communication skills sakal
सप्तरंग

मानससूत्र : घटक संवादकौशल्याचे

प्रत्यक्ष भेटीपासून संवाद कसा करावा इथपर्यंतच्या गोष्टी आपण यापूर्वीच्या भागात पाहिल्या. कोणतेही नाते दृढ करण्यासाठी; तसेच व्यावसायिक सहयोग वाढविण्यासाठी संवादकौशल्य अतिशय जबाबदारीने वापरावे लागते.

सकाळ वृत्तसेवा

प्रत्यक्ष भेटीपासून संवाद कसा करावा इथपर्यंतच्या गोष्टी आपण यापूर्वीच्या भागात पाहिल्या. कोणतेही नाते दृढ करण्यासाठी; तसेच व्यावसायिक सहयोग वाढविण्यासाठी संवादकौशल्य अतिशय जबाबदारीने वापरावे लागते.

- डाॅ. जयश्री फडणवीस

प्रत्यक्ष भेटीपासून संवाद कसा करावा इथपर्यंतच्या गोष्टी आपण यापूर्वीच्या भागात पाहिल्या. कोणतेही नाते दृढ करण्यासाठी; तसेच व्यावसायिक सहयोग वाढविण्यासाठी संवादकौशल्य अतिशय जबाबदारीने वापरावे लागते. म्हणूनच आपला संवाद परिणामकारक होण्याकरिता त्यात काही महत्त्वाच्या घटकांचा, तत्त्वांचा अंतर्भाव व्हायला हवा.

१. विश्वास (Trust)

कोणतेही नाते विकसित होण्याकरिता विश्वासाचा भक्कम पाया लागतो. संवाद करताना आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा या दोन्हींचा समन्वय आपल्या संभाषणात असायला हवा. त्याने संवादाला सहजता येऊन मानसिक सुरक्षिततेची भावना निर्माण होते. समोरच्याचे ऐकून घ्यावेसे वाटते. परस्परांचे हेतू, दृष्टिकोन; तसेच विचार नीट समजून-ऐकून घेतल्यावर पुढील वैयक्तिक; तसेच व्यावसायिक वाटचाल अधिक सुकर होते.

२. संवादातील स्पष्टता (Clarity)

समोरच्याला समजेल अशा भाषेत स्पष्ट; पण नम्रपणे बोलणे. आपली संकल्पना किंवा एखादी माहिती सोप्या भाषेत मांडणे जेणेकरून कोणतेही गैरसमज होणार नाहीत ही काळजी घेत बोलणे. साध्या सोप्या संवादात कोणत्याही विषयाचे शब्दजाल (Jargon) वापरणे टाळलेले बरे. खूपच तांत्रिक बाबींचाही उल्लेख नको. आपल्या संवादात अधिक स्पष्टता येण्याकरिता अनेक उदाहरणांची जोड देता येईल. संवाद समन्वय साधणारा असेल, तर दोघांनाही स्वतःची; तसेच व्यवसायाची ध्येये आणि उद्दिष्टे साधण्यास एकमेकांची मदतच होईल.

३. भाषा (Language)

भाषा हे माणसाला मिळालेले वरदान आहे. इतर कोणत्याही प्राण्याला भाषिक संवाद साधता येत नाही. भारतात; तसेव परदेशात आपण विविध भाषा वापरत असलो, तरीही आपली स्वरशैली (Tone) नेहमीच नम्र; पण ठाम असायला हवी. कोणतीही भाषा वापरताना सर्वांत जास्त लक्ष द्यावे लागते ते शब्दांकडे. प्रत्येक शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. हे अर्थ आजूबाजूच्या संदर्भावर अवलंबून असतात. त्यामुळे स्वतःला व्यक्त करताना आवश्यक तेवढेच योग्य शब्द वापरलेले बरे. शब्द शक्तिशाली आहेत, जेव्हा आपण योग्य शब्द वापरतो, तेव्हा आपली व समोरच्याची संवाद-समज दहापटीने वाढते.

आज संस्कृतीबरोबरच समाजही बदलत आहे, समाजाची भाषाही बदलते आहे. समाज अधिक मुक्त विचारसरणीचा आणि प्रगतिशील झाला आहे. त्यातून निर्माण झालेला तरुण वर्ग, त्यातील काही लोक नकळत, बिनधास्त व्यक्तिमत्वाचे प्रदर्शन करीत असताना अपशब्द, तर कधी आक्षेपार्ह शब्द वापरून जातात; पण ते येणाऱ्या भविष्यात घातक ठरू शकते. त्यामुळे आपण कोणत्याही ग्रुपमध्ये असलो, तरी ही संवादाची भाषा कायमच दर्जेदार असण्याची सवय लावलेली बरी नव्हे, ते व्यावसायिक प्रगतीस आवश्यकच आहे.

४. प्रासंगिकता (Relevance)

संवादामध्ये श्रोता आणि वक्ता यांच्यातील संबंध प्रसंगानुसार बदलत असतो. उत्तम वक्ता हा समोरच्याला काय आवडेल आणि कोणत्या प्रकारे बोलल्यास त्याला समजेल आणि संवाद अर्थपूर्ण होईल याची काळजी घेतो. असे करताना श्रोत्याचे ज्ञान, अनुभव; तसेच वृत्ती (attitude) यांचे भान ठेवावे लागते. यामुळे श्रोता संवादाकडे विशेष लक्ष पुरवितो. परिणामतः एक उत्तम गाठ भेट झाल्याचा आनंद मिळतो.

५. समस्या सोडविण्याची वृत्ती (problem solving attitude)

अनेकदा गप्पांच्या ओघात समोरील व्यक्ती थोडी काळजीत आहे, काहीतरी समस्या आहे हे जाणवते, तेव्हा आपला संवाद हा आश्वासक असला पाहिजे. ‘अरे बापरे! असं कसं झालं?’ यापेक्षा ‘होतं कधी तरी असं! पण यात माझी काही मदत होत असेल तर नक्की सांगा!’ असे संवाद आपल्या व्यक्तिमत्त्वालाही प्रभावी बनवितात. तुम्ही निर्माण झालेल्या समस्येला चिघळवण्यापेक्षा त्यातून मार्ग शोधणारी व्यक्ती होता. समोरच्याला हिंमत देणारी माणसे नेहमीच हवीहवीशी; तसेच जवळची वाटतात.

६. आदर आणि आभार (Thank you)

प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधताना त्या व्यक्तीला- मग ती लहान असो वा मोठी- सन्मानाने वागवा. आदर द्या. यातून तुमची चांगली वृत्ती समोरच्याला दिसेल. या व्यक्तीला पुन्हा भेटायला, संवाद साधायला नक्कीच आवडेल. भेटीअंती आभार मानायला विसरू नका.

कोणतेही नाते यशस्वी होण्यासाठी प्रेमळ संवाद, कौतुक आणि समजूतदारपणा असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT