सप्तरंग

थॉट ऑफ द वीक : अशी करा प्रगतीची मोजणी!

सुप्रिया पुजारी

मागील लेखामध्ये ध्येयापर्यंत पोचविणारे प्रगतिदर्शक (माइिलस्टोन्स) म्हणजे काय हे जाणले; तसेच त्याचे फायदेही समजून घेतले. एकदा प्रगतिदर्शक ठरवून त्यावर वाटचाल सुरू केली, की आपली ध्येयपूर्तीकडे वाटचाल सुरू होते. प्रत्येक प्रगतिदर्शक ठरविण्याचेही एक कौशल्य आहे. एक नवे रूप आहे. प्रगतिदर्शक ठरविताना खालील गोष्टींचा विचार करावा.

1) प्रगतिदर्शकाची स्पष्टता
आपण ध्येयाला स्पष्ट रूप कसे द्यायचे हे समजून घेतले आहे. तोच  मंत्र इथे लागू करायचा. प्रगतिदर्शक जितके स्पष्ट, तितके चांगले. प्रत्येक प्रगतिदर्शक हा असा असावा जेणेकरून नंतर आपण त्याचे मूल्यांकन करू शकू.

2) वेळेचे बंधन असलेले प्रगतिदर्शक
प्रत्येक प्रगतिदर्शकाला वेळेचे बंधन द्यावे. बऱ्याचदा आपण ‘टार्गेट डेट’ ठरवतो; पण ‘स्टार्ट डेट’ही ठरवावी. प्रगतिदर्शकावर काम ‘सुरू करण्याची’ तारीख ‘अंतिम तारखेपेक्षा’ महत्त्वाची असते. काही लोकांची अशी तक्रार असते, की काही काम तारखेसहित ठरवले जाते; पण ते सुरू होत नाही. यासाठीच काम सुरू करण्याची तारीख ठरवावी म्हणजे चालढकल होत नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

3) साधनांचे नियोजन
वरील मुद्द्याप्रमाणे प्रगतिदर्शक ठरवले, की त्यावर काम करणे व ठरवलेले प्रगतिदर्शक साधणे सोपे जाते. नुसते प्रगतिदर्शक पुरेसे नाही. काम सुरू केल्यावर जशी लागतील तशी साधने उभी करणे हे नैसर्गिक आहे. ‘साधनांचे नियोजन’ आपला वेळ वाचवते व आपली कार्यक्षमताही वाढवते. प्रत्येक प्रगतिदर्शकासाठी आपल्याला कोणती साधने लागतील याची यादी करावी व त्यापैकी आपल्याकडे किती साधने तयार आहेत व किती उभी करावी लागतील याची स्पष्टता घ्यावी. जी साधने उभी करावी लागणार आहेत त्याचे नियोजन केल्यास आपल्याला मदत होते.

4) संभाव्य अडथळे
आपण काम सुरू केल्यावर अकस्मात येणारे अडथळे, मनाची तयारी नसल्याने आपला मार्ग अडवतात. हे हाताळण्यासाठी आपण संभाव्य अडथळ्यांचा आधीच विचार करायला हवा. हा  विचार केल्याने जास्तीत जास्त अडथळे येण्याआधीच त्यांचे व्यवस्थापन होते. शक्य तितक्या अडथळ्यांवर वेळेआधीच मात झाल्याने ध्येयपूर्ती अधिक बळकट होते. आपण विचार केलेल्या अडथळ्यांपेक्षा वेगळा अडथळा आला, तरी आपल्याला त्यांचे व्यवस्थापन करणे जमू शकते.

5) आपली प्रतिमा व सवयी
ध्येय ठरवताना आपली प्रतिमा, सर्व गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो; पण जसजसे प्रगतिदर्शक पार करू तसतसे आपल्याला दृष्टिकोनात व स्वतःच्या प्रतिमेमध्ये बदल करावा लागतो. प्रगतिदर्शक पार करताना अनेक सवयी बदलायला लागतात. तुमची प्रतिमा, मत, विचार करण्याची क्षमताही ध्येयाला साजेशी बनवावी लागते. लक्षात ठेवा, नुसते ध्येय व प्रगतिदर्शक ठरवणे पुरेसे नाही, तर त्या अडथळ्यांवर मात करून, साधनांच्या नियोजनाचीही क्षमता हवी.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT