सप्तरंग

कुटुंबातून दुरावलेली मुले

आपल्याकडे प्राचीन काळापासून एकत्रित कुटुंब पद्धती आहे. आता कालमानानुसार त्यात बदल होताना दिसतो.

सकाळ वृत्तसेवा

-प्रा. मधुकर चुटे

कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा चित्रपट टीव्ही पाहून मित्रांच्या बरोबरीने हा घर सोडून पळून येण्याचा प्रयोग अविचारानेच लहान मुले-मुली करीत असतात. आपण काय करतो याची त्यांना तितकीशी जाणीवही नसते. मात्र मोठ्या शहरात -महानगरात आल्यानंतर खरी वस्तुस्थितीची जाणीव होते. त्यांना आपल्या घरी किंवा कुटुंबांमध्ये परत जाण्याची इच्छा असूनही मार्ग सापडत नसतो.

आपल्याकडे प्राचीन काळापासून एकत्रित कुटुंब पद्धती आहे. आता कालमानानुसार त्यात बदल होताना दिसतो. आधुनिकीकरण,नागरीकरण किंवा छोटी कुटुंब व्यवस्था या अशा अनेक कारणांमुळे ही एकत्र कुटुंब पद्धती विभक्त स्वरूपात आकाराला येत असल्याचे पाहायला दिसून येतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या छोट्या कुटुंब व्यवस्थेतही तिघा चौघांमध्ये एकमत होत नाही किंवा योग्य सुसंवादही आढळत नाही. हीच परिस्थिती सामाजिक स्तरावर पाहायला मिळते.

समाज म्हणून एकत्र राहात असतानाच अनेक प्रकारचे वादविवाद सातत्याने होत असतात. शिवाय गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी या कारणांमुळे सामाजिक स्तरावरचे एक करुणाजनक चित्रही पाहायला मिळते. याच गरिबी आणि दारिद्र्यामुळे अनेक घटना घडत राहतात. गुन्हेगारी हा त्यातला एक भाग असेल परंतु पोट भरण्यासाठी किंवा असमंजसपणामुळे आपले घर सोडून पळून जाणाऱ्या मुलामुलींची संख्या हा सामाजिक स्तरावरचा एक विचित्र भाग अनुभवायला येतो.समाजातील कोवळ्या वयातील ही लहान मुले-मुली आपले स्वतःचे घर सोडून आई-वडिलांना दूर लोटून जेव्हा घरातून पळ काढतात त्यावेळी एकत्र असलेल्या या समाजातली वेदना तीव्रपणे जाणवत राहते. बऱ्याचदा ही मुले रेल्वे प्लॅटफॉर्म, बस स्थानक किंवा फुटपाथ किंवा मित्राकडे आश्रयाला असतात. त्यांचे वय लक्षात घेता, त्यांची विचारणा केल्यास वेगवेगळी करणे ते घर सोडून -पळून आल्याचे सांगतात.

समाजातच राहायचे पण घरापासून पळून निघायचे आणि मग त्याच समाजाच्या आश्रयाने पुढच्या आयुष्याची वाटचाल होते का हे चाचपडत राहायचे असा हा काहीसा गंभीर स्वरूपाचा किंवा गंमतीदार स्वरूपाचा प्रकार आहे. घरातून पळून यावेसे वाटणे याचाच अर्थ कुटुंब स्तरावर मोठाच विसंवाद किंवा विपरीत परिस्थिती असल्याचे दिसून येते. अर्थातच ज्या वयात ही मुले पळून येतात ते वय काही विचार करण्यासारखे वय नसते. यातल्या अनेक लहान मुलांचा गैरवापर देखील होत असतो. घरदार नाही. कुटुंब नाही डोक्यावर छप्पर नाही अशावेळी निम्मी मुले ही भीक मागून किंवा भीक मागण्यासाठी त्यांचा वापर करून कसेतरी आपले आयुष्य जगत असतात. अशा ही कोवळ्या वयातच आपले संपूर्ण आयुष्य कोमेजल्यासारखी त्यांची परिस्थिती असते. जगण्याचा आधार ते शोधत असतात. परंतु त्याची खात्री आणि हमी नसल्याने निराधार आणि निराश्रय अवस्थेमध्ये या कोवळ्या मनाला आपले आयुष्य जबरदस्तीने सहन करावे लागते. प्रामुख्याने सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये हा प्रकार घडतो.

समाजात राहून कुटुंबापासून हरवणारी आणि समाजातच आश्रय घेऊ पाहणारी ही मुले म्हणजे सामाजिक स्तरावरच्या एका वेदनेचाच अविष्कार ठरतो. कायदा किंवा नियमाने पोलिसांना जरी याविषयीची कामे करावी लागत असतील तरीसुद्धा संवेदनशीलतेशिवाय त्यात यश मिळू शकत नाही. मोठ्या संख्येने मुलांचे हरवणे हे धक्कादायक आहे. परंतु कुटुंबापासून, घरापासून दुरावलेल्या या कोवळ्या मुलांना पुन्हा त्यांचे आयुष्य बहाल करण्याचे मोठे काम घडून येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT