lok sabha election bharat jodo yatra politics Sakal
satirical-news

ढिंग टांग : पनौती बनेगी चुनौती...?

वेल, तिथं निवडणूक आहे, असं मला आपल्याच पक्षातर्फे कुणीतरी सांगितलं! राजस्थानात तुम्ही काही भाषणं केलीत

ब्रिटिश नंदी

बेटा : (नेहमीच्या रंगाढंगात एण्ट्री घेत...) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!! रामराम-सा!!

मम्मामॅडम : (निवडणुकीच्या कामात व्यग्र...) हं! कुठून येतोयस?

बेटा : (उत्साहात) आल्या आल्या मी रामरामसा म्हटलं ना! याचा अर्थ उघड आहे- मी राजस्थानातून आलोय!!

मम्मामॅडम : (कागदपत्रे चाळत) राजस्थानात काय चाललंय?

बेटा : (सुस्कारा सोडत) वेल, तिथं निवडणूक आहे, असं मला आपल्याच पक्षातर्फे कुणीतरी सांगितलं! राजस्थानात तुम्ही काही भाषणं केलीत, तर आपल्या उमेदवारांचा विजय नक्की होईल, असं मला कुणीतरी फोनवर सांगितलं, मी गेलो!

मम्मामॅडम : (संशयानं) तो फोन आपल्याच पक्षातर्फे आला होता, याचा काही पुरावा?

बेटा : (खांदे उडवत) तुम्ही आमचं दैवत आहात, असं तो पक्ष कार्यकर्ता फोनवर म्हणाला होता!

मम्मामॅडम : (खचलेल्या सुरात) तो फोन त्या नतद्रष्ट कमळवाल्यांनी केलेला असू शकतो!

बेटा : (बेपर्वाईने) व्हॉटेव्हर…माझ्या सभांना तिथं प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे! लोक गर्दी करत आहेत, टाळ्या वाजवत आहेत! आणखी काय हवं?

मम्मामॅडम : (कपाळ चोळत) …पण ते पनौती वगैरे कशाला बोलायचं?

बेटा : (पेडगावला निघाल्यागत…) मी कुठं काय बोल्लो? ‘अपने लडके वर्ल्ड कप जीतनेवालेही थे, लेकिन पनौतीने हरवा दिया’ एवढंच बोल्लो!!

मम्मामॅडम : (समजूत घालत) कुणीही कुणाला असं बोलू नये! कोण पनौती? जो तो आपल्या कर्माची फळं भोगतो! आपण कशाला वेडंवाकडं बोलायचं? तुझं प्रेमाचं दुकान आहे ना? मग प्रेमाच्या दुकानात ही पनौती कुठून आली?

बेटा : (गोंधळात पडून) पनौतीचा अर्थ साडेसाती असा आहे ना?

मम्मामॅडम : (उठून दारं-खिडक्या लावून घेत) हळू बोल! पुन्हा काहीतरी घोळ घालशील!

बेटा : (सात्विक संतापाने) भले! आता मी काय घोळ घातला? पनौती म्हणजे चुनौती, असं मला कुणीतरी सांगितलं! माणसानं लोकल भाषा वापरावी, असं वाटून मी चुनौतीऐवजी पनौती असा शब्द वापरला! हमारे लडके जीत रहे थे, लेकिन चुनौतीने हरवा दिया, असं म्हणायचं होतं मला! ऑस्ट्रेलियाच्या संघाने चुनौतीच दिली होती ना!!

मम्मामॅडम : (डोक्याला हात लावत) ओह गॉड! कोण तुला भाषणं लिहून देतं?

बेटा : (अभिमानाने) माझी मीच लिहितो! इन फॅक्ट मी काही लिहीतच नाही! लिहिलेलं वाचत नाही! हृदयापासून उत्स्फूर्त बोललं की लोकांना आवडतं, असा माझा अनुभव आहे…इतकी वर्ष मी मनाला येईल, तसंच बोलत आलो आहे!

मम्मामॅडम : (पुटपुटत) म्हणूनच गेल्या नऊ वर्षात आपल्या पक्षाचं काय झालं ते बघ!

बेटा : (समजूतदारपणाने) देखिए, इलेक्शन यह भी तो एक खेल है! यहां हारजीत होती रहती है! लेकिन वो पनौती को चुनौती कहते हैं, और हम चुनौती को पनौती!! यही फर्क है, हममें और उन में!!

मम्मामॅडम : (सर्द होत) काय बोललास ते तुझं तुला तरी कळलं का?

बेटा : (हाताची घडी घालत) काही वर्षांपूर्वी तू सुद्धा त्यांना ‘मौत का सौदागर’ म्हटलं होतंस!!

मम्मामॅडम : (अंगावर शहारा आल्यागत) आठवणसुध्दा काढू नकोस, त्या घटनेची! तिथूनच सगळं बिनसत गेलं!!

बेटा : (दिलासा देत) डोण्ट वरी! मी सगळं सांभाळून नेईन! राजस्थानात मीच त्यांना एकटा चुनौती देणारा आहे!

मम्मामॅडम : (विषण्ण मनाने) बघूया आता काय होतं ते! कोण चुनौती आणि कोण पनौती, हे निवडणूक निकालात कळेलच!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT