अंडरवर्ल्ड में खलबली..!  sakal
संपादकीय

अंडरवर्ल्ड में खलबली..!

डिअरम डिअर आदरनीय-फादरनीय डॉन दाऊदभाई कूकुर्ला एरिया के नाना गमलू ऊर्फ चिकन्याचा सलाम. गेले अनेक साल आपन डी कंपनीत सर्विसला असून सर्विसच्या पंधरापैकी सात साल अंदर होतो. कुर्ला टु भायखळा पाकिटमारीची लैन आपन चालवतो.

सकाळ वृत्तसेवा

डिअरम डिअर आदरनीय-फादरनीय डॉन दाऊदभाई कूकुर्ला एरिया के नाना गमलू ऊर्फ चिकन्याचा सलाम. गेले अनेक साल आपन डी कंपनीत सर्विसला असून सर्विसच्या पंधरापैकी सात साल अंदर होतो. कुर्ला टु भायखळा पाकिटमारीची लैन आपन चालवतो. पूर्वी सिनेमा टिकिट ब्लॅक करायचो, पन तो धंदा आता ‘ॲप’टला!! पाकिटमारीलाही दिवस बरे नाहीत. पब्लिक जीपे करायला लागली. बिल्डर लोक पन धमक्यांना घाबरेनासे झाले आहेत. ‘पांच पेटी दे डाल, वरना..’ असा फोन केला तर खीककन हसून फोन ठेवतात. हे सारे कोनामुळे झाले? वकीलबाबू उर्फ सरकारी आडवाकोट निकमसाहेबांमुळे!! कसाबला इज्जतीत लटकावून या मानसाने अंडरवर्ल्डची हवा टायट केली.

आपली डायरेक वलख नाही, पन विलाजच नसल्या कारनाने खुफिया खत लिहीत आहे. आक्षरास हसू नये. आपन घोडा चालवनारी मानसे, कलम कशे चालवनार? पन एक जबरदस्त टिप देन्यासाठी हे लेटर लिहत आहे. लिहणेस कारन कां की बाँम्बेच्या आंडरवर्ल्डचे कर्दनकाळ आनि आपल्या अनेक साथीदारांना जेलची हवा खायला लावनारे निकमसाहेब औंदा .विलेक्षनला उभे राहनार आहेत. कोर्टात उभा राहनारे जंटलमन आता प्रचारसभेत किंवा सजवलेल्या ट्रकवर उभे राहनार!! जमाना बदल गया, भाई!! मुंबईव्या आंडरवर्ल्डचा कच्चा चिठ्ठा हा ग्रिहस्थ डायरेक पार्लमेंटमध्येच खोलणार, हे काही बरोबर नाही.

कुर्ल्याचा भाई जग्गू कंघी काल रोजी भेटला. ‘ब्ल्यू बर्ड बार’ मधी मीटिंग होती. तिथे त्याने ही खबर फोडली. बोलला की, ‘‘भाई लोग संभल के रहना. वकीलबाबू खडे रहेले है. अपने सब लोगों कू फिलहाल अंडरग्राऊंड होने कू बोलो. क्या मालूम वकीलबाबू अपनेकूच पन्नाप्रमुख बना डालेगा तो, मुसीबत होगा!’’ समद्यांना जग्गू कंघीचे हे म्हणणे पटले. वकीलबाबू एकदा एमपी झाले की आपल्यावर तोहमत येणार, यात काही शक नाही. आधीच या कमळवाल्यांकडे वाशिंग मशीन आहे, असे बोलतात. त्या वाशिंगमधी आंडरवर्ल्ड गरागरा फिरले तर सगळाच गेम होनार.

आपले आंडरवर्ल्ड कोणाला डरत नाही, पण वकीलबाबूंना डरते. माणूस जळगावहून आला, आनि आपल्याला पानी पियाला लावले!! (जळ बोले तो पानीच!) अजमल कसाबला अंडा सेलमधी ठेवला होता, तेव्हा जग्गू कंघी, बंटी घोडेवाला ऊर्फ टुकडापानी, खुंखार कल्लु, मुन्ना चिंधी ही नामचीन कंपनी तेव्हा अंदरच होती. कसाब बिर्याणी खातो, हे वकीलबाबूंना कोणी सांगितले, याची अजून तलक भनक कोनाला लागलेली नाही. पण वकीलबाबूंनी बातमी फोडली. तेव्हापासून कुटल्याच जेलमधी बिर्याणी भेटेनाशी झाली आहे. जेलमधी वकीलबाबूंची वट चालते, हे सगळ्यांनी पाहिले आहे.

टाडा कोर्टात वकीलबाबूंची आर्ग्युमेंट ऐकून सालेमभाई पन सॉल्लिड इंप्रेस झाला होता. ‘‘वकीलबाबू, तुम मेरे वकील क्यूं नही होते, दोन दिन में बाहेर आऊंगा!’’ अशी आफर त्याने दिली होती. पण वकीलबाबू बोलले की, ‘‘अबे झिंगूर, मैं चारसोबीसी के केस नहीं लेता!’’ आता यावर काय बोलणार? सालेमभाई इंटरनॅशनल खिलाडी असूनही हा जबाब. इन्सल्ट झाला ना खालीपिली? आजकल कोर्टातले लोग पॉलिटिक्स जॉइन करु लागले आहेत. कितीतरी जजसाहेबांनी इमानदारीत कोट उतरवून ठेवून कमळ पार्टी जॉइन केली. वकीललोक कशाला गप्प बसतील? आपन अंडरवर्ल्डच्या लोकांनी एक पत्रक काढून वकीलसाहेबांना सपोर्ट डिक्लेर करु या का, अशी माझी रिक्वेष्ट आहे. डोक्याला ताप नको!! कळावे.

आपका अपना. नाना गमलू. (कुर्ला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT