Feelings sakal
सप्तरंग

सामान्य-असामान्य : भावना प्रधान

नुकतीच ‘गुरुपौर्णिमा’ होऊन गेली. आणि ‘डॉक्टर्स डे’ होऊन गेला. त्यामुळे भावना माझ्याकडे नमस्काराला येऊन गेली.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. संजय वाटवे

नुकतीच ‘गुरुपौर्णिमा’ होऊन गेली. आणि ‘डॉक्टर्स डे’ होऊन गेला. त्यामुळे भावना माझ्याकडे नमस्काराला येऊन गेली. बरोबर एक हसतमुख उमदा तरुण गौरव होता. भावना सुमारे वर्ष-दीड वर्षांपूर्वी कंपनीच्या एचआरबरोबर आली होती.

भावना एक सुंदर तरुणी, अभ्यासात हुशार, बोलण्या वागण्यात चुणचुणीत. त्यामुळे बीटेक झाल्या झाल्या मोठ्या कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. भावना लहानपणापासून खूप हळवी आणि अतिविचारी. चटकन कोणावरही विश्वास ठेवणारी; पण स्वतंत्र विचाराची मुलगी होती. ‘इंडिव्हिज्युअल फ्रीडम’ आणि ‘माझी स्पेस’ या विषयांचा अतिरेक झाल्यामुळे घरच्यांशी सारखे खटके उडायचे.

भांडण मनाला खूप लागून राहायचं. कारण स्वभाव भावनाप्रधान. आणि नावही भावना प्रधान! मग तिनं निश्चय केला- शक्यतो बाहेर बाहेरच राहायचं. वेळीच चांगली नोकरी मिळाल्यामुळे बाहेरच राहायची. घरच्यांशी तुटकपणा आलेला असल्यामुळे सतत आधार शोधायची. प्रेमासाठी आसुसलेली राहायची.

ऑफिसमधल्या विलास नावाच्या मुलाकडे आकर्षित झाली. मैत्री वाढू लागली. ऑफिसबाहेरही भेटी सुरू झाल्या. भावना स्वप्नं रंगवायला लागली. हळुवार नात्याची अपेक्षा करायला लागली. एक दिवस अचानक विलासने तिच्याकडे ‘ती’ मागणी केली. भावना हबकून गेली. तिनं रंगवलेल्या नाजूक स्वप्नांचा चुराडा झाला.

युवा जीवनातला थिल्लर बटबटीतपणा नको असताना एकदम समोर आला. तिनं प्रस्तावाला नकार दिला. मनाला खूप लागलं तिच्या. ब्रेकअपचा निर्णय घेताना खूप घालमेल झाली. ऑफिसचं काम करत राहिली; पण आतून खचली होती. एकटी एकटी राहायची. अश्रू ढाळत बसायची.

ब्रेकअपची बातमी ऑफिसमधे पसरली होतीच. तिला रडताना पाहून संतोष पुढे झाला. त्यानं धीर दिला. महाकष्टानं भावना सावरली. हळूहळू संतोषमध्ये गुंतू लागली. पुन्हा नाजूक भावविश्व. मग तीच मागणी, तोच नकार, तोच चुराडा. संतोष चिडला. जुनाट काकूबाई म्हणून हिणवायला लागला. काही दिवसांनी धीरज, मग नीरज. स्टोरी रिपीट! आता भावना खचली नाही कोसळली, संपली!

पुरुषांना फक्त तेच पाहिजे असतं का? नात्यांची गुंफण, भावनांची वीण नाहीच का? दाखवायची रूपं वेगळी; पण आतून मागणी तीच. वासना तीच. शी:! तिला समस्त पुरुष जातीचा तिटकारा यायला लागला. समाजात स्त्री-पुरुष असतात की नाही? का फक्त नर-मादी असतात? जॉब सोडावा, लांब निघून जावं असं वाटायला लागलं. हा कसला यंग इंडिया? ती एचआरशी बोलली. त्यांनी माझ्याकडे आणलं

... भावना खूप डिप्रेस्ड होती. तिला डिप्रेशनमधून बाहेर काढलं. मग सुरू झाली ‘Insight psychotherapy’ची sessions. खूप भावनाप्रधान असणं, भावनांवर ताबा नसणं, सतत भाव भुकेला असणं, आधाराच्या शोधात असणं, त्यात वाहवत जाणं, माणसाची पारख न करता त्याच्याजवळ जाणं, फसगत, फ्रस्ट्रेशन, सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली. विवेचन झालं. भावना खूप सावरली. कॉन्फिडंट झाली. अती संवेदनशीलता कमी झाली. जीवनाशी परत कनेक्ट झाली. गुरुपौर्णिमा आहे म्हणून नमस्काराला आली.

‘‘पहिल्यांदा मी आले, तेव्हा भानावरच नव्हते. संपलेच होते. तुमच्याकडे मी आले हे कळल्यावर माझ्या मैत्रिणी माझ्यावर किंचाळल्या. ‘psychiatrist’कडे जायची तुझी हिंमत कशी झाली? तू काय वेडी बिडी आहेस का? कौन्सिलिंगमध्ये पैसे कशाला उधळतेस? आम्ही करू तुझं कौन्सिलिंग. किती अडाणी विचार.

मी तुमच्याकडे इतके वेळा येऊन गेले. मला एकही वेडा दिसलेला नाही. शहाण्यांना ट्रीटमेंट लागतेच ना? मी माझ्या मैत्रिणींना अभिमानानं सांगते, की माझे सर ‘शहाण्यांचे डॉक्टर’ आहेत. जो आयुष्यात पडतो त्यालाच उठण्याची किंमत कळते. मी भावनेत खूप गुंतून पडायची; पण तुम्ही मला कणखर केलंय. प्रॅक्टिकल केलंय. खर्चाचं म्हणाल, तर तुमच्या खर्चापेक्षा कितीतरी जास्त खर्च हॉटेल्स, मॉल्स, पार्टी अशा ठिकाणी फेकत राहतो.

काही तासाच्या आनंदासाठी. हे खरं उधळणं. तुमच्याकडे केलेला खर्च मला शाश्वत आनंदाकडे घेऊन गेला. ‘जीवनाची दृष्टी मिळाली. उभं राहायला मिळालं. शिकायला मिळालं. मला इतकं मिळालंय, की तो खर्च कवडीमोल. मला लग्न हवं होतं; पण ते भावनेच्या भरात. तुम्ही मला ‘मॅरेज रेडी’ केलत. गौरवला सगळं माहीत आहे. तुम्ही मला उभं केलंत म्हणून तोही नमस्कार करायला आलाय.’...भावना भरभरून बोलत होती.

दोघे जायला उठले. माझ्याबरोबर सेल्फी घेतला. स्टेटसला टाकला. गौरवनं लग्नाला यायचंच आहे असा प्रेमळ आग्रह केला. जाताना भावना म्हणाली, ‘मला आता ट्रीटमेंट लागणार नाही याची खात्री वाटते; पण माझ्याजवळ तुमचा कायमकरता गुरुमंत्र देऊन ठेवा.’’ मी म्हणालो, ‘‘आँख में आँसू आये, तो खुद पोछ लेना। दूसरा कोई पोछेगा, तो सौदा करेगा।’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT