building sakal
सप्तरंग

सामान्य-असामान्य : व्हाईट कॉलर्ड

बाळासाहेब दिवटे एक यशस्वी बिल्डर. ‘झटक्यात बिल्डिंग आणि फटक्यात डील’ अशी त्यांची ख्याती होती.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. संजय वाटवे

बाळासाहेब दिवटे एक यशस्वी बिल्डर. ‘झटक्यात बिल्डिंग आणि फटक्यात डील’ अशी त्यांची ख्याती होती. कामाचा दर्जा खूप चांगला ठेवला असल्यामुळे बिल्डिंग हातोहात खपायची. की पुढचा प्रोजेक्ट. कामाचा झपाटा खूप होता. टीम चांगली बांधली होती. माणसं टिकवण्यात हातखंडा होता. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर. त्यामुळे कामं पूर्ण करून घ्यायचे. गरीबांना सढळ हातांनी मदत करणारे, समाजकार्य करणारे म्हणून लोकप्रिय होते.

हळूहळू त्या भागात बांधकामं जोरात सुरू झाली. बाहेरचेही अनेक बिल्डर घुसले. जोर दाखवून जमिनी बळकावण्याचा आणि दुसऱ्याचं बांधकाम बंद पाडण्याचा खेळ सुरू झाला. मुंबईचेही धनाढ्य बिल्डर त्यात शिरले होते.

दिवटेसाहेब अशा बिल्डरपासून चार हात लांब राहत. जमीनमालकांना धमकावणं, गोरगरीबांचा गळा घोटणं, गिऱ्हाईकाची फसवणूक करणं बाळासाहेबांना पटत नसे. आपण बरं आपल कामं बरं, असं वागणं असे. दिवटेसाहेब आधी कोठे काम करायचे कोणालाच माहीत नव्हतं.

तसेही गेल्या पाच वर्षांत अनेक बाहेरचे बिल्डर आलेले असल्यामुळे कोणालाच कोणाचा इतिहास माहीत नव्हता. बाळासाहेब बदमाश बिल्डरपासून लांब राहायचे. व्यवहारात अतिशय सरळ. फसवाफसवी नाही, अडकाअडकवी नाही, दगाबाजी नाही. पटापट कामं संपवायची आणि सटासट विकून टाकायची असं साधं गणित.

बाळासाहेबांचा एक नेम होता. देवपूजा. रोज एक तास पूजा केल्याशिवाय अन्नग्रहण नाही. देवपूजा संपली, की पोटपूजा. मग पांढरा सफारी घालणार आणि घराबाहेर पडणार. स्वच्छ वर्तन आणि देवभोळा स्वभाव, त्यामुळे जनमानसात स्वच्छ इमेज. आपल्याला काय करायचं त्यांच्या भूतकाळाशी?

बाळासाहेब माझ्याकडे आले ते योगायोगानंच. त्यांचा इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टर माझा पेशंट. त्याच्याबरोबर आले. हसरा सात्त्विक चेहरा. माझ्याशी बरेचदा बोलले. मला मान देऊ लागले. मी एकदा त्यांना विचारलं, ‘एवढी मोठी कामं एवढ्या झपाट्यात कशी संपवता? लोकांना हाताळण्याचं तंत्र काय?’ ते आपल्या स्टाईलने म्हणाले, ‘कधी पेढा, तर कधी जोडा.’

त्याचं असं झालं, बाळासाहेबांचा बाणेरला एक प्लॉट होता. गेल्या पाच वर्षांत त्याची किंमत बारापट वाढली होती. त्याच्या आजूबाजूची मोठी जमीन मुंबईच्या बिल्डरनं घेतली होती. मधलाच तुकडा बाळासाहेबांकडे राहिला. त्यामुळे पाच हजार कोटीच्या प्रोजेक्टचा आराखडाच तयार करता येत नव्हता.

काही करून हा तुकडा मिळवायचाच, असा त्यांनी चंग बांधला. बाळासाहेबांशी मीटिंग्ज झाल्या. गोड बोलून झालं, आमिषं देऊन झाली, अवाच्या सवा किंमतीची ऑफर देऊन झाली; पण बाळासाहेब बधेनात. त्यांचं एकच पालुपद चालू होतं, ‘आपण ब्लॅक मार्केटशी व्यवहार करत नसतो.’

त्या बिल्डरची मनीपॉवर, मसल पॉवर आणि राजकीय पॉवर जबरदस्त होती. एक-दोन मंत्र्यांचे पैसेही प्रोजेक्टमध्ये लागलेत अशी बाजारात चर्चा होती. शेवटी प्रकरण निकरावर आलं. बिल्डर इरेला पेटला. बाळासाहेबांसारख्या छोट्या बिल्डरकडून मात खाणं त्याला परवडणार नव्हतं. धमक्या आणि दमदाटीची भाषा सुरू झाली.

कथेनं अचानक वेगळंच वळण घेतलं. एक दिवस बाळासाहेब व्हरांड्यात दाढी करत होते. तेवढ्यात बेल वाजली. त्यांनी खिडकीतून क्रीमचा फेस लावलेले तोंड बाहेर काढले. ‘‘कोण आहे रे?’’ असा आवाज दिला. बाहेर दोन टगे उभे दिसले. क्षणार्धात प्रसंग त्यांच्या लक्षात आला.

ते म्हणाले, ‘दाढी करतोय, दाढी झाली की दार उघडतो.’ बाळासाहेबांनी शांतपणे दाढी संपवली. टग्यांचे हात त्यांना चोपण्यासाठी शिवशिवत होते. बाळासाहेबांनी दार उघडलं आणि ते बाहेर गेले. आणि घडलं भलतंच! त्या गुंडांनी त्यांच्याकडे टक लावून पाहिलं आणि धाडकन त्यांच्या पाया पडले. ‘माफी, माफी, माफी असावी. तुम्ही आहात हे माहीतच नव्हतं. नाहीतर तुमची सुपारी घेतलीच नसती. आमचा भाई दोन वर्षांपूर्वी गेला.

त्याच्या ऑफीसमध्ये तुमचे फोटो पाहिलेत. आमच्या भाईला तुम्हीच ट्रेन केलंय.’ आणि ते पळून गेले. बाळासाहेबांनी शांतपणे फोन फिरवला. त्या बिल्डरला म्हणाले, ‘माझ्या व्हाईट कॉलर्ड रूपाला फसलास का? तुझी शेंबडी पोरं गेली की रे पळून. त्या पोरानांच विचार ना मी काय आहे? पुण्यातली सगळी पोरं मीच तयार केलीत. तू आता एक काम कर. रोज एक नवीन गुंड पाठव. ज्या दिवशी तो पोऱ्या मला ओळखणार नाही, त्या दिवशी तुला जमीन दिली.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: राज्यात कुणाची सत्ता? मतदानापूर्वी 150 उमेदवार लावणार निकाल, 6 दिवसात होणार स्पष्ट! काय आहे हरियाना कनेक्शन?

MS Dhoni, Rohit Sharma यांना फ्रँचायझी कायम राखणार, विराट पुन्हा RCB चा कर्णधार होणार; वाचा फ्रँचायझींची संभाव्य यादी

Maharashtra Vidhansabha Richest Candidate : भाजपचा 'हा' आमदार पुन्हा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार; पाच वर्षात ५७५ टक्क्यांची वाढ

Mahaviskas Aghadi: महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढती होणार? काँग्रेसच्या बड्या नेत्याने थेटच सांगितलं, 'यंदा पंजा' गाणं केलं लाँच

Palghar: शिंदे गटात उभी फूट... एक गट बंडखोर उमेदवाराच्या तर दुसरा महायुतीच्या रॅलीत सहभागी, वातावरण तापलं!

SCROLL FOR NEXT