Oxypark Sakal
सप्तरंग

‘गुण’कारी परसबाग : आपले ‘ऑक्सिपार्क’ आपल्या दारी

कोरोनामुळे मानवी जीवनातील ऑक्सिजनचं अनन्यसाधारण महत्त्व सर्वसामान्य माणसालादेखील आता समजून चुकलं.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनामुळे मानवी जीवनातील ऑक्सिजनचं अनन्यसाधारण महत्त्व सर्वसामान्य माणसालादेखील आता समजून चुकलं.

- डॉ. किरण पाठक

सन २०२० चा मे- जून महिना. सगळ्या जगभर कोरोनाचा धुडगूस चालू होता. सगळी हॉस्पिटल्स कोरोनाग्रस्त रुग्णांमुळे खचाखच भरलेली होती. सकाळ, दुपार, संध्याकाळ येणारे फोन एकच विचारत होते, ‘बेड शिल्लक आहे का?’ एक दिवस रात्री दोन वाजता आम्हाला फोन आला, ‘‘डॉक्टर, वडील सिरीअस झालेत. प्रचंड धाप लागलेली आहे. खरं तर माझं कुटुंब पुण्यात असल्यामुळे गेले तीन दिवस खटपट करून मी बेड मिळवलाय पुण्यात. आत्ता लातूरहून वडिलांना घेऊन कारने निघालोय; परंतु वडील खूपच अस्वस्थ आहेत. मी गाडी सोलापूरकडे वळवतोय. मला काहीही करून वडिलांना फक्त एक बेड ॲडजस्ट करून द्या किंवा निदान त्यांना ऑक्सिजन लावून सोबत सिलिंडरही द्या.’

खरोखरच तासाभरात ती कार हॉस्पिटलच्या दारात आली. आत धापा टाकत असलेला रुग्ण. वय सत्तरीच्या घरातलं. हॉस्पिटलमध्ये संपूर्ण सोलापुरात कुठेही एकही बेड शिल्लक नाही ही स्थिती. मग कसातरी एक ऑक्सिजन सिलिंडर ॲडजस्ट केला. कारमध्येच त्या रुग्णाला ऑक्सिजन लावला. काही अत्यावश्यक औषधं दिली. काही सूचना नातेवाईकाला दिल्या आणि ‘कुठंही न थांबता आता पुणे गाठा. ॲडमिट करा त्यांना तिथं..’ हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच कार दिसेनाशी झाली होती.

ही एक वानगीदाखल कथा. खरंतर त्या काळात २४ तास हे असंच सुरू होतं. या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं लक्षण म्हणजे ऑक्सिजनची कमतरता. त्यातून होणारी जीवाची घुसमट एकूणच या कोरोनानं मानवी जीवनातलं ऑक्सिजनचं महत्त्व अगदी ठळठळीतपणे अधोरेखित केलं. आपल्या अवतीभवतीच्या हवेत ऑक्सिजनची कमी नसली, तरी हा हवेतला ऑक्सिजन शरीराला पुरवणारी यंत्रणा अर्थात आपली फुफ्फुसं या आजाराला बळी पडत होती आणि ऑक्सिजन शरीरात गेला नाही की सगळी गडबड सुरू व्हायचा.

कोरोनामुळे मानवी जीवनातील ऑक्सिजनचं अनन्यसाधारण महत्त्व सर्वसामान्य माणसालादेखील आता समजून चुकलं. खरंतर आपण सगळीच माणसं जन्माला आल्यापासून अव्याहत जो ऑक्सिजन श्वासावाटे निसर्गातून घेत आहोत, त्या हवेतल्या ऑक्सिजनची पातळीच उणावली तर... तर..समस्त मानव जातीचं अस्तित्व धोक्यात येणार हे निश्चितच. हे माहीत असूनही एखाद्या आजारात ऑक्सिजन कमी पडतो, तेव्हा ऑक्सिजन प्लांट टाकायची आमची तयारी.

तहान लागली, की विहीर खणावी तसा हा प्रकार; पण निसर्गातून सहजासहजी अगदी फुकट मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत मात्र आम्हाला अजिबातच नाही. आहे की नाही गंमत!! खरंतर हवेतल्या ऑक्सिजनची पातळी टिकवण्यासाठी (एकदा कोरोना व्हायरसनं डोळे उघडल्यानंतर का होईना) आपण सर्वांनीच आटोकाट प्रयत्न करायला हवेत आणि हे प्रयत्न म्हणजे नेमकं काय तर आपल्या अवतीभवती भरपूर वृक्ष लागवड करणं.

कारण आपल्याला जगण्यासाठी लागतो तो ऑक्सिजन- नेमका तोच वनस्पती बाहेर टाकत असतात. केवळ ऑक्सिजनच नाही, तर या वनस्पती आपल्याला अन्न म्हणूनदेखील उपयोगी पडतात. शिवाय औषध, वस्त्र, निवाराही पुरवतात. ही वृक्षवल्ली म्हणजे आपल्याभोवतीचे ‘नॅचरल ऑक्सिपार्क’च आहेत. हे ऑक्सिपार्क आपण आपल्या दारी जमतील तसे, असेल तेवढ्या जागेत जोपासायला हवेत. हीच दूरदृष्टी संतांना होती, म्हणूनच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ किंवा ‘महावने लावावी’ असं सहज तत्त्वज्ञान अनादी काळापासून भजन कीर्तनाच्या माध्यमातूनही ते सांगून गेले.

(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ आणि अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT