Pele and Pancham Sakal
सप्तरंग

पेले आणि पंचम!

पंचमला फुटबॉल आवडायचा. गुलजार यांच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर ‘‘तुम्ही पंचमला हार्मोनियम आणि फूटबॉलपासून विभक्त करू शकत नाही.’

सकाळ वृत्तसेवा

पंचमला फुटबॉल आवडायचा. गुलजार यांच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर ‘‘तुम्ही पंचमला हार्मोनियम आणि फूटबॉलपासून विभक्त करू शकत नाही.’

- बालाजी विट्टल

पंचमला फुटबॉल आवडायचा. गुलजार यांच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर ‘‘तुम्ही पंचमला हार्मोनियम आणि फूटबॉलपासून विभक्त करू शकत नाही.’ मूळचे ईशान्येकडील असलेले देव बर्मन हे कोलकात्यातील सर्वांत मोठ्या दोन फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या ईस्ट बेंगॉल क्लबचे आजीव सदस्य होते. आता कोलकाता हे प्रामुख्याने ब्राझील सिटी बनलं आहे. त्यामुळे पंचमचं ब्राझिलियन संगीताकडे आकर्षित होणं हेच पंचमच्या चाहत्यांच्या फुटबॉल आकर्षणाचं एक कारण असू शकतं का?

पेले आणि आर. डी. बर्मन यांचा जन्म जवळपास एका वर्षाच्या अंतराने झाला. नुकताच ४ जानेवारीला आर. डी. बर्मनचा ‘अमरत्व दिवस’ झाला. (त्याचे चाहते याला स्मृतिदिवस म्हणत नाहीत.) पेलेच्या निधनामुळे आर. डी. बर्मन आणि लॅटिन अमेरिकन संगीतातील संबंधाची यामुळे आपल्याला आठवण होते. पंचम आणि पेले यांच्या करिअरची सुरुवात जवळपास एकाच वेळी झाली. पेले ‘सँतोस’मध्ये १९५६ ला दाखल झाला; तर पंचमने १९५५ मध्येच गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’ चित्रपटासाठी आपल्या वडिलांसह सहायक म्हणून कामाला सुरुवात केली. पंचमच्या संगीत जाणिवा या जागतिक संगीताने समृद्ध झाल्या होत्या, ज्यात लॅटिन अमेरिकन संगीताचा समावेश होता. (ज्याला लॅटिनो म्युझिक म्हणून ओळखले जाते.) त्या शैलीतील व्यवच्छेदक निनाद त्याला आवडला. तसेच देव बर्मन ज्या दक्षिण कोलकात्यात राहायचे तेथील वातावरणामुळे तो अपरिहार्यपणे जॅझ आणि क्युबन बिग बँड म्युझिककडे झुकला.

ब्राझीलच्या मातीतील संगीत असलेले ‘बोसा नोव्हा’ याचा आविष्कार संगीतकार जोओ गिलबर्तो आणि अन्तोनियो कार्ल्स जोबीम यांनी केला होता. जे संगीत उत्तर अमेरिकन संगीतकार आणि लोकप्रिय गायकांनी स्वीकारले. १९६१ मध्ये ‘पती पत्नी’ या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून स्वतंत्रपणे काम करत असताना आर. डी. बर्मनने ‘बोसा नोव्हा’ला रिओ दी जानेरिओतील समुद्रकिनाऱ्यावरून मुंबईतल्या स्टुडिओत आणलं. या चित्रपटातील एक गाणं बनवण्यासाठी त्याने कॉर्ड अधिक सरळसोपे केले आणि पेन्टॅटोनिक ट्यूनशी त्याला जोडलं. आशा भोसले यांनी गायलेलं आणि शशिकला यांच्यावर चित्रित झालेलं ‘मार डालेगा दर्द ए जिगर’ हे गाणं तेव्हा तितकं गाजलं नाही; पण त्यात एक अपूर्व असा नाद आणि मीटर होते. मुखड्यात लेगॅटो आणि अंतऱ्यात स्टॅकॅटोचा वापर करणं हे पंचम ब्रँडच्या नावीन्यपूर्णता आणि रूपांतरणाच्या अनेक उदाहरणांपैकी एक होतं. याच काळात पेलेने त्याच्या देशासाठी दोन विश्वचषक जिंकले. त्यानंतर इतर भारतीय संगीतकारांच्या रचनांमध्येही ‘बोसा नोव्हा’चा वापर दिसून येणार होता. उपकार (१९६७) सिनेमातील ‘मेरे देश की धरती’ हे कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं ‘बोसा नोव्हा’चं उदाहरण आहे; ज्या गाण्यामुळे गायक महेंद्र कपूर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

तिसरी मंझील (१९६६), पडोसन (१९६६) यांसारखे यशस्वी चित्रपट हे सराव सामने म्हटले, तर १९७० चा काळ हा पंचमसाठी तसाच काळ होता, जसा पेलेसाठी १९५९-१९७० चा काळ. अल्बममागून अल्बममध्ये मेलडीने, संमिश्र तालबद्ध प्रकाराने, पिक्वंट कॉर्डने आणि उत्स्फूर्ततेने पंचमने संगीतप्रेमींना थक्क करून सोडलं. अर्थातच त्यात ब्राझील व्हर्सचा समावेश होता! जवानी दिवानी (१९७२) मधील ‘नहीं नहीं अभी नहीं’ या आशा-किशोर यांच्या युगुलगीतात पंचमने ‘ब्राझिलियन ब्लूज’चा वापर केला. आशा भोसले यांनी गायलेल्या ‘चोखे चोखे कोठा बोलो’ या बंगाली पूजा व्हर्जनमध्ये हे अधिक ठळकपणे समोर येतं. तिसऱ्या अंतऱ्यातील स्केलचा बदल आणि डीप बास लाईन्सचा वापर यामुळे हे गाणं वेगळं ठरलं. मनोरंजन (१९७४) मधील ‘आया हूँ मैं तुझ को ले जाऊंगा’ या गाण्यामागे प्रसिद्ध ब्राझिलियन गायक सर्जिओ मेन्डिस याच्या ‘आफ्टर सनराईज’ची प्रेरणा होती. शोले (१९७५) चित्रपटातील ठाकूर त्याच्या कुटुंबीयांचे मृतदेह पाहण्यासाठी येतो, त्या प्रसंगावेळच्या पार्श्वसंगीतावर ‘आफ्टर सनराईज’च्या सुरुवातीच्या संगीताचा हलकासा प्रभाव जाणवतो.

अनेक शतके स्पॅनिश वसाहतीचा भाग असल्याने दक्षिण अमेरिकेच्या परिघावरील प्युअर्तो रिको आणि क्युबातील संगीतावर लॅटिनो म्युझिकचा प्रभाव आहे. त्यामुळे येथील संगीतानेही पंचमच्या काही गाण्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रसिद्ध प्युअर्तो रिकन गायक जोस फेलिसियानोचं गाणं ‘लिसन टू दी पोअरिंग रेन’ या गाण्याचा वापर डबल क्रॉसमधील (१९७४) ‘मैने तुमको चाहा पहली बार’ या गाण्यात केला गेला. याच्या दोन वर्षे आधीच पंचमने त्याचा आवडता गायक फेलिसियानो याला त्याचंच मूळ गाणं ‘लिसन टू दी पोअरिंग रेन’ उषा अय्यर हिच्याकडून गाऊन घेत आदरांजली वाहिली; पण हे गाणं ब्राझिलियन बोसा नोव्हा पद्धतीने अरेंज केलं होतं आणि अर्थात क्युबाचे पंचमसाठी सर्वांत प्रसिद्ध योगदान म्हणजे शालिमारमधील (१९७८) चा चा चा हे नृत्य. आपल्या वडिलांचा सहायक म्हणून काम करताना पंचमने या फ्रेजचा वापर ‘बात एक रात की’ (१९६२) चित्रपटातील ‘शीशे का हो या पत्थर का दिल’ या गाण्याच्या प्रस्तावनेचा भाग म्हणून केला होता.

पंचमला फुटबॉल आवडायचा. गुलजार यांच्याच शब्दात सांगायचे झाले, तर ‘‘तुम्ही पंचमला हार्मोनियम आणि फूटबॉलपासून विभक्त करू शकत नाही.’’ मूळचे ईशान्येकडील असलेले देव बर्मन हे कोलकात्यातील सर्वांत मोठ्या दोन फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या ईस्ट बेंगॉल क्लबचे आजीव सदस्य होते. आता कोलकाता हे प्रामुख्याने ब्राझील सिटी बनलं आहे. त्यामुळे पंचमचे ब्राझिलियन संगीताकडे आकर्षित होणं हेच पंचमच्या चाहत्यांच्या फुटबॉल आकर्षणाचं एक कारण असू शकतं का? गोलमालमधील (१९८०) ‘वो जो है ना मिस्टर पेले अपना... मेरे साथ मॅच हो गया...’ हे गाणं लिहिताना गुलजार हेच सूचित करू इच्छित होते का? कुणाला माहीत...

एके ठिकाणी पेले कथितरीत्या असे म्हणाले होते, की तुम्ही कुठेही जाल तिथे तीन प्रतीके सर्वज्ञात असतात, येशू ख्रिस्त, पेले आणि कोका कोला... या विधानाला नाकारणारे फार कमी लोक असतील; पण हा एक प्रकारचा अहंगंड नाही का? मला या वाक्याचा मूळ स्रोत कुठेही सापडला नाही. म्हणजे पेलेने हे खरंच म्हटलं आहे की नाही, याबद्दल शंका आहे. त्यामुळे याला एक दंतकथा म्हणून सोडून द्यावे लागेल. आणि हा एक दिलासा आहे, कारण चाहत्यांना त्यांचे आदर्श नेहमी नम्र असलेले आवडतात. पेले आणि पंचम हे त्यांच्या कलेपुढे नेहमीच नतमस्तक राहिले आणि नेहमी विद्यार्थी म्हणूनच वागले. याच गोष्टींनी त्यांना पेले आणि पंचम बनवले.

(लेखक प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट अभ्यासक असून, राष्ट्रीय पुरस्कारविजेते पुस्तक ‘आरडी बर्मन : द मॅन, द म्युझिक’चे सह-लेखक (अनिरुद्ध भट्टाचार्य यांच्यासमवेत) आहेत. त्यांचा ‘पंचम आणि पेले’ हा मूळ लेख ThisDay.app या ॲपवर इंग्रजीमध्ये प्रकाशित झाला होता.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT