Marathi Movies Sakal
संपादकीय

मराठी चित्रपटांची धूम!

सकाळ वृत्तसेवा

कोरोनानंतर परिस्थिती सुरळीत व्हावी अशी सर्वांचीच इच्छा होती, मात्र त्याचबरोबरीने मनोरंजन क्षेत्रानेही वेग पकडावा असं दर्दी प्रेक्षकांना वाटत होतं.

- विनोद सातव

कोरोनानंतर परिस्थिती सुरळीत व्हावी अशी सर्वांचीच इच्छा होती, मात्र त्याचबरोबरीने मनोरंजन क्षेत्रानेही वेग पकडावा असं दर्दी प्रेक्षकांना वाटत होतं. हे हेरून निर्माते- दिग्दर्शक कामाला लागले आणि कोरोनानंतरचं हे वर्षं म्हणजेच २०२२ सार्थकी लागलं... त्याची ही संक्षिप्त झलक.

ओटीटी चॅनलचा बोलबाला असला तरी चित्रपटगृहात जाऊन ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ बघणाऱ्या मराठी प्रेक्षकांची हौस आणि रसिकता वादातीत आहे. सरकारने ५० टक्के आसनक्षमतेची परवानगी देऊन थिएटर सुरू केली आणि प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. मराठी चित्रपटाच्या क्षेत्रातील एक लक्षणीय गोष्ट म्हणजे कोट्यवधी रुपये प्रमोशनसाठी खर्च करण्याचा एक प्रवाहच या चित्रपटांनी रुजवलाय.‘चंद्रमुखी’, ‘धर्मवीर’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटांनी भरपूर खर्च प्रसिद्धी आणि प्रमोशनसाठी केल्याने त्यांचा चित्रपट हरप्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, तर पारंपरिक माध्यमांबरोबरच समाज माध्यमांवर जाहिरात-प्रसार करण्याची नवी टूमही लाभदायी ठरताना दिसतेय. ‘चंद्रमुखी’ने विमानावर चित्रपटाचे पोस्टर छापून अगदी आस्मान गाठलं... तर ‘धर्मवीर’ने आशिया खंडातील सर्वांत मोठे होर्डिंग लावले. आखाती देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ब्रिटन या देशांमध्ये मराठी चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळतोय. कोरोनापूर्वी एका वर्षाला प्रदर्शित होणाऱ्या १०० ते १२० चित्रपटांपैकी ८ ते १० मराठी चित्रपट हिट व्हायचे, त्या तुलनेत कोरोनानंतरच्या या आठ महिन्यांत आलेल्या ५० ते ६० चित्रपटांपैकी ७ ते ८ सुपरहिट ठरले आहेत.

बॉलिवूडने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतलेली असताना मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची पहिली जोखीम उचलली ती हेमंत ढोमे याने! १९ नोव्हेंबरला हेमंतच्या ‘झिम्मा’ने कोरोनानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटांचा श्रीगणेशा केला. यानंतर विजू माने यांचं दिग्दर्शन असलेला ‘पांडू’ रिलीज झाला. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्या विनोदाची झालर तर सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज यांमुळे मराठी प्रेक्षक खुश झाले. अवधूत गुप्तेंची गाणी लोकप्रिय झाली. जानेवारीत २०२२मध्ये काही दृश्यांमुळे सेन्सॉरच्या कचाट्यात सापडलेला ‘नाय वरनभात लोंचा कोन नाय कोंचा’, ‘झोंबिवली’, ‘स्टोरी ऑफ लागीर’, ‘कॉफी’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि सारेगम निर्मित ‘झोंबिवली’ हा हटके जॉनर असलेला चित्रपट २६ जानेवारीला मराठीच्या यादीत अॅड झाला. या दिग्दर्शक-निर्मात्यांनी ५० टक्के आसनक्षमतेची अट असतानाही चित्रपट प्रदर्शित करत धाडसच दाखवलं.

फेब्रुवारीत ‘फास’,‘पांघरूण’, ‘पावनखिंड’, ‘लोच्या झाला रे’, ‘सोयरिक’, ‘लक डाऊन’, ‘पाँडिचेरी’, ‘चाबूक’ आदी चित्रपट आले. याच महिन्यात दिग्पाल लांजेकरने शिवराज अष्टकातील तिसरा चित्रपट ‘पावनखिंड’ शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला. तो तुफान चालला. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांच्यावरील चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई आणि निरंजन किर्लोस्कर यांची निर्मिती असलेला ‘मी वसंतराव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. निपुण धर्माधिकारीचं दिग्दर्शन आणि राहुल देशपांडेची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बायोपिकच्या पंक्तीत खास स्थान मिळवलं. दिग्पालने स्वतःची निर्मिती असलेला बहुचर्चित ‘शेर शिवराज’ प्रदर्शित केला. २९ एप्रिलला प्रसाद ओक दिग्दर्शित आणि लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘चंद्रा’ या गाण्याच्या प्रसिद्धीसाठी अमृता खानविलकरचे आणि चंद्रमुखीच्या टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच.

मराठी चित्रपटांनी तापविला ‘मे’ महिना!

प्रवीण तरडे यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला, मंगेश देसाई आणि झी निर्मित तर प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. शिवसेनेचे ठाण्याचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आणि समाजकारणावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. प्रसाद ओकने हुबेहुब दिघे साकारल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. धर्मवीर हा घवघवीत आर्थिक यश मिळवलेला एकमेव राजकीय बायोपिक असावा. मराठी चित्रपट राजकीय क्षेत्रात किती खळबळ माजवू शकतो, हे वेगळं सांगायला नको! ‘धर्मवीर’नंतर १५ दिवसांतच महाराष्ट्राचा महासिनेमा म्हणजेच शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम आणि धर्मेंद्र बोरा निर्मित, तर संदीप मोहिते पाटील प्रस्तुत ‘सरसेनापती हंबीरराव’ रिलीज झाला! प्रवीण तरडे आणि त्यांचीच मुख्य भूमिका असलेल्या हंबीरराव चित्रपटाला चाहत्यांनी गर्दी केली.

आगामी काळातील चित्रपट

आगामी काळात प्लॅनेट मराठी आणि दिग्दर्शक संजय जाधव यांचा ‘तमाशा लाईव्ह’, रवी जाधव आणि झी स्टुडिओजचा ‘टाईमपास ३’, रवी जाधव यांचा ‘अनन्या’, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का २’, रितेश देशमुख यांचा ‘वेड’, अंकुश चौधरीची मुख्य भूमिका असलेला ‘दगडी चाळ-२’, दीपक राणे निर्मित ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’, लेखक-दिग्दर्शक सलिल कुलकर्णी आणि सुमीत राघवनची मुख्य भूमिका असलेला ‘एकदा काय झालं?’, केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’, झी स्टुडिओजचा ‘हर हर महादेव’ यांसारखे लक्ष वेधून घेणारे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी ‘हर हर महादेव’ आणि ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हे चित्रपट इतर भारतीय भाषांतही प्रदर्शित होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तरुणाने केला जीव देण्याचा प्रयत्न; वर्षा बंगल्याच्या परिसरात नेमकं काय घडलं?

Rohit Pawar : हसन मुश्रीफ महायुतीच्या नेत्यांसोबत का गेले? रोहित पवारांनी गंभीर आरोप करत सांगितले 'हे' कारण

Free Fire Max Codes : आले रे आले फ्री फायरचे रिडीम कोड आले; हिरे, गन स्किन्स अन् बरंच काही,लगेच मिळवा फ्री रिवॉर्ड्स

Latest Marathi News Updates : 1000 वर्षांनंतरही स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल: पीएम मोदी

"तर मला पोलीस पकडून नेतील" राखीने पंतप्रधान मोदींना केली जामीन मिळवून देण्याची विनंती, "आईच्या अस्थि विसर्जनासाठी..."

SCROLL FOR NEXT