Honesty Sakal
सप्तरंग

मानससूत्र : प्रामाणिकपणा

एका कंपनीचे सीईओ वर्षभरातच निवृत्त होणार होते. त्यांना त्यांच्या जागी नवीन सीईओ नेमायचा होता. त्याकरिता आपल्याच कंपनीतील १० हुशार व्यक्तींची त्यांनी निवड केली.

सकाळ वृत्तसेवा

- डाॅ. जयश्री फडणवीस

एका कंपनीचे सीईओ वर्षभरातच निवृत्त होणार होते. त्यांना त्यांच्या जागी नवीन सीईओ नेमायचा होता. त्याकरिता आपल्याच कंपनीतील १० हुशार व्यक्तींची त्यांनी निवड केली. त्या सर्वांना एकत्र बोलावून प्रत्येकाला एक बी रुजवायला दिले, आणि सांगितले की सहा महिन्यांनंतर ज्याचे रोपटे सुंदर फुलले असेल, वाढलेले असेल, त्याची मी सीईओ पदावर नियुक्ती करीन.

झाले! पुढच्याच आठवड्यापासून त्या सर्वांमध्ये ‘माझे रोपटे किती छान, निकोप वाढते आहे,’ याची चर्चा सुरू झाली; पण त्यांच्यातील राम मात्र गप्प, चेहरा पाडून उभा होता- कारण त्याने पेरलेल्या बीला साधा अंकुरही फुटला नव्हता. सहा महिने झाले आणि इतर सर्व नऊ मंडळी आपापली सुंदर रोपटी घेऊन सीईओ ऑफिसमध्ये जमली.

रामने विचार केला जाऊच नये ऑफिसला; पण त्याच्या पत्नीने त्याला सांगितले, की परीस्थितीचा स्वीकार करा आणि जे घडलंय ते सीईओंना नेऊन दाखवा. आणि कार्य आश्चर्य! जे नऊ जण सुंदर रोपटी घेऊन आलेले असतात, ते सोडून रामची सीईओ म्हणून निवड होते. कारण सीईओने सर्वांनाच निकृष्ट, मृत बियाणे दिले होते- जे कधीच रुजणारे नव्हते.

यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाचा गुण म्हणजे प्रामाणिकपणा. वैयक्तिक; तसेच व्यावसायिक आयुष्यात प्रामाणिक असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातूनच नैतिक मूल्यांचा जन्म होतो. जसे की विश्वास, दीर्घकालीन नातेसंबंध, पारदर्शकता, सहानुभूती आणि मानसिक प्रगल्भता. या सर्वांमुळे यश- कीर्ती मिळवण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत.

विश्वासार्हता : प्रामाणिकपणा हा विश्वासाचा पाया आहे. कोणत्याही परस्पर संबंधांमध्ये प्रामाणिकपणा असेल, तर प्रत्येक संवादामधून व्यावसायिक व वैयक्तिक नात्यातील विश्वासार्हता वाढीस लागते. नातेसंबंधांमध्ये प्रगल्भता आणि सामंजस्य डोकावते. प्रामाणिक व ताणरहित संवादांमुळे एकमेकांविषयी असलेली सहानुभूती अथवा आदर टिकून राहतो. ताणरहित अशासाठी, की खरे बोलण्याचा फायदा काय? तर आपण जे काही बोललो आहे, अथवा सांगितले आहे, त्याची आठवण ठेवण्याची गरज नाही- कारण सत्य हे कधीच बदलत नाही.

संघर्ष निराकरण (conflict Resolution) : प्रत्येक नातेसंबंधात आपल्या भावना, गरजा आणि वाटणारी काळजी प्रामाणिकपणे व्यक्त केल्यास कोणत्याही प्रकारचे संघर्ष सामोपचाराने मिटवता येतात, मग ते वैयक्तिक असोत, की सांघिक. याचा परिणाम पारदर्शक संवादास पोषक ठरतो. व्यवसायासाठी आश्वासक वातावरण निर्माण होते. समाजाला न घाबरता आपल्या प्रामाणिक तत्त्वांना आपण चिकटून राहिलो, तर व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होईल.

नैतिक आचरण (Ethical conduct) : प्रामाणिकपणाचा एक अविभाज्य घटक म्हणजे नैतिक आचरण. नैतिकता योग्य निर्णयक्षमता; तसेच जबाबदार वर्तणुकीस पोषक ठरते. प्रामाणिक व्यवहारामुळे सामाजिक प्रतिष्ठा; तसेच विश्वासार्हता वाढत जाते. विविध क्षेत्रांमध्येही पदार्पण करता येते.

अनेक क्षेत्रांतील नेतृत्व करण्याचा मानही प्राप्त होतो. उदाहरणच घ्यायचे झाले, तर अनेक मोठ्या उद्योग समूहांमधे आपण टाटा, गोदरेज या ब्रॅंडच्या कोणत्याही वस्तू अगदी डोळे झाकून घेतो. या ब्रँडच्या दर्जाविषयी कोणतीही शंका आपल्या मनात येत नाही. पिढ्यान्‌पिढ्या कमावलेली विश्वासार्हता!

आत्मपरीक्षण व आत्मविकास : प्रामाणिकपणाचा सर्वांत जास्त फायदा हा आत्मपरीक्षणाकरता होतो. जितके स्वतःला नीट समजून घेऊ, तितकाच आपल्या विकासाला; तसेच प्रगल्भतेला उजाळा मिळत जाईल. स्वतःतील गुण-दोषांची पारख करून, स्वतःमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत ते लक्षात येईल.

करत असलेल्या प्रत्येक चांगल्या-वाईट कृतीची जबाबदारी स्वीकारण्याची ताकद येईल. चुकांमधून शिकत जाण्याची संधी तर मिळेलच आणि यामधूनच व्यक्तिमत्त्वातील विधायकता कायम टिकून राहील. एखादी व्यक्ती अभ्यासात अथवा व्यवहारात खूप हुशार नसेल; पण प्रामाणिकपणा या एकाच गुणामुळे, त्या व्यक्तीचा गुणवत्ता यादीतला नंबर वरचाच असेल. कोणताही व्यवसाय अथवा नात्याला आश्वासने, अटी आणि शर्तींची गरज नसते. गरज असते ती प्रामाणिकपणा आणि विश्वासांची!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT