ढिंग टांग ब्रिटिश नंदी;हॉटेल पॉलिटिक्स : एक आचार-संहिता...! sakal
संपादकीय

ढिंग टांग ब्रिटिश नंदी;हॉटेल पॉलिटिक्स : एक आचार-संहिता...!

सकाळ वृत्तसेवा

वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकांमुळे हॉटेल उद्योगाला बरकत आल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हेच ते अच्छे दिन अशी प्रतिक्रिया एका हॉटेल व्यावसायिकाने व्यक्त केली. आम्ही त्याच्या विकासाच्या आनंदात सहभागी आहोत. विधान परिषद निवडणूक लागल्याने मुंबईतील काही पंचतारांकित हॉटेलांमध्ये धडाधड शेकडो खोल्या आरक्षित झाल्या. या आरक्षणाबद्दल मात्र कुठलाही वितंडवाद झालेला नाही, हे विशेष मानायला हवे.

आपला महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. येथे असल्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला रत्तिभरही स्थान नाही, याचा आनंद वाटतो. महाराष्ट्रातील किमान पाच राजकीय पक्षांची आमदारे (एक आमदार, अनेक आमदारे) मुंबईतील पंच हॉटेलांमध्ये बॅगांसह आणि बॅगांविना येऊन थडकत आहेत. उरलेला सहावा पक्ष हॉटेलची बुकिंग मिळत नसल्याने ‘हात’ चोळत बसला आहे, असे समजते. काही सदस्य तर नेसत्या वस्त्रांनिशी येऊ घातले आहेत. आपला पक्ष हा गोरगरीबांच्या शीत, सूत आणि छताचे (खुलासा : अन्न, वस्त्र आणि निवारा) प्रश्न सोडवण्यासाठी हिरीरीने लढतो. त्याचा मताचा प्रश्न सोडवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे एकनिष्ठ आमदारांना वाटते ही अधिक समाधानाची बाब आहे. शिवाय, आपल्या मुंबईत काय मिळत नाही? सारे काही मिळते! तथापि, हॉटेल मुक्कामाबाबत काही गैरसमज कुणाच्या मनात असू शकतात. त्याचे निरसन करण्यासाठी हॉटेल वास्तव्याबाबतीत एक आचारसंहिता जारी करत आहोत.

१. हॉटेल वास्तव्यामध्ये हे सदैव लक्षात ठेवावे की, हे सारे लोकशाही बळकट करण्यासाठी व संविधान वाचवण्यासाठीच चाललेले आहे!

२. आमदार झाले की पंचतारांकित हाटेलात राहायला मिळणे, हा विशेष हक्कच आहे असा काहींचा गैरसमज झाला असेल तर तो मनातून काढून टाकावा.

३. हॉटेलातील वास्तव्यात खोलीबाहेर कमीत कमी पडावे.

४. हॉटेलातील कर्मचाऱ्यांशी संधान बांधू नये!

५. शक्यतो आवश्यक ती सर्व दैनंदिन वस्त्रे व सामग्री घरुन घेऊन यावी. पक्षनिधीचा उपयोग कपडे खरेदीसाठी करु नये.

६. काही पाहुणे हाटेलात परस्पर दाढीही करुन घेतात, असे आढळून आले आहे. सबब सदस्यांना विनंती आहे की एक तर घरुनच सारे करुन यावे किंवा सरळ दाढी वाढवावी.

७. इतर पंचतारांकित हाटेलात अमक्या पक्षाला रेट काय पडला, याच्या आडून आडून चौकशा करु नयेत.

८. हाटेलच्या आवारात काही ठिकाणी जाण्यास परवानगी आहे, परंतु कंपौंडच्या भिंतीशी मुळीच जाऊ नये.

९. हाटेल कर्मचाऱ्याकडे मोबाइल फोनची मागणी करताना कुणी आढळल्यास पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणेत येईल.

१०. हाटेलात राहून आपण मज्जा करत आहोत, अशा आशयाची विधाने कुणीही उघड अथवा चोरुन करु नयेत. उदाहरणार्थ काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल... वगैरे. त्यामुळे संपूर्ण मुक्कामाचे गांभीर्यच निघून जाते. हे सारे लोकांसाठीच चाललेले आहे, याचा विसर पडून देऊ नये.

११. हाटेल वास्तव्यात असताना रुम सर्विसचा वापर कमीत कमी करावा. चहा आणि ब्रेडबटरपर्यंत ठीक आहे, पण भरमसाठ बिले करु नयेत. नंतर बिल चुकते करताना पक्षाची पंचाईत होते.

१२. पंचतारांकित हाटेलात राहाणे खर्चिक असते. पक्ष आपली किती बडदास्त ठेवतो आहे, याची कृपया जाणीव ठेवावी, आणि त्यानुसारच मतदानाच्या वेळी वर्तन करावे. काही गद्दारांनी मागल्या खेपेला चुकीचे वर्तन केले, आणि पक्षनिधी वाया घालवला. खर्च करायलाही लिमिट असते.

सर्वात महत्त्वाचे-

१३. कोणीही पळून जाण्याचा प्रयत्न करु नये! बडे भय्या सब देख रहे है!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT