बांगलादेश मुक्ती युद्धाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला तो २६ मार्च १९७१ रोजी आणि त्याची समाप्ती झाली ती १६ डिसेंबर १९७१ रोजी.
बांगलादेश मुक्ती युद्धाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला तो २६ मार्च १९७१ रोजी आणि त्याची समाप्ती झाली ती १६ डिसेंबर १९७१ रोजी. या कालावधीत खूप काही घडून गेले. पाकिस्तानी (Pakistan) सैन्याने अन्याय, अत्याचार, क्रौर्य यांचा कडेलोट केला. महिलांसह लहान मुले त्यांचे शिकार झाले. त्याचा हा घटनाक्रम...
१ मार्च ः पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे ३ मार्च रोजी होणारे अधिवेशन रद्द केल्याची घोषणा जनरल याह्याखान यांनी रेडिओवरून केली.
७ मार्च : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीगची सरशी होऊनही त्याचे नेते शेख मुजिबूर रहमान (Sheikh Mujeebur Rehman) यांना सत्तेपासून ठेवले होते. त्यांनी ढाका (Dhaka) रेस कोर्स मैदानावर जमलेल्या जमावाला आताचा लढा हा बंधविमोचनाचा लढा आहे, आताचा लढा हा स्वातंत्र्याचा लढा आहे, असे सांगितले.
९ मार्च : चितगाव बंदरातील कामगारांनी स्वात जहाजावरील शस्त्रे उतरवायला नकार दिला
१० मार्च : हद्दपार केलेल्या बंगाली विद्यार्थ्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) मुख्यालयासमोर बंगाली लोकांवरील हिंसेच्या समाप्तीसाठी राष्ट्रसंघाने हस्तक्षेपाच्या मागणीसाठी निदर्शने केली.
१६ मार्च : याह्याखान यांनी शेख मुजिबूर रहमान यांच्याशी वाटाघाटी सुरू केल्या.
१९ मार्च : जयदेवपूर येथील निदर्शकांवर पाकिस्तानी (Pakistan) लष्कराने केलेल्या गोळीबारात ५० जणांचा मृत्यू.
२४ मार्च : सईदपूर, रंगपूर आणि चितगाव येथील निदर्शकांवर पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार, हजारवर लोकांचा मृत्यू.
२५ मार्च : पाकिस्तानी लष्कराकडून ढाक्यासह देशभर नागरिक, राजकीय नेते, कार्यकर्ते, बंगाली लोकांविरोधात सशस्त्र ऑपरेशन सर्चलाईट सुरू.
२६ मार्च : रात्री सव्वा वाजता शेख मुजीबूर रेहमान यांना पाकिस्तानी कमांडोंनी अटक केली, त्याआधी काही मिनिटे बांगलादेशचे (Bangladesh) राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. अवामी लीग पक्षाचे नेते एम. ए. हन्नान यांनी चितगावमध्ये बंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या वतीने कालूरघाट येथे बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. हाच दिवस बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन ठरला.
२७ मार्च : बंगबंधूंच्या वतीने पुन्हा एकदा मेजर झियाऊर रेहमान यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.
१० एप्रिल : बांगलादेशचे विजनवासातील हंगामी सरकार जाहीर
१२ एप्रिल : एम ए जी ओसमानी यांनी बांगलादेश आर्म्ड फोर्ससची सूत्रे स्वीकारली.
१७ एप्रिल : वैद्यनाथतला (आजचे मुजीबनगर), जि. मेहरपूर येथे विजनवासातील हंगामी सरकारचा शपथविधी झाला.
१८ एप्रिल : दुरिन, कामिला तसेच रंगामती-महालचेरी जलमार्ग आणि चितगाव डोंगरी भागात युद्धाला तोंड फुटले.
२४ एप्रिल : अनिवासी बांगलादेशींनी ब्रिटनमधील कोव्हेन्ट्री येथे बांगलादेश अॅक्शन कमिटीची स्थापना केली.
५ मे : गोपालपूर येथे नरसंहार.
१५ मे : मुक्तिवाहिनीला भारतीय लष्कराने मदत देणे सुरू केले.
२० मे : खुलनाजवळील चुकनागर येथे पाकिस्तानी लष्कराने व्यापक नरसंहार घडवला, त्यात १० हजार लोक मारले गेले.
१ ऑगस्ट : न्यूयॉर्कमधील मेडिसन स्क्वेअर भागात बांगलादेशसाठी जॉर्ज हॅरीसन आणि मित्र परिवाराने खास संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले.
१६ ऑगस्ट : बांगलादेश नौदलाच्या कमांडोंनी ऑपरेशन जॅकपॉट राबवले.
३० ऑगस्ट : गनिमी युद्ध करणाऱ्या ढाकातील लोकांविरुद्ध पाकिस्तानी लष्कराची धरपकड मोहीम.
५ सप्टेंबर : गोवाहट्टी, जेस्सोर येथे लढाई.
२८ सप्टेंबर : बांगलादेशचे हवाई दल कार्यरत झाले.
१३ ऑक्टोबर : ढाक्यातील गनिमांनी पूर्व पाकिस्तानचे गव्हर्नर अब्दुल मोनेम खान यांची हत्या केली.
२८ ऑक्टोबर : श्रीमंगोल येथे ढलाईचे युद्ध
३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर : ढलाईचे युद्ध – पाकिस्तानकडून होणाऱ्या माऱ्याला प्रत्युत्तरादाखल भारताने त्रिपुरातून प्रत्युत्तराला सुरवात केली.
९ नोव्हेंबर : सहा नौकांच्या ताफ्याद्वारे बांगलादेशचे नौदल सज्ज.
१६ नोव्हेंबर : अजमिरीगंजची लढाई – मुक्तिवाहिनी आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील १८ तासांच्या धुमश्चक्रीत जगतयोती दास या स्वातंत्र्य सैनिकाला हौतात्म्य पत्करावे लागले.
२०, २१ नोव्हेंबर : गरीबपूरची लढाई – पूर्व पाकिस्तानातील बोयरा भागात भारताचा हल्ला.
२१ नोव्हेंबर : बांगलादेशच्या सशस्त्र दलाची स्थापना.
३ डिसेंबर १९७१ ः बांगलादेशच्या हवाईदलाने पाकिस्तानचा तेल डेपो उद्धवस्त केला. याच दिवशी पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ला. भारताकडून पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा.
४ डिसेंबर ः लोंगेवालेची लढाई - भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला जैलसमेरवर हल्ला करण्यापासून रोखले
४ व ५ डिसेंबर ः गाजीपूर येथील लढाईतील विजयाने भारतीय सैन्य आणि मुक्तिवाहिनीने गाजीपूर काबीज केले
५ डिसेंबर : बसन्तरची लढाई - भारतीय सैन्याने जम्मूजवळील पाकिस्तानी क्षेत्रांवर ताबा मिळवला.
६ डिसेंबर : जशोर हा बांगलादेशातील पहिला जिल्हा स्वतंत्र झाला. भारतानंतर भूतानने स्वतंत्र बांगलादेशला मान्यता दिली.
७ डिसेंबर : सिलहट येथील लढाईच्या सरशीने जशोर, सिलहट आणि मौलवी बाजार हे भाग मुक्त
८ डिसेंबर ः भारतीय नौदलाचे कराची शहरावर आक्रमण. (ऑपरेशन पायथन)
९ डिसेंबर ः कुश्तियाची लढाई ः भारतीय सैन्याचा पश्चिम बंगालमधून पूर्व पाकिस्तावर आक्रमणला प्रारंभ. चंदपूर आणि दाउदकंदी भागाची पाकिस्तानच्या कचाट्यातून मुक्तता.
९ डिसेंबर ः मेघना हेली सेतू पाकिस्तानकडून हिसकावून घेतला.
१० डिसेंबर ः लक्षमची मुक्ती. भारतीय वायुसेनेकडून चुकीने बांगलादेशची दोन जहाजे बुडवली गेली.
११ डिसेंबर ः यमुना नीदवरील पुडली पूल (सध्याचा वंगबंधू सेतू) मुक्त करण्यात आला
११ डिसेंबर ः हिल्ली, मैमेनसिंह, कुशिता आणि नोआखाली मुक्त केले गेले. भारतीय नौदलावर दबावासाठी अमेरिकेने बंगालच्या खाडीत एन्टरप्राइज ही युद्धनौका तैनात केली.
१३ डिसेंबर ः अमेरिकेच्या एन्टरप्राइजला उत्तर देण्यासाठी सोव्हिएत नौदलाने अनेक युद्धनौका समुद्रात उतरवल्या. संघर्ष टाळण्यासाठी अमेरिकेची युद्धनौका ईशान्य आशियाच्या दिशेने रवाना.
१५ डिसेंबर ः पाकिस्तानकडून बंगाली राष्ट्रवादी नेत्यांच्या मोठ्या प्रमाणात हत्या. बोप्रा मुक्त केले गेले.
१६ डिसेंबर ः मित्र वाहिनीने ढाक्यावर विजय मिळवला. बांगलादेश मुक्तियुद्धाला विराम. पाकिस्तानी सेनेकडून मित्रवाहिनीसमोर आत्मसमर्पण. ९२ हजार पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख अधिकारी नियाझी यांच्यासह जगजितसिंह अरोरा यांच्यासमोर आत्मसमर्पण.
२२ डिसेंबर ः बांगलादेशच्या अस्थायी सरकारची ढाका येथे स्थापना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.