकुक्षीची वेळ झाली होती. बैठकीच्या ठिकाणीच थोडीशी डुलकी घेऊ, या विचाराने काही नेते आले होते, त्यांनी आपला बेत तडीस नेला. एकदा मनाशी ठरवले, की काहीही शक्य असते. अगदी मोदींना हरवणेही शक्य असते, अशी खूणगाठ काही नेत्यांनी मनोमन बांधली, आणि त्यांनी खुर्चीतच डोळे मिटून घेतले.

दिल्लीचे पंतप्रधान अरविंदस्वामी केजरीवाल वास्तविक विपश्यनेला जाणार होते. पण विपश्यनेला गेले काय, आणि इंडियाच्या बैठकीला गेले काय, दोन्ही एकच, असा परिपक्व विचार करुन ते बैठकीला आले. काँग्रेसचे राहुलजी साध्या टीशर्टवर आले होते. एप्रिल-मे महिन्यात लोकलगाडीच्या सेकंड क्लासच्या डब्यात ‘प्रच्चंड उकडतंय’ असा लुक देत उभ्याने प्रवास करणाऱ्या मुंबईकरासारखे ते हिंडत होते.

‘आहे कुठे थंडी? ह्या!’ असे आल्यागेल्याला सुनावत ते आले. आल्या आल्या त्यांनी टेबलावर ठेवलेल्या बशीतले मूठभर काजू उचलले. ते संपल्यावर डावीकडे शेजारी बसलेल्या जयराम रमेश यांच्या काजूबशीत हात घातला. त्यांच्याशेजारी बसलेल्या ममतादीदींनी तात्काळ आपली बशी उचलून सुरक्षित अंतरावर नेल्याचे उधोजीसाहेबांनी अचूक टिपले.

काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुनजी खर्गेसाहेब (निमूटपणे) महामॅडमजींच्या शेजारी बसले होते. त्यांनी आपणहून काजूबशी उचलून राहुलजींसमोर नेऊन ठेवली. म्हणाले, ‘घ्या, तुम्हारे लियेही है..!’

‘आपल्या आघाडीला कुणीतरी निमंत्रक किंवा समन्वयक हवा! मला वाटतं, आपण एक व्हॉटस्ॲप ग्रुप करु…,’ उधोजीसाहेबांनी सूचना मांडली. ग्रुप ॲडमिन आपणच व्हावे, असे त्यांना वाटत असावे. पण बार फुकट गेला.

‘निमोंत्रक? आमी निमोंत्रक बिमोंत्रक जानबे ना! आमादेर लीडर मोल्लिकार्जुनबाबू!’ कोलकात्याच्या ममतादीदींनी थेट नाव जाहीर करुन टाकले. एकच खळबळ उडाली. केजरीवालसाहेबांनीही तात्काळ त्यास होकार भरला. स्टालिन असे भारदस्त नाव धारण करणाऱ्या दाक्षिणात्य नेत्यानेही ‘‘वेळगम खर्गेजी! अवर सोल्लिदादा सरदाराऽऽ..’ असे अनुमोदन दिले.

राहुलजींनी काजू तोंडात टाकत खर्गेसाहेबांकडे बघून डोळा मिचकावला. (ही जुनी सवयच!) उधोजीसाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांकडे बघितले. पण त्यांनी तिसरीकडेच पाहायला सुरवात केल्याने नाइलाजाने त्यांनी मान डोलावली. एवढे सगळे घडेपर्यंत खर्गेसाहेबांना तसल्या थंडीत घाम फुटला होता…

‘काँग्रॅच्युलेशन्स, खर्गेजी! आगे बढो, हम तुम्हारे साथ नहीं है…अब आयेगा मजा!,’ खर्गेजींच्या हातावर दोन खारवलेले काजू ठेवत राहुलजींनी अभिनंदन केले. तेव्हा, ममतादीदींचे अभिनंदन करायला इतर चार जण धावले होते. बाकीचे नेते दाराकडे निघाले होते. ते दृश्य बघून उधोजीसाहेब उठले, आणि शेजारी उभ्या असलेल्या चिरंजीवांना म्हणाले, ‘हल्ली अंधार लौकर पडतो, निघायचं बांदऱ्याला?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray यांची बोंबाबोंब म्हणजे 'चोर के दाढी में तीनका', नेमकं कुणी केली अशी टीका?

Bombay High Court : तेलगोटे कुटुंबीयांची फाशीची शिक्षा रद्द, वडील-मुलाला सुनावली जन्मठेप,आईची निर्दोष सुटका

Arjun Tendulkar च्या संघाचा विक्रम! Ranji Trophy च्या ९० वर्षांच्या इतिहासात कुणीच केला नव्हता असा पराक्रम

Ulhasnagar Assembly Election : आयलानी यांचा जीव भांड्यात! योगी आदित्यनाथ यांची मीरा भाईंदरच्या सभेतून कुमार आयलानी यांच्यासाठी हाक

Narendra Modi: बाळासाहेबांची 'ती' इच्छा, पूर्ण कशी झाली सांगताना नरेंद्र मोदींचं 'मविआ'वर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT