Vedic Culture Sakal
सप्तरंग

संस्कृतीच्या केंद्रस्थानी वृक्षच!

भारतीय दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा इतिहास म्हणतो, त्याची सुरुवात द्वापारयुगापासून होताना दिसते. या युगात सृष्टी (निसर्ग) आपल्या सहजतेपासून बरीच दूर गेली होती.

सकाळ वृत्तसेवा

भारतीय दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा इतिहास म्हणतो, त्याची सुरुवात द्वापारयुगापासून होताना दिसते. या युगात सृष्टी (निसर्ग) आपल्या सहजतेपासून बरीच दूर गेली होती.

- डॉ. राजेद्रसिंह saptrang@esakal.com

भारतीय दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा इतिहास म्हणतो, त्याची सुरुवात द्वापारयुगापासून होताना दिसते. या युगात सृष्टी (निसर्ग) आपल्या सहजतेपासून बरीच दूर गेली होती. सर्व जीव आणि भावांमध्ये विभिन्नता येऊ लागली होती. ज्याच्यामुळे विविध विद्या आणि कलाकृतींची निर्मिती झाली. त्यांचं विभाजन होऊन अनेक शास्त्रांची निर्मिती झाली. चरितार्थ चालवण्यासाठी कला आणि तंत्रज्ञानाची आवश्‍यकता भासते, त्यामुळे सृष्टीची जटिलता वाढत गेली, शेती सरळ राहिली. परिणामी, धान्य उत्पादनासाठी प्रयत्न करावे लागले. ‘यथा कथा च विधया अन्नम् बहुकूनीर्तः’ या विविध शिल्पे आणि कलांच्या वहनासाठी रेलिंग बनली आहे. काही वृक्षांच्या चौफेर चबुतरा बनला आहे. काही मुद्रांमध्ये वृक्ष एकटा आहे. वृक्षाची पूजा करणारे अनेक चेहरे आहेत, त्यांना पाहून असं वाटतं, की वृक्षाची पूजा पुरातनकाळापासून होत आली आहे.

याच कारणामुळे इथं पूजेने पूर्ण रूप धारण केलं आहे. या काळात वृक्षांच्या सभोवती बनलेल्या व्यवस्थेला आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या काळातील लोकांचं जीवन पूर्णपणे निसर्गमय असल्याचं लक्षात येतं. वृक्ष प्राणरक्षक आणि ज्ञानदाता असल्याचं लोकांना ज्ञान तर होतंच, शिवाय त्यांच्या सहज जीवनासाठी वृक्ष सुखदाताही होता. खाण्या-पिण्याची आवश्यक पूर्तता वृक्षांपासून व्हायची आणि लोकांच्या निवाऱ्यासाठी वृक्ष घराची भूमिका बजावायचे. वृक्षांशिवाय जीवन शक्य नाही, असा निष्कर्ष त्याकाळच्या मानवाने काढला होता. जर आम्ही जीवित वृक्षांना हानी पोहोचविली, तर वृक्ष आमची हानी करू शकतात, या गोष्टीने त्यांच्या मनात घर केलं होतं, त्यामुळे सिंधू खोऱ्यातील संस्कृती वृक्षांभोवती केंद्रित झालेली होती. पक्की घरं, नाले, धातूंची नाणी बनली, तो काळ सिंधू खोऱ्याच्या संस्कृतीचा शेवटचा टप्पा असावा. पण, त्या नाण्यांवर कोरलेल्या मूर्ती त्यांच्या भूतकाळातील व्यवहाराचं प्रकटीकरण निश्चितपणे करत राहिल्या.

सिंधू खोऱ्याच्या संस्कृतीनंतर वैदिक संस्कृतीचा उदय झाला, त्याचं विस्तृत वर्णन आढळतं. ही संस्कृती गंगेच्या खोऱ्यात जोपासली गेली. ही संस्कृती मुळात घनदाट जंगलात राहणाऱ्या ऋषी-मुनींची देणगी होती. या काळात प्राकृतिक वस्तूंची केवळ उपयोगासाठी निर्मिती करून त्यांचा विनियोग सुरू झाला होता.

ही भारतीय संस्कृती निसर्गमय होती; पण हळूहळू त्यात क्रौर्य येऊ लागलं होतं. हे कसं झालं हे कळणं अवघड आहे. पण, रीतिरिवाजांच्या साह्याने काही गोष्टी समजणं शक्य आहे. तरीही ही संस्कृती प्रगती आणि कारणानुबंधाच्या दृष्टीने समजून घेणं अतिशय आवश्यक आहे.

इथला आदिमानव जंगली प्राणी आणि निसर्गाच्या प्रकोपाला संकट मानत नव्हता, उलट निसर्गाने आपल्याला दिलेला प्रसाद समजून तो सन्मानाने स्वीकारत होता; पण मानवाचं मन सुख आणि सुविधांचं इच्छुक असतं. हा लोभच मानवाच्या मनात उद्‍भवला, त्यामुळेच इथं शिकार आणि मासे पकडण्याची हत्यारं, दगडाची तीक्ष्ण हत्यारं, लाकडाचे हातमाग, विविध प्रकारच्या भांड्या-कुंड्यांचे अवशेष यांचं चित्रांकन पाषाणयुगातील लोकांचं जीवनमान समजून घेण्यास हातभार लावतं. जंगलात निर्माण झालेल्या वस्तूंचं संचयन करून आणि शिकार करून ते आपला चरितार्थ चालवायचे. हळूहळू काही लोकांनी इतरांनी गोळा केलेल्या वस्तूंची खरेदी-विक्री सुरू केली. त्यासाठी एक विशेष वर्ग तयार झाला. सुरुवातीला इथं कोणताही वर्ग नव्हता. जसजसं उत्पादन सुरू झालं, तसा वर्गही निर्माण होऊ लागला. त्यासोबतच निसर्गाचं वेगाने शोषण सुरू झालं. मग केंद्रीकरण होऊ लागलं. संपन्न वर्गाच्या हाती राज्यसत्ता आली.

तिथूनच संस्कृतीच्या मुक्कामाचा श्रीगणेशा झाला. या कालखंडात मनुष्य फार पूजा-अर्चा करीत नसे; पण पशू, वृक्ष यांसारख्या नैसर्गिक घटनांना आध्यात्मिक महत्त्व लाभायचं. हा आदिमकाळ शिकारी जमातींचं भौतिक जीवन प्रतिबिंबित करतो. त्यात लोक एकमेकांशी कुठल्यातरी गोत्राने संबंधित राहायचे. आज अस्तित्वात असलेली ‘धराडी’ परंपराही गुण चिन्हवादाची अतिविस्तृत सामाजिक - नैसर्गिक संबंधांचं चांगल्या प्रकारे वर्णन करते. सांख्यकाळातही निसर्गामध्ये पूर्ण आस्था बाळगली जायची, असं त्याच्या आधारे म्हणता येतं.

प्रत्येक जमात कुळांमध्ये विभागली होती. ही कुळं वेगळी ओळख दाखविण्यासाठी चिन्ह अथवा झेंड्याचं नाव प्राणी, झाड, पक्षी अथवा निसर्गातील वस्तूंवरून ठेवायचे. आदिकालीन मनुष्यांना भौतिक जीवनाच्या परिस्थिती त्यांच्या चोहोबाजूंनी असलेल्या पशू-पक्षी आणि झाडांच्या दुनियेने जखडून ठेवायच्या. पशू-पक्षी किंवा झाडांशी आपलं रक्ताचं नातं आहे, असा विश्वास त्यांच्या मनात असायचा. आपल्या गुणचिन्हांना ते आपल्या जातीचा वंशज आणि पूर्वज मानायचे. नवपाषाण युगातील लोकांना शिकारीपेक्षा पिकांच्या सुरक्षेची अधिक चिंता वाटू लागली.

या परिवर्तनाने त्यांची मानसिकताही प्रभावित झाली. शेती नांगरताना, पेरणी आणि कापणी करताना तसंच पाऊस आणि संपत्तीप्राप्तीसाठी आता जादूच्या अनुष्ठानांचा आधार घेतला जाऊ लागला. शिकारी संस्कृतीच्या काळात शेतीवाडी, फळं-फुलं आणि वृक्षांचा पशुजीवनावर होणारा प्रभाव अप्रत्यक्ष मानला जायचा, तोच आता जीवन-मरणाचा प्रश्न बनला. पर्जन्यासाठी आता एकच नव्या ‘शूद्र-वर्णाची’ निर्मिती झाली. या काळात ईर्ष्या, लोभ व क्रूरता लोकांच्या स्वभावात बसली.

आजच्यासारखं भयंकर पर्यावरण संकट त्या वेळी उद्‍भवलं होतं. या संकटातून वाचविण्यासाठी कृष्ण-बलरामासारखे पर्यावरण संरक्षक अंशावतार जन्मले, तेव्हा भौतिक आणि नैतिक शक्तीदरम्यान बुद्ध झाले. या युद्धातही नैतिक शक्तीचा विजय झाला. या युद्धाला ‘महाभारत’ नावाने ओळखलं जातं. हे युद्धही दोन विचारधारांचं युद्ध होतं. एक पक्ष पूर्ण भूमी आणि नैसर्गिक स्रोतांवर नियंत्रण करू पाहात होता, त्याच्यापाशी तांत्रिक ज्ञान, आर्थिक सत्ता आणि अन्य सर्व प्रकारच्या शक्ती होत्या. दुसऱ्या पक्षापाशी पशुपालकांचा नेता कृष्ण होता, त्याने आपलं बालपण गो-पालनात व्यतीत केलं होतं आणि तो जंगलात राहात होता. युधिष्ठिरासारखा निसर्गप्रेमी, अर्जुनासारखा भावुक वीर, भीमासारखा मर्यादित राहणारा बलशाली, नकुल - सहदेवसारख्या नैसर्गिक गीतांना समजणाऱ्या नैतिक शक्ती होत्या. ते निसर्गाच्या चक्राला समजण्याचा आणि वाचविण्याचा प्रयत्न करीत राहिले.

त्यांचा नेता कृष्ण निसर्गचक्राविषयी गीतेत म्हणतात

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।

अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ १६ ॥

(गीता अध्याय ३)

आळस अथवा लोभापोटी आम्ही परिश्रम टाळतो आणि निसर्गाचं चक्र तोडतो. लोभात येऊन गरजेपेक्षा जास्त घेण्याचे आमचे प्रयत्न नैसर्गिक नियमांचा भंग करतात. निसर्गाची विविधता परस्परपूरक आहे. निसर्गात सर्व प्राण्यांच्या गरजांची पूर्तता करणारी सर्व सामग्री उपलब्ध आहे. पण, आम्ही त्यागाशिवाय भोग करीत असू, तर ती निसर्गाची चोरी आहे. वास्तवात त्याग आणि भोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज आम्ही भोग करू इच्छितो; पण त्यासाठी आवश्यक मेहनत टाळत असतो. असं करणारे चोर असतात.

इष्टभोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।

तैर्दत्तानप्रदायभ्यो यो भुङ्‍गे स्तेन एव सः ।। १२ ।।

(गीता अध्याय ३)

तुमच्या यज्ञावर, अर्थात श्रमावर प्रसन्न होऊन ‘देवता’ तुमच्यासाठी इष्ट भोगाच्या वस्तू तुम्हाला देतील. अशाप्रकारे निसर्गाचं ऋण न फेडता म्हणजे आवश्यक श्रम न करता जो खातो, तो निश्चितपणे चोर आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये त्याग आणि भोगाची जी जोडी होती, ‘तेन त्यक्तेन भुंजीथा’ (त्याग करून भोग करा) हे भाष्य निसर्गाच्या संरक्षणाचा सर्वांत मोठा उपाय आहे. आम्ही शारीरिक श्रम करून खात असू, तर निसर्गाचं चक्र तुटत नाही. त्याच्यानंतर काही काळाने मग पर्यावरणविरोधी कलियुगाचं आगमन थांबत नाही. महाभारताच्या काही वर्षांनंतर निसर्गप्रेमी श्रीकृष्ण आणि त्याचे वंशज यादवांचा अंत झाला आणि पर्यावरण विनाशाची लीला पुन्हा सुरू झाली.

पाश्चात्त्य इतिहासकारांच्या नजेरतून सिंधू खोऱ्याची संस्कृती ही वैदिक काळापूर्वीची संस्कृती मानली जात आहे. ही सभ्यता इसवी सनपूर्व ३००० ते १५०० मधील अत्यंत आधुनिक शहरी संस्कृती मानली जाते. या संस्कृतीत निसर्गाचं प्रतीक पिंपळाला जीवनदाता मानलं जायचं. सिंधू खोऱ्याच्या संस्कृतीशी संबंधित मुद्रांमध्ये, भांड्यांवर कोरलेला पिंपळाचा वृक्ष या गोष्टीची साक्ष आहे. या काळात पिंपळाला प्राणदाता, जीवनदाता मानलं गेलं. या काळात देवतांनी पिंपळाच्या शाखांचा मुकुट धारण केला आहे. आपला मुकुट तयार करण्यासाठी ते पिंपळाच्या वृक्षाच्या रक्षणासाठी असुरांशी युद्ध करतात. त्या युद्धात मुख्यतः देवतांचाच विजय होतो. एकदा असुरांचा विजय होऊन ते पिंपळाच्या काही शाखांवर आपलं नियंत्रण प्रस्थापित करतात; पण लवकरच देव असुरांना ठार करतात. अशाप्रकारे वृक्षांना देव मानून त्यांची पूजा करण्याचं काम या संस्कृतीमध्ये भरीवपणे झालं आहे.

देवता, राजा आणि योद्ध्यांचा सारा फौजफाटा या वृक्षांच्या चौफेर असतो. वृक्ष या संस्कृतीच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. या वृक्षाचे रक्षक दिव्य आत्मे असतात. त्यांचं मुख मनुष्यासारखं असायचं आणि उर्वरित भाग अनेक पशूंच्या अंग-प्रत्यांगांनी बनलेला असायचा. अशाप्रकारे तोंडाला ज्ञानाचा गुण आणि उर्वरित शरीर मेंढ्यासारखी तीव्रता, वाघासारखी कुरूपता आणि आक्रमकता, तसंच नागासारख्या विषारी, मृत्युजनक यासारख्या मिश्रित गुणांचं असायचं. काही रक्षकांचं मुख आणि शरीर एकसमान मानलं जातं. एका मुद्रेत पिंपळाच्या वृक्षाचं रक्षण ------सांड करीत आहे. असुर पिंपळाच्या वृक्षावर तुटून पडत आहेत, नंदी त्यांच्यापासून पिंपळाला वाचवत आहे. अकेशिया वृक्षाच्या रक्षणासाठीही नंदी असुरांना बघून सतर्क मुद्रेत उभा आहे. काही मुद्रांमध्ये नागराजानेही वृक्षांच्या सुरक्षेसाठी आपला फणा काढला आहे. अशा अनेक मुद्रा आहेत, ज्यांत अकेशिया आणि पिंपळ वृक्षांच्या रक्षणासाठी केले जाणारे उत्सवरूपी जादुई कर्मकांड आणखी एक लक्ष्य बनले. वसंत आणि कापणीच्या हंगामाचे उत्सव नियमितपणे साजरे केले जाऊ लागले. हे सर्व उत्सव लोकांच्या व्यावहारिक कामाकाजाशी संबंधित होते. या युगात मुख्य ध्येय अन्नधान्याची निर्मिती वाढविणं हेच होतं. मुलं जन्माला घालणारी स्त्री आणि पीक निर्माण करणारी जमीन यांच्यात अदृश्य संबंध आहे, यावर त्यांचा विश्वास होता.

( लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जल-पर्यावरण तज्ज्ञ असून मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT