Shantram Nandgavkar sakal
सप्तरंग

मला भेटलेला ‘राजा माणूस’

शांताराम नांदगावकर यांच्यासारखा ‘राजा माणूस’ मला भेटला हे मी माझे भाग्य समजतो. पांढरे कपडे, डोक्यावर लावलेला त्यांचा चष्मा आणि जगण्यावर प्रेम करणारा माणूस म्हणून ते प्रसिद्ध होते.

अशोक पत्की

शांताराम नांदगावकर यांच्यासारखा ‘राजा माणूस’ मला भेटला हे मी माझे भाग्य समजतो. पांढरे कपडे, डोक्यावर लावलेला त्यांचा चष्मा आणि जगण्यावर प्रेम करणारा माणूस म्हणून ते प्रसिद्ध होते.

शांताराम नांदगावकर यांच्यासारखा ‘राजा माणूस’ मला भेटला हे मी माझे भाग्य समजतो. पांढरे कपडे, डोक्यावर लावलेला त्यांचा चष्मा आणि जगण्यावर प्रेम करणारा माणूस म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांचा जनसंपर्क अफाट होता. कलेवर आणि कलाकारांवर त्यांनी भरपूर माया केली.

ऑल इंडिया रेडिओसाठी शांताराम नांदगावकर आणि मी ‘कारवां चालला’ ही संगीतिका केली होती. त्यामध्ये पाच गाणी होती. त्यांचे लेखन, रिहर्सल तसेच चाल वगैरे लावल्यानंतर रेकॉर्डिंग केले. यामध्ये अरुण इंगळे, त्यावेळची प्रतिलता म्हणून गणना होत असलेली चारुशीला बेलसरे यांनी गायन केले होते. त्यानंतर शांताराम ती पाचही गाणी घरी ऐकत असताना मधुमालती या निर्मात्या आल्या आणि त्यांनी मला ‘पैजेचा विडा’ या चित्रपटाची ऑफर दिली. माझे अर्ध आयुष्य शांताराम यांच्या घरी गाण्याच्या बैठकी करण्यामध्येच गेले, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. त्यांचे घर म्हणजे कलाकार मंडळींचा एक अड्डाच होता. नवोदित गायक-गायिका किंवा संगीत संयोजक अशी सगळी मंडळी शांताराम यांना भेटायला यायची. कारण शांताराम सगळ्यांना मदत करणारे आहेत, हे त्यांना माहीत होते.

शांताराम यांचा जनसंपर्क अफाट होता. कलेवर आणि कलाकारांवर त्यांनी भरपूर माया केली. माणसांची त्यांना आवड होती. ते माणसे जपायचे. त्यांना मदत करायचे. कुणाच्याही अडीअडचणीसाठी ते धावून जायचे. आमची ओळख २८ वर्षांची होती. शुक्रवारी त्याच्या घरी वालाचं बिरडं बनायचं. वालाचं बिरडं म्हटलं की माझा तो वीक पॉइंट!

कुणाला एकदम तातडीने गाणे हवे असल्यास मी त्यांच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात जायचो. तेथे ते ड्युटीवर असले की, मी त्यांना हळूहळू सांगत असे. मग ते गाणे लगेच लिहून द्यायचे. ‘बाबू टांगेवाला माझ्या जिवाचा मैतर झाला...’ हे माझं गाणं असंच तयार झालं. नवोदित गायिका शकुंतला जाधव हिच्याकडून आम्ही ते करून घेतले आणि ते इतके लोकप्रिय झाले की काही विच्चारू नका.

लोकांना हे गाणे कमालीचे आवडले होते.

‘आई पाहिजे’ या चित्रपटातील दिवाळीच्या प्रसंगासाठी कमलाकर तोरणे साहेबांना एक गाणे लिहून हवे होते. आज गाणे लिहून झाले तर ते उद्या लगेच रेकॉर्डिंग करायचे होते. अनुराधा पौडवाल, बॉम्बे लॅब, म्युझिशियन अशी सगळी मंडळी तयार होती; परंतु गाणे हातामध्ये नव्हते. मी लगेच शांताराम यांना फोन केला आणि सगळी परिस्थिती सांगितली. उद्याच्या उद्या गाणे रेकॉर्ड करायचे आहे, असे म्हणालो. ते मला म्हणाले, ‘‘मी ऑफिसमध्ये आहे. अर्धा ते पाऊण तासामध्ये घरी पोहोचेन. तू घरीच ये.’’ माझ्या बाजूलाच तोरणे उभे होते. त्यांनी हे सगळे ऐकले आणि शांताराम यांच्या घरी सगळ्यांनी भेटायचे असे ठरले. घरी गेल्यानंतर मी चाल लावीत होतो, तोच शांताराम आले आणि म्हणाले, ‘‘चाल तयार आहे का...’’ मी म्हटले, ‘‘हो. तू फ्रेश हो. मग ऐकवितो.’’ त्यांनी चाल ऐकली आणि गाणे लगेच तयारही झाले ‘आली दिवाळी आली दिवाळी...’ तोपर्यंत तोरणे साहेब आले आणि मला म्हणाले, गाण्याची सिच्युएशन वगैरे सांगितली का शांताराम यांना... मी म्हटले, ‘‘अहो, गाणे तयार झाले आहे. तुम्ही ऐकता का...’’ त्यांनी ते ऐकले आणि आम्हा दोघांनाही शाबासकी दिली. दुसऱ्या दिवशी बॉम्बे लॅबमध्ये या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. ते गाणे होते ‘लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभते सडा रांगोळी... फुलवाती अंगणात सोनसकाळी आली दिवाळी आली दिवाळी...’

एकदा टीव्हीवर ‘फुलोरा’ कार्यक्रमासाठी चार ते पाच गाणी करायची होती. मला तसे सांगण्यात आले होते. पहिला ‘फुलोरा’ मी पाहिला होता. तो खूप सुंदर होता आणि त्याचे संगीत सी. रामचंद्र यांनी केले होते. त्यानंतर कुणी करायला तयार नव्हते. ते का आणि कशासाठी ते मला समजले नाही; परंतु आता ते करायला मला सांगण्यात आले, मग काय... शांताराम यांच्या घरी गेलो आणि एकेक करून गाणी तयार केली. एक गाणे उषा मंगेशकर यांनी गायले. एक येसूदास आणि एक अनुराधा पौडवाल यांनी म्हटले. सुरेश वाडकर आणि शकुंतला जाधव यांचे गाणे ड्युएट होते. गायक अरुण इंगळेही होते. मग आम्ही ही चारही गाणी रेकॉर्ड केली. सगळ्यांना ती खूप आवडली. मुळात मेलोडियस जी गाणी असतात ती सगळ्यांना आपलीशी वाटतात, असा माझा अभ्यास आहे. एकदा ‘मनमोकळे हसलीस तू...’ हे गाणं अभिनेता रमेश भाटकर यांच्यावर चित्रित झाले होते. ते मला कधीही भेटले की ते गाणे त्यांच्या आवाजात आणि त्या चालीमध्ये मला ऐकवायचे.

(लेखक प्रसिद्ध संगीतकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT