Dream and Goal Sakal
सप्तरंग

लक्ष्य तो... हर हाल में पाना है...

आज मी तुम्हाला माझी एक थिअरी सांगणार आहे, ती आहे ‘वन पॉइंट फाईव्ह (१.५) गोल थिअरी’ म्हणजेच ‘दीड ध्येयाचा सिद्धान्त’.

सकाळ वृत्तसेवा

आज मी तुम्हाला माझी एक थिअरी सांगणार आहे, ती आहे ‘वन पॉइंट फाईव्ह (१.५) गोल थिअरी’ म्हणजेच ‘दीड ध्येयाचा सिद्धान्त’.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

आज मी तुम्हाला माझी एक थिअरी सांगणार आहे, ती आहे ‘वन पॉइंट फाईव्ह (१.५) गोल थिअरी’ म्हणजेच ‘दीड ध्येयाचा सिद्धान्त’.

काहीतरी ध्येय...लक्ष्य ठरवण्याचं महत्त्व मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. मार्गातला हा यशापर्यंत पोहोचण्याचा सर्वात मोठा टप्पा असतो; कारण, मुळात आपल्याला आधी ध्येय ठरवावं लागतं. यश ही त्यानंतरची गोष्ट असते. आयुष्यात कुठलं ध्येयच न ठरवणं, ठरवता न येणं ही बऱ्याच लोकांची अडचण असते.

‘हो सर, आयुष्यात काहीतरी करायचं आहे,’ असं ते म्हणत असतात; पण आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे त्यांना माहीत नसतं. तुम्ही जसजसे ‘स्पेसिफिक’ होत जाता, तसतसं तुमचं ध्येय साकारात जातं. तुम्हाला तुमच्या स्वप्नातून ध्येय साकारायचं असतं.

स्वप्न आणि ध्येय यात फरक असतो. तुम्ही आधी हा फरक लक्षात घ्या. आयुष्यात काहीतरी साध्य करण्याची पहिली पायरी असते ती म्हणजे ध्येय ठरवणं. कारण, जर तुमचं ध्येय शून्य असेल तर तुमची प्रगतीही शून्यच असेल. काही लोकांचं कसलं ध्येयच नसतं, तर काही लोकांची एकाच वेळी अनेक ध्येये असतात हे आपण पाहतो. मला फिट व्हायचंय...मला श्रीमंत व्हायचंय...मला उत्तम नोकरी हवीय...मला उत्कृष्ट शैक्षणिक पात्रताही मिळवायची आहे...मला चांगला जोडीदारही हवा आहे...लोकांना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी हव्या असतात...पण पहिली गोष्ट म्हणजे, तुमच्यामध्ये ‘स्पेसिफिसिटी’ असायला हवी. तुमची ध्येये ‘नेमकी’ असायला हवीत. त्याबाबतीत तुमच्या मनात विशिष्ट कालमर्यादा स्पष्ट असायला हवी.

उदाहरणार्थ : ‘मला तीन महिन्यांत पाच किलो वजन घटवायचं आहे,’ असं एखाद्याचं ध्येय असेल तर हे ध्येय आव्हानात्मक आहे; पण शक्‍य होण्याजोगं आहे...मला एका वर्षात ‘नीट’ची रॅंक मिळवायची आहे...त्यासाठी तुमच्यापाशी एक वर्षाचा काळ आहे...तुमचं ध्येय नेमकं आहे...‘मला काहीतरी चांगलं शिक्षण घ्यायचंय,’ असं तुम्ही म्हणत नाही आहात, तर तुम्हाला ‘नीट’मधून यशस्वीरीत्या पार व्हायचं आहे, हे तुमचं ध्येय आहे.

ही सगळी ध्येये आहेत...लक्ष्यं आहेत, तर मग ‘वन-पॉइंट फाईव्ह गोल थिअरी’ म्हणजे आहे तरी काय?

काही लोकांची अनेक ध्येये असतात. त्यांना आयुष्यात खूप काही करायचं असतं, त्यांचं कुठलं एखादं विशिष्ट असं ध्येय नसतं. त्यांना ‘सिक्‍स पॅक’ हवे असतात...भरपूर पैसा हवा असतो...उत्तम नातेबंध हवे असतात...गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड हवे असतात...परदेशात फिरून यायचं असतं...आई-वडिलांना परदेशवारी घडवायची असते... ही सगळी त्यांची ध्येये आहेत आणि ती ग्रेट ग्रेटही आहेत; पण ‘वन-पॉइंट फाईव्ह गोल थिअरी’नुसार, तुम्ही एका वेळी १.५ (दीड) पेक्षा अधिक ध्येयावर ‘फोकस’ करू शकत नाही.

तुमचं कसलं ध्येयच नसणं ही जशी समस्या असते, तसं तुमची अनेक ध्येये असणं हीसुद्धा समस्या असते. मित्रांनो, तुम्ही एका वेळी सगळंच करायला जाल तर काहीच होणार नाही. काहीजणांची इथंच अडचण होते. ‘आम्हाला तर खूप काही कारायचं होतं; पण काहीच घडू शकलं नाही,’ अशी त्यांची अवस्था होते.

आपल्याला जर टेबलावरच्या सगळ्या बश्या उचलून बाजूला ठेवायला सांगितलं तर आपण एका वेळी किती बश्या उचलू शकू? आपण बश्या उचलू; पण आपल्याला दहा बश्या तर उचलता येणार नाहीत ना? आयुष्यात ‘मल्टिटास्किंग’च्या बाबतीत असंच असतं. कपडे आवरून ठेवणं, खोलीची साफसफाई करणं, कुणाला फोन करणं अशा छोट्या छोट्या कामांच्या बाबतीत ते तुम्ही करू शकता. या सगळ्या कमी वेळेत पूर्ण होणाऱ्या दैनंदिन गोष्टी असतात; पण जेव्हा तुमचं आयुष्यात काही मोठं ध्येय असतं - म्हणजे, एखाद्या ‘एन्ट्रन्स एक्झॅम’ची तयारी, फिटनेस राखणं किंवा बिझनेसमध्ये स्थिरस्थावर होणं - तेव्हा त्यासाठी चोवीस तास मेहनत गरजेची असते. ही दीर्घकालीन ध्येये असतात. त्यांचा सतत विचार करावा लागतो. त्यावर रोज काम करावं लागतं.

ही ध्येये सहजसाध्य नसतात. त्यासाठी मोठी इच्छाशक्ती, प्रेरणा व शिस्त आवश्‍यक असते. मात्र, जर तुम्ही एकाच वेळी अनेक ध्येये बाळगलीत आणि त्यासाठी मेहनत करत राहिलात तर तुमच्या हाताला काहीच लागणार नाही. तुम्ही मोडून पडाल. तुमची सगळी ध्येये - ‘टेबलावरच्या सगळ्या बश्या’ - चूर चूर होतील. कारण, दीर्घकालीन ध्येयांच्या बाबतीत ‘मल्टिटास्किंग’ खूप अवघड असतं. मी सकाळी ‘नीट’ची तयारी करीन...त्यानंतर घाम गाळून व्यायाम करीन...वेट्स कार्डिओ करीन...डाएटिंग करीन...त्यानंतर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड मिळवायचा प्रयत्न करीन...त्याचबरोबर मला माझ्या मित्रांबरोबरही खास बंध जोपासायचे आहेत...मी संध्याकाळच्या वेळात खेळीन...त्यानंतर गिटार वाजवीन... त्यानंतर बिझनेसची कामं करीन...मी सगळ्या गोष्टी एकाच वेळी व्यवस्थित करीन...असं काही जणांना वाटत असतं.

तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता, आयुष्यात तुम्ही हे सगळं कराल; पण हे एकाच वेळी करणं मात्र शक्य नाही. जर तुम्ही असं केलंत तर काय होईल सांगतो...‘माझी ध्येये ठरलेली आहेत,’ असं म्हणून तुम्ही मोठ्या उत्साहात व आवेशानं सुरुवात कराल; पण हे सगळं एकाच वेळी साधणं तुमच्यासाठी कठीण होत जाईल आणि एके दिवशी तुम्ही हे सगळंच सोडून द्याल...यू विल जस्ट क्विट!

अशा वेळी तुम्ही म्हणाल, ‘अरे छोडो यार...असं नुसतं म्हणून काय होतंय. हे सगळ्यांना जमत नाही. काही लोक करतात हे...ते ‘इन बॉर्न’ असतं. हे डाएटिंग वगैरे माझ्याच्यानं नाही होणार बाबा...’

मग काय; चल, पिझ्झा मागव, पराठे मागव...

अरे यार, हे अभ्यासबिभ्यास माझ्याच्यानं नाही होणार, ते लोक वेगळे असतात. ते ‘जीनिअस’ असतात...

चला, इंटरनेटवर सर्फ करा, इन्स्टाग्रामवर मुलींच्या फोटोंना लाईक्‍स द्या....

तुम्ही अशा प्रकारे ‘क्वि‍ट’ करता आणि ते तुम्ही एकदम करत नाही.

‘मी माझी ध्येये वगैरे गुंडाळून ठेवतोय,’ किंवा ‘मी काहीही करणार नाहीये,’ असं तुम्ही म्हणत नाही; पण हळूहळू तुम्ही तुमच्या ध्येयांना सुरुंग लावायला सुरुवात करता. तुम्ही वेळ वाया घालवू लागता. आपल्याला ‘फिट’ राहायचं आहे हे समजत असूनही खात सुटता... असं करत करत, हळूहळू तुम्हीच तुमच्या ध्येयांची हत्या करता; पण जर तुम्ही फक्त ‘दीड’ ध्येय ठेवलंत, तर तुम्हाला ते साध्य करता येऊ शकेल. आता तुम्ही म्हणाल की, ध्येय एक असेल किंवा दोन असतील; पण हा ‘दीड’ प्रकार काय आहे? तर त्याचा अर्थ असा की, एकच मुख्य ध्येय बाळगायचं. त्यावर सर्वतोपरी मेहनत घ्यायची. उदाहरणार्थ : ‘नीट’, ‘जेईई’ किंवा ‘आपीएस’ची तयारी. आणि, दुसरं ध्येय ‘अर्धं’ (०.५) जे महत्त्वाचंच असेल,; पण त्यासाठी खूप कठोर मापदंड ठेवायचा नाही. हे ध्येयही दीर्घकालीन व मोठंच असेल; मात्र, थोडं सोपं असेल. उदाहरणार्थ : तुम्हाला दहा किलो वजन घटवायचं आहे; पण ते कठीण आहे, तेव्हा तुम्ही तीन ते चार किलो वजन घटवण्याचं ध्येय बाळगून हे आव्हान थोडं सोपं करू शकता. आता ‘नीट’ पार करणं हे तुमचं मुख्य ध्येय असेल आणि जरी तुम्हाला दहा किलो वजन घटवायचं असलं तरी आत्ता तुमचं तीन ते चार किलो वजन घटवण्याचं लक्ष्य असेल...अशा प्रकारे एक मुख्य व एक अर्धं असं मिळून तुमचं ‘दीड’ ध्येय ठरेल.

समजा, तुम्हाला ‘सिक्स पॅक्‍स’ हवे असतील; पण आता तुम्हाला त्यासाठी मेहनत घेणं शक्‍य नाहीये, तर तुम्ही किमान ढेरी सुटू नये यादृष्टीनं तरी प्रयत्न करू शकता; पण तेच जर तुम्ही आयुष्यात अशा टप्प्यावर असाल की, तुम्ही कॉलेजचं ॲडमिशन वगैरे सगळं पार पाडलेलं आहे, तर अशा वेळी तुम्ही ‘सिक्‍स पॅक्स’ बनवणं हे मुख्य ध्येय बाळगू शकता. आणि, कॉलेजमध्ये मला ‘टॉप थर्टी पर्सेंट’मध्ये यायचं आहे असं दुय्यम ध्येय बाळगू शकता किंवा वर्गात ‘टॉप फाईव्ह पर्सेंट’मध्ये येणं हे मुख्य ध्येय आणि शरीर कमावणं हे दुय्यम ध्येय बाळगू शकता.

काही लोक ही दोन्ही साध्य करण्याच्या क्षमतेचे असतील; पण सामान्यतः लोकांना ‘दीड’ ध्येय गाठता येतं. फक्त एकच ध्येय ठेवलं तर ते तुम्हाला कंटाळवाणं होऊ शकतं. म्हणजे, फक्त अभ्यास एके अभ्यास किंवा व्यायाम एके व्यायाम असं. मात्र, तेच जर एका ध्येयाच्या जोडीला दुसरं ध्येय असेल तर तुम्हाला त्यामुळे थोडं ‘रिफ्रेश’ वाटतं. कारण, ते ‘अर्धं’ ध्येय खूप ताणयुक्त नसतं, त्यामुळे तुम्ही एक ‘मेन’ ध्येय ठेवा आणि दुसरं ‘मीडियम एफर्ट’ ध्येय बाळगा. हळूहळू तुम्ही हे ‘दीड’ ध्येय साध्य कराल. त्यातलं एक ध्येय पूर्ण झालं की त्याजागी दुसरं अर्धं ध्येय बाळगू शकता किंवा काही वेळा तुमचं ‘एक’ असणारं ध्येय ‘अर्धं’ होईल आणि ‘एक’च्या जागी दुसरं ध्येय येईल. असं दीड...दीड...करता करता तुमच्या आयुष्यातली सगळी ध्येये पूर्ण होतील. याला कदाचित काही वर्षंसुद्धा लागतील; पण हळूहळू तुम्ही सगळी ध्येये साध्य कराल. तुम्ही आयुष्यात काहीच ध्येय बाळगलं नाहीत तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. मात्र, जर तुम्ही ‘दीड’ ध्येय बाळगलंत तर मात्र तुम्ही सगळं साध्य करू शकाल. तेव्हा मित्रांनो, याबाबत विचार करा. तुमचं ‘प्रायमरी गोल’ आणि ‘सेकंडरी गोल’ ठरवा आणि त्यात यशस्वी व्हा.

टेक केअर.

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

(हे पाक्षिक सदर आता समाप्त होत आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT