साहित्याचा सावकारी पाश…! sakal
संपादकीय

साहित्याचा सावकारी पाश…!

न अस्कार! काही काही पाश हवेहवेसे वाटतात. या पाशांमधून सुटकाच होऊ नये असं वाटतं. डोळे मिटावेत, आणि शांतपणे त्या पाशांत हरवून जावं. पहिलंच वाक्य वाचून काही वाचकांच्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या असतील. (चहाटळ मेले!) पण मी वेगळ्या सावकारी पाशाबद्दल बोलते आहे.

सकाळ वृत्तसेवा

हौस ऑफ बांबू

कु. सरोज चंदनवाले

न अस्कार! काही काही पाश हवेहवेसे वाटतात. या पाशांमधून सुटकाच होऊ नये असं वाटतं. डोळे मिटावेत, आणि शांतपणे त्या पाशांत हरवून जावं. पहिलंच वाक्य वाचून काही वाचकांच्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या असतील. (चहाटळ मेले!) पण मी वेगळ्या सावकारी पाशाबद्दल बोलते आहे. शेतकऱ्याला, गरीबाला नाडणाऱ्या सावकाराचा हा पाश नव्हे. हा गोड पाश आहे, - इंद्रायणीबाई सावकारांचा. त्यांच्या चतुरस्त्र लिखाणामुळे कित्येक नवथर, आणि सुंदर युवती मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात आल्या. आपणही त्यांच्यासारखं सुंदर दिसावं, लिहावं, अशी महत्त्वाकांक्षा बाळगून वावरल्या. आजही वावरताहेत बरं!!

इंद्रायणी सावकार हे नाव मराठी साहित्याला सुपरिचित आहे. चरित्र, कथा, कादंबऱ्या, काव्य, विनोद अशा साऱ्या रुपबंधांमध्ये लीलया लिखाण करणाऱ्या इंद्रायणीबाई गेल्या २६ जूनला नव्वदीच्या झाल्या. अजूनही कांती कशी टवटवीत. चेहऱ्यावरचं मधाळ स्मित तस्संच्या तस्सं! हातात काठी नाही की अंगावर सुरकुत्या नाहीत. विस्मरणाचं तर नाव नको. नको तेही नको तेव्हा नेमकं आठवतं!!

आत्ताही त्यांच्याकडे गेलात तर त्यांच्या मेजावर पाच फायली तयार आहेत. फायलींमध्ये आगामी पुस्तकांची जुळवाजुळव आहे. थोडक्यात, ऐन नव्वदीत पाच पुस्तकांवर काम चालू आहे!! आजवर चाळीसेक मराठी आणि तेवीसेक इंग्लिश पुस्तकं लिहून झाली आहेत. सेंच्युरी काही कठीण नाही त्यांना!! ‘‘कोसो कॉय जोमतो होऽऽ..,’’ असं मी त्यांना विचारलं, तर इकडे तिकडे बघत त्यांनी जबर्दस्त गुपित सांगितलंन. ‘‘कुणाला सांगू नकोस, पण रोज सकाळी अनेशापोटी एक चमचा खोबरेल तेल पीत जा!’’ त्यांनी कानात सांगून टाकलं. त्यांच्या वडलांनी हा खोबरेलाचा ‘स्नेहनम’ मंत्र दिला म्हणे. मी लागलीच बाटली मागवून ठेवली आहे. खोबरेल तेलानं इतक्या गोष्टी होत असतील, तर आपणही ट्राय करायला काय हरकत आहे? माझा मेला, एक काव्यसंग्रह गेली बारा वर्षं पुरा होतोच आहे…

इंद्रायणीबाईंकडे चमचाभर खोबरेलापेक्षा बरंच काही आहे. प्रकांडपंडित संस्कृत आणि बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक धर्मानंद कोसंबी यांची ही नात. संस्कृतमध्ये विद्यापीठात पहिल्या क्रमांकानिशी जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिप मिळवली, आणि त्याच वेळेला इंग्लिशमध्येही ‘फर्स्ट’ येऊन दादाभाई नौरोजी पारितोषिकही मिळवलं. पुढे दूरदर्शनवरही काही कार्यक्रमांमध्ये त्या आवर्जून दिसायच्या. शालिनीताई पाटील यांच्या खाजगी सचिव म्हणून बराच काळ काम बघितल्यामुळे त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्यांत पोलिटिकलपणा आपोआप डोकावतो. लिखाणाला वाहून घेतलेल्या लेखिका आधीच कमी. पण इंद्रायणीबाईंचा हात नव्वदीतही लिहिता आहे, यात सारं काही आलं. त्या लिहिताहेत, आणि वाचक वाचताहेत. अशी शब्दांची सावकारी सगळ्यांनाच जमते असं नाही. ‘इतकं लिखाण तरी कसं जमतं बुवा?’ असंही मी त्यांना विचारुन घेतलं.

‘‘बैलासारखं एका जागी बसून राहू नकोस!,’’ बाईंनी करड्या आवाजात सांगितलं. मी गोरीमोरीच झाले. नाही म्हटलं तरी दुपारी एक ते चार मला डोळा लागतो, हे खरं आहे. पण…चिंतन एका जागी बसूनच होतं ना? ‘‘येता जाता काहीतरी तोंडात टाकणं टाळत जा!,’’ आणखी एक करड्या आवाजातला मंत्र आला. मी मान खाली घातली.

‘‘…आणि हो! रोज तीन भाज्या खात जा!,’’ हा तर सरळसरळ आदेशच होता. मी मान वर केली नाही. तीन भाज्या खायच्या म्हणजे काय चेष्टा आहे? …इतकी वर्ष सतत साहित्यविश्वात कार्यरत राहण्यासाठी एवढं करावं लागतं, हे ऐकून मी खचूनच गेले. काय बोलावं कळेना!!

हा हवाहवासा सावकारी पाश असाच करकचून आवळलेला राहो, हीच सदिच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT