gost yashasvi abhimanyuchi book sakal
सप्तरंग

दारिद्र्याला नमवलं कष्ट आणि बुद्धीनं

शाळेची पुस्तकं घ्यायला एका छोट्या विद्यार्थ्यानं वेगळीच युक्ती शोधली. गरिबीमुळं त्याला ही पुस्तक घेणं शक्य नव्हतं. दहावीच्या परीक्षेला मुलांना पाणी द्यायचं काम त्यानं स्वीकारलं.

प्रतिनिधी saptrang@esakal.com

शाळेची पुस्तकं घ्यायला एका छोट्या विद्यार्थ्यानं वेगळीच युक्ती शोधली. गरिबीमुळं त्याला ही पुस्तक घेणं शक्य नव्हतं. दहावीच्या परीक्षेला मुलांना पाणी द्यायचं काम त्यानं स्वीकारलं.

शाळेची पुस्तकं घ्यायला एका छोट्या विद्यार्थ्यानं वेगळीच युक्ती शोधली. गरिबीमुळं त्याला ही पुस्तक घेणं शक्य नव्हतं. दहावीच्या परीक्षेला मुलांना पाणी द्यायचं काम त्यानं स्वीकारलं. त्याच्या वर्गातल्या मुलांनी आणि काही मोठ्या मुलांनी त्याची त्याबद्दल टर उडवली पण तो खचला नाही त्यानं ते काम पूर्ण केलं आणि मग मिळालेल्या छोट्याशा कमाईतून त्यानं अभ्यासाची पुस्तक विकत घेतली. हाच मुलगा त्या शाळेतून नाही तर पूर्ण तालुक्यातून दुसरा आला.

कुणालाही प्रेरणा वाटेल अशी ही कथा. नितीन कुल या तरुणाचा तळेगाव ते लंडन हा प्रवास ओंकार वर्तले यांनी ओघवत्या शैलीत या पुस्तकात मांडलाय. वर्तले यांनी एका असामान्य इंजिनिअरची कहाणी या पुस्तकात सांगितली आहे.

नितीन कुल या तरुणाने संघर्ष करीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले त्यानंतर परदेशात जाऊन मोठ्या कंपनीत नोकरी मिळविली. हा सारा प्रवास वर्तले यांनी अत्यंत रंजक शब्दांत; पण आशयाला कोठेही धक्का न लावता मांडला आहे.

एखाद्या चित्रपटात घडावा तसा प्रसंग नितीनच्या आयुष्यात घडला. एका मुलाखतीसाठी गेल्यावर मुलाखतकाराने त्याला काही प्रश्‍न विचारले. त्या प्रश्‍नाचे उत्तर देताना नितीनने आपल्या अनुभवाचा उपयोग करीत ते उत्तर दिले.

मुलाखतकाराला अभियांत्रिकीच्या पुस्तकी भाषेत उत्तर अपेक्षित होते; मात्र नितीनकडून ते उत्तर न मिळाल्यामुळे त्याने थेट नितीनची लायकी काढली आणि ‘या क्षेत्रात तू टिकूच शकणार नाहीस’ असे उद्‌गार काढले. दुसरा एखादा येथे खचला असता; पण नितीनने त्याला सांगितले, ‘मी याच क्षेत्रात करिअर करणार आणि माझा लौकिक तुम्ही पाहाल आणि मग माझ्या ज्ञानाची किंमत कळेल.’

नितीनच्या सुदैवाने अगदी तसेच घडले. कतारमध्ये मोठमोठ्या प्रकल्पांचे डिझाईन करणाऱ्या एका कंपनीत नितीन अत्यंत उच्च पदावर काम करीत होता आणि त्याच कंपनीत मुलाखत घेणारी ती व्यक्ती नोकरीच्या मुलाखतीसाठी आली होती. नितीन त्याला मागची ओळख दाखवली नाही किंवा सूडबुद्धीनेही तो त्याच्याशी वागला नाही.

संघर्ष काय असतो हे नितीनने अगदी लहान वयात अनुभवले होते. किराणा माल दुकानदाराने मागचे पैसे दिले नाहीत म्हणून वाणसामान द्यायला दिलेला नकार त्याने अनेक वेळा बघितला होता. वाचनाची प्रचंड आवड असूनही रद्दीतील मासिके वाचत त्याने आपला छंद जोपासला. पट्टा घ्यायची ऐपत नसलेल्या नितीनने लहानपणी कमरेचा करगोटा हाच पट्टा म्हणून वापरला. गणवेशाच्या शर्टाला आणि चड्डीला इतकी ठिगळे लावलेली असायची, की त्याचे वर्णन करता यायचे नाही.

सूरपारंब्या खेळताना खाली पडल्यावर एकदा काच लागली. डॉक्टर त्याला ओरडले, ‘अरे, खेळताना चप्पल घालता येत नाही का?’ चप्पल घ्यायची ऐपत नाही हे नितीन त्यांना कोणत्या तोंडाने सांगणार. परिस्थिती सुधारायला हवी हे त्याच्या मनावर अशा विविध प्रसंगांनी कोरले गेले होते. या सगळ्या कष्टाची आणि संघर्षाची गोष्ट लक्षात ठेवून त्याने बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि अफाट कष्ट घेऊन मोठे स्थान मिळवले.

तब्बल दहा वर्षे त्याने कतारमध्ये मोठ्या कंपनीत नोकरी केली. फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने त्या देशात राबविल्या गेलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांमध्ये त्याला सहभागी होता आले. एक वेगळा अनुभव त्याला मिळाला. त्यानंतर त्याने लंडनमधील नामवंत कंपनीत नोकरी मिळविली. नुसती मिळविली असे नाही, तर लंडनमधील शाळेत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना त्याने शिक्षणाचे धडे दिले. अत्यंत सोप्या भाषेत त्याने इंजिनिअरिंगबद्दल मार्गदर्शन केलं. रद्दीतील पुस्तके वापरून मोठा झालेल्या मुलाने लंडनमधील शाळेत आणि तेथील संस्थांमध्ये सोप्या इंग्रजीत शिक्षणावरची व्याख्याने दिली. तळेगाव ते लंडन हा टप्पा गाठणारा नितीनचा प्रवास कोणालाही प्रेरणादायी असा आहे.

पुस्तकाचं नाव : गोष्ट यशस्वी अभिमन्यूची

लेखक : ओंकार वर्तले

प्रकाशक : नावीन्य प्रकाशन, पुणे (९८२२९३९४४६)

पृष्ठं : १६८

मूल्य : २५० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: महाराष्ट्र विधानसभा निकालांचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? बाजार वाढणार की कोसळणार?

Beed Election Voting: बीडमध्ये उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू; अपक्ष उमेदवाराच्या मृत्यूने हळहळ

Assembly Election Voting 2024: शंभरी पार केलेल्या वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; तुम्ही बजावला का लोकशाहीचा हक्क?

Baramati: राष्ट्रवादी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यात बाचाबाची; शर्मिला पवार व अजित पवारही पोहोचले मतदान केंद्रावर...

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: ऐरोली विधानसभेत कोपरखैरणे विभागात मोठा राडा

SCROLL FOR NEXT