Samidha-Guru 
सप्तरंग

प्रेग्नन्सीनंतरही केल्या उत्तमोत्तम भूमिका

सकाळ वृत्तसेवा

कम बॅक मॉम - समिधा गुरू, अभिनेत्री
दूर्वा चार महिन्यांची असतानाच मी पुन्हा कामाला सुरवात केली. पण आमच्या दोघींमध्ये कधीच अंतर पडलं नाही. मला नशिबानं माझ्याबरोबर काम करणारी माणसं एवढी चांगली मिळाली, की माझ्या कामाच्या वेळा त्यांनी सांभाळून घेतल्या. माझी इच्छा झाल्यावर चित्रीकरणामधून थोडा वेळ काढून तिला भेटायला घरी यायचे. इतकंच नव्हे, तर तिला मी सेटवरही घेऊन यायचे. दूर्वा सेटवर आली, की सेटवर आनंदाचं वातावरण असायचं.

दूर्वाचं बालपण मी तिच्याबरोबर जगले. फक्त खंत एकाच गोष्टीची वाटते, की दूर्वा तीन वर्षांची असताना मी एकावेळी नाटक, चित्रपट आणि मालिका करत होते. त्याच वेळी माझ्या सासूबाईंना नागपूरमध्ये काम होतं. मीही दिवसभर चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यानं दूर्वाला आम्ही नागपूरमध्ये सासू-सासऱ्यांकडं ठेवण्याचा निर्णय घेतला. जवळपास एक वर्ष ती माझ्यापासून लांब होती, पण असं असतानादेखील आपले आई-बाबा लांब आहेत, ही जाणीव मी दूर्वाला कधीच करून दिली नाही. मी वेळ मिळेल तसं नागपूरला तिला भेटायला जायचे. प्रत्येक दिवशी फोनवर बोलणं व्हायचं.

तरीही आपलं मूल आपल्यापासून दुरावणार तर नाही ना, ही भीती मला सतावत होती; पण आम्ही दोघी मनानं एकत्र असल्यानं असं कधीच घडलं नाही. दूर्वा नागपूरला असतानाच काळ थोडाफार माझ्यासाठी कठीण होता; पण माझ्या मुलीनं मला फार सांभाळून घेतलं. कधीच तिनं मला त्रास दिला नाही. 

अभिनय क्षेत्रात काम करताना घर, काम सांभाळणं म्हणजे एक टास्कच असतं. दूर्वा आता शाळेत जात असल्यानं तिच्याबाबत जबाबदारी आणखीनच वाढली आहे, मात्र पण मी आणि अभिजितनं कामं वाटून घेतली आहेत. दूर्वाचा अभ्यास किंवा शाळेबाबत काही गोष्टी असल्यास मी पाहते आणि दूर्वाला बाहेर फिरायला घेऊन जायची जबाबदारी अभिजितची असते.

खरंतर अभिजितमुळं माझ्यावरचा कामाचा ताण हलका होतो. प्रेग्नंसीनंतर निश्‍चितच आयुष्य बदलून जातं. मात्र, याचा परिणाम माझ्या कामावर झाला नाही किंवा प्रेग्नन्सीनंतर मला काम मिळणं बंद झालं, असंही झालं नाही. फक्त माझं वजन थोडंफार वाढलं होतं. ते मी डाएट आणि व्यायाम करून मूळ पदावर आणलं. उलट प्रेग्नन्सीनंतरही मला उत्तमोत्तम भूमिका मिळत गेल्या. 

आम्ही कुठं बाहेर फिरायला गेल्यावर चाहते माझ्याभोवती फोटो काढण्यास गर्दी करतात. याचं दूर्वाला भारी कौतुक आहे. आपले आई-बाबा इतरांच्या आई-बाबांपेक्षा खूप वेगळे आहेत, याचा तिला अभिमान वाटतो. दूर्वाच्या शाळेत वार्षिक संमेलनाला मला आणि अभिजितला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. दूर्वाला तेव्हा आमचा फार अभिमान वाटला होता. खरंतर दूर्वा माझी पर्सनल फोटोग्राफर आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा कुठं बाहेर जाताना मी नटल्यावर ती माझे खूप छान फोटो काढते.

प्रेग्नन्सीनंतर मी जे काही काम करू शकले, त्यामध्ये माझ्या कुटुंबाचा आणि दूर्वाचा खारीचा वाटा आहे. 
(शब्दांकन - काजल डांगे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT