Heat in Mumbai City sakal
सप्तरंग

टोलेजंग इमारतींमुळे उष्णतेचा दाह

मिलिंद तांबे

मुंबई शहराचा विकास ‘व्हर्टिकल’ पद्धतीने होत आहे. कमी जागेत उभ्या राहत असलेल्या टॉवरमधील अंतर उष्णतेला कारणीभूत ठरत आहे. त्याबाबत प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांच्याशी साधलेला संवाद.

मुंबई शहराला समुद्राने वेढले आहे. त्यामुळे शहराचा विकास ‘हॉरिझोंटल’पेक्षा ‘व्हर्टिकल’ होत आहे. कमी जागेत मोठमोठे टॉवर उभे राहत आहेत. दोन इमारतींमधील जागाही कमीच असते. त्यामुळे हवा खेळती राहण्यास अडथळा निर्माण होत आहे.

जेव्हा दुपारच्या वेळी उन्हामुळे ‘हिट’ वाढते तेव्हा हायराईज इमारतींमुळे त्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ती ‘हिट’ मोकळी न होता तिथेच काही काळ रेंगाळते. परिणामी जी उष्णता एक ते दोन तासांत निघून जाणे अपेक्षित असते त्यासाठी तीन ते चार तास लागतात. त्यामुळे मुंबईकरांना अधिक काळ उकाडा सहन करावा लागत आहे. 

काचेची शोबाजीही उष्णता वाढवते

अलीकडे सिमेंट काँक्रीटचा वापर तर वाढला आहेच; पण इमारती आकर्षक दिसाव्यात म्हणून त्यांना वेगवेगळ्या काचांनी सजवले जाते. त्यातून प्रकाश आत येतो आणि पर्यायाने उष्णता वाढते. वस्तू लवकर थंड होत नाहीत. इमारतींमध्ये एसी आणि कुलरचाही वापर वाढल्यामुळे पारित वायूचे उत्सर्जनही जास्त होत आहे. ही बाबही इमारतीमधील आणि शहरातील तापमानवाढीस कारणीभूत ठरते. 

सिमेंट काँक्रीटचा अतिरेक धोकादायक

मुंबईत सिमेंट आणि काँक्रीटचा वापर वाढला आहे. खुल्या जमिनींवर पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. सिमेंटचा कोबा करण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी उष्णता शोषून घेतली जाते. असे साहित्य जास्त काळ उष्णता शोषून ठेवतात. त्यामुळे जमीन आणि इमारती आपल्याला अधिक तापलेल्या जाणवतात. जमिनी लवकर थंड होत नसल्याने त्या खुल्या कशा राहतील, याचा विचार करणे गरजेचे आहे. 

मुंबईसारखी शहरे वेगाने वाढणारी आहेत. गगनचुंबी इमारती वेगाने उभ्या राहत आहेत. सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र इथे आहे. लोकसंख्येची सर्वाधिक घनता इथेच दिसते. जमीन फार कमी प्रमाणात शिल्लक राहिली आहे. त्यातच अनेक मोठे प्रकल्प इथे येत आहेत. त्यासाठी वृक्षतोडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी नैसर्गिक हिरवळ कमी झाल्याने ‘हिट ड्रॉप’चे प्रमाण कमी झाले आहे, हे खरे आहे.

हिरवळ वाढवणे गरजेचे

अवघ्या जगाला ‘ग्लोबल वॉर्मिंग’ म्हणजेच वातावरण बदलाचा फटका बसत आहे. गेल्या शंभर वर्षांत तापमानात १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे कमाल तापमान नेहमीच सर्वसाधारण सरासरीपेक्षा एक ते दीड अंशाने अधिक जाणवते. मुंबईसारख्या शहरांमध्ये त्याचा परिणाम अधिक जाणवतो. वाढत्या काँक्रीटीकरणाचा परिणाम तापमानवाढीत होत आहे हे नाकारून चालणार नाही.

त्यामुळे हिट जास्त वेळ राहते. ती कमी करायची असेल, तर आपल्याला शहरातील हिरवळ वाढवावी लागेल. त्याआधी आपल्याला शिल्लक हिरवळ वाचवावी लागेल. त्यानंतर मग जास्तीत जास्त देशी झाडांचे रोपण करावे लागेल. बांधकामांची छते सफेद ठेवता आली तर अतिउत्तम.

विंड पॅटर्नचा परिणाम

मुंबईसारख्या शहरात तापमानवाढीचा विचार करता विंड पॅटर्न म्हणजेच हवेच्या प्रवाहाची महत्त्वाची भूमिका असते. मुंबई कोस्टल सिटी असल्याने येथील वाऱ्यांची दिशा महत्त्वाची असते. जेव्हा वेस्टर्ली विंड म्हणजेच पश्चिमी वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात तेव्हा ते उष्णता कमी करतात; पण ईस्टर्ली विंड म्हणजेच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शक्यतो तापमानात वाढ होते. मुंबईत अशी स्थिती बऱ्याचदा दिसते.

पर्यावरणपूरक विकासाची गरज

शहरांचा विकास करताना पर्यावरण लक्षात घेऊनच एखाद्या प्रकल्पाचे डिझाईन करायला हवे. एखादा प्रकल्प सुरू होण्याआधी अनेक आर्किटेक्चर आमच्याकडे येतात. ते भौगोलिक परिस्थिती, हवेची दिशा, तापमान आदींबाबत माहिती घेऊन अभ्यास करतात. पण, त्याची अंमलबजावणी फार महत्त्वाची आहे. शेवटी चांगल्या विकासासाठी चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करायला हवी.

मुंबईसारख्या शहरात कमी जागेत अधिक माणसे राहतात. त्यामुळे लोकसंख्येची घनता अधिक असल्यानेही तापमानवाढीत भर पडते. एखाद्या ठिकाणी अधिक माणसे जमली की आपल्याला जास्त गरम होऊ लागते. रेल्वे प्रवासात आपण त्याचा अनुभव घेतो. अशीच परिस्थिती बाहेरदेखील आहे. जिथे अधिक गर्दी असते तिथे बॉडी हिटमुळे तापमान वाढते.

कोस्टल सिटीमुळे दमट वातावरण

मुंबई कोस्टल सिटी असून शहराच्या चारही बाजूला समुद्र आहे. परिणामी तापमान नियंत्रणात राहते ही सकारात्मक बाजू आहेच; पण बऱ्याचदा अशी परिस्थिती आर्द्रता वाढण्यासही कारणीभूत ठरते. आर्द्रता वाढली की ३३-३४ अंश सेल्सिअस तापमानातही आपल्याला ३७-३८ अंश सेल्सिअस तापमान असल्यासारखे जाणवते. बऱ्याचदा घुसमट वाढते. मात्र, समुद्र आणि तेथून येणाऱ्या वाऱ्यांमुळे बऱ्याचदा मुंबईतील तापमान विदर्भासारखे चटके देणारे नसते.

आर्द्रतेचाही मोठा परिणाम

मुंबईत आर्द्रता बऱ्याचदा वाढलेली दिसते. त्यामुळे तापमान कमी असले तरी उकाडा जाणवतो. त्या दरम्यान बऱ्याचदा हवेचा वेगही मंदावलेला असतो. परिणामी आर्द्रता वाढली की जीव कासावीस होतो; पण ही सगळी भौगोलिक परिस्थिती आहे, जी आपल्या हातात नाही; मात्र मोकळ्या जागा ठेवणे गरजेचे आहे.

प्रदूषणाचा परिणाम तापमानावर होतो की नाही, हे सांगणे कठीण आहे. मात्र बऱ्याचदा पावसाळा ओसरला की ऑक्टोबरमध्ये हिट वाढते. त्यामुळे जमीन कोरडी होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात धुक्याचे प्रमाण वाढल्याचे आपल्याला दिसते. परिणामी दुष्यमानता कमी होते.

जनजागृतीची गरज

वातावरण बदलाचा फटका अवघ्या जगाला बसतोय. त्यामुळेच अवकाळी पाऊस पडणे, अचानक अतिथंडी पडणे इत्यादींसारख्या समस्या जाणवत आहेत. मुंबईसारख्या शहराला त्याचा सर्वाधिक फटका बसतो. हवामान किंवा वातावरणाबाबत आपल्याकडे फारशी जागरूकता नाही. त्यावर भर देणे गरजेचे आहे. भारतीय हवामान विभाग नागरिकांशी थेट संवाद साधून, समाजमाध्यम, वेबसाईट, ॲप इत्यादींच्या माध्यमातून जनजागृती करत असतो. त्यामध्ये सर्वांनी सहभागी घेऊन काम करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT