सप्तरंग

मानससूत्र : सकारात्मक स्वयंसूचना

‘शुभ बोलावं, नेहमी चांगलंच बोलावं! वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते!’ ही वाक्ये आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत.

सकाळ वृत्तसेवा

- डाॅ. जयश्री फडणवीस

A ffirmation या शब्दाचे अजूनही काही अर्थ आहेत- उदाहरणार्थ, खात्रीपूर्वक सत्य विधान, अनु‌मोदन, पुष्टी, एखादी गोष्ट निश्चितपणे सांगणं किंवा जाहीरपणे पाठिंबा देणं; पण आज आपल्या लेखात आपण ‘सकारात्मक स्वयंसूचना’ याविषयी थोडी माहिती घेणार आहोत.

‘शुभ बोलावं, नेहमी चांगलंच बोलावं! वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते!’ ही वाक्ये आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. अगदी बालवयातच आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी नकळतच एक ‘सकारात्मक स्वयंसूचना’ आपल्या अंतर्मनात रुजवली आहे. कारण सकारात्मक विचारांची आणि संस्कारांची ताकद खूप मोठी आहे; पण त्या ताकदीचा नेमका वपार कोणत्या पद्धतीनं केल्यास जास्त फायदा होईल, हे तंत्रदेखील नीट शिकायला हवं.

आपलं मन सतत काही ना काही विचारांच्या अधीन असतं. शास्त्रज्ञांच्या मते, माणूस चोवीस तासांमध्ये जवळजवळ ६० ते ६५ हजार विचार करत असतो; पण त्यात नकारात्मक विचारांचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे एक दर्जेदार आयुष्य जगण्यास आवश्यक, सकारात्मक विचारांचं प्रमाण खूपच कमी असतं.

याकरता आपण ‘सकारात्मक स्वयंसूचनांच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित आणि हव्या असणाऱ्या आवश्यक विचारांचा अंतर्भाव करू शकतो अथवा ‘सकारात्मक स्वयंसूचना’आपल्या अंतर्मनात रुजवता येतात. यासाठी नियमित सूचना सरावाची गरज असते.

‘स्वयंसूचना’ म्हणजे एखादा विशिष्ट विचार सातत्यानं करून तो अंतर्मनात रुजवणं. आपल्याला एखादी गोष्ट हवी असल्यास, आपलं एखादं ध्येय साध्य करायचं असत्यास त्याविषयी ‘स्वयंसूचना’ पद्धतशीरपणे तयार करा. रोजच ती गोष्ट जणू काही आत्ताच घडत आहे, असं डोळ्यांसमोर आणणं, त्यावर मनापासून विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वयंसूचना निदान दोन वेळा म्हणजे एकदा सकाळी उठल्यावर आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी आपल्या अंतर्मनाला देणं अपेक्षित असतं.

‘स्वयंसूचना’ सायकॉलॉजिकली; तसंच न्युरॉलॉजिकली आपल्या अंतर्मनावर काम करत असतात. विधायक विचारांची पुनरावृत्ती करून, त्या विचारांची जोपासना करता येते. त्या पद्धतीच्या पेशींचे विधायक वर्तनास प्रवृत्त करतील असे नमुने मेंदूत तयार करणं हे सहज शक्य होऊ लागतं.

‘स्वयंसूचनां’बद्दल विज्ञान असं सांगतं, की सात‌त्यानं दिलेल्या ‘स्वयंसूचना’ आपल्या मेंदूतील ‘रिवॉर्ड सेंटर’ला कार्यरत करतात. त्यातून मग ‘डोपामाइन’ नावाचं संप्रेरक अथवा रसायन झिरपू लागतं. ज्यामुळे मानवी मनाला उत्साह, आनंद; तसंच प्रेरणादायक विचारांची अनुभूती होऊ लागते. जिच्यामुळे अपेक्षित लक्ष्य, ध्येय साध्य करण्याच्या प्रक्रियेला वेग प्राप्त होतो.

मानसिक आरोग्य संतुलनातही ‘स्वयंसूचनां’चा भरपूर प्रमाणात उप‌योग केला जातो. अनेक उपचारपद्धती या स्वयंसूचनांवर आधारित असतात. Cognitive behavioral therapy (CBT) मध्ये असं म्हटलं आहे, की ‘विचार बदला, आचार बदलेल!’ नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचारांची पेरणी ही स्वयंसूचनांद्वारे केली जाते.

स्वयंसूचनांचा अनेकांना फायदाच होताना दिसतो; पण व्यक्तिपरत्वे लागणारा वेळ आणि परिणामांत फरक होऊ शकतो, कारण प्रत्येक व्यक्तीचे संस्कार, श्रद्धा-अंधश्रद्धा; तसंच स्वयंसूचना अंतर्मनात रुजवण्यासाठी लागणारं सातत्य यात फरक होतो. स्वयंसूचना लिहिण्याची विशिष्ट पद्धत आहे. ती नीट समजून घ्यायला हवी.

  • सुस्पष्टता हवी - मला नेमकं काय, कधी व कुठं हवं आहे?

  • स्वयंसूचनेची भाषा सकारात्मक असावी.

  • स्वयंसूचना ही चालू वर्तमानकाळात लिहावी.

  • जणू काही आपल्याला अपेक्षित गोष्ट आत्ताच घडत आहे.

  • आपलं कार्यालय, व्यवसाय अथवा कुटुंब यासाठी सूचना लिहीत असाल, तर तसा स्पष्ट उल्लेख असावा.

  • शेवटी अपेक्षित गोष्ट प्राप्त झाली आहे, असं समजून विश्वनिर्मात्याकडे कृतज्ञता व्यक्त करावी.

स्वयंसूचनेची काही उदाहरणं

  • दिवसेंदिवस मी अधिक निरोगी, सशक्त व समृद्ध होत आहे.

  • नुकत्याच झालेल्या परीक्षेत उत्तम यश मिळवून मी पेढे वाटत आहे.

  • माझ्या करिअरमध्ये मला अनेक संधी उपलब्ध झाल्यानं माझ्या आवडीचं क्षेत्र मी निवडलं आहे.

कल्पनाशक्तीचा वापर करत, योग्य चित्र डोळ्यासमोर आणत संपूर्ण आत्मविश्वासानं अंतर्मनाला ‘स्वयंसूचना’ द्या. तसंंच ध्येयप्राप्ती करून एक सुखी, समृद्ध, सकारात्मक आयुष्य जगा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT