देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना आजही त्यांच्या साधेपणाबद्दल ओळखलं जात. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीतून येऊन संघर्ष करत, देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या लाल बहादूर शास्त्री यांनी आयुष्यभर साधेपणा जपला. रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वेमंत्री म्हणूण नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा देणारे किंबहूना ते पहिले आणि शेवटचे मंत्री असतील. त्यांच्या प्रामाणिकतेचे, साधेपणाचे किस्से सांगीतले तर कदाचित आजच्या पीढीला असा माणूस होऊन गेला यावर विश्वासही बसणार नाही. लाल बहादूर शास्त्री यांचे जवळचे मित्र आणि दिवंगत जेष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी ‘बियॉंड द लाईन’ या त्यांच्या आत्मचरीत्रात बहादूर शास्त्री यांच्या साधेपणाचे, सुसंस्कृतपणाचे अनेक किस्से वाचकांपुढे उलगडून दाखवले आहेत. त्यातील हे काही मोजके किस्से....
स्टोव्ह वर स्वत; जेवण बनवायचे
अलिप्तवादी राष्ट्रांची चळवळ अर्थातचं ‘नाम’चे अधिवेशन इजिप्तची राजधानी कायरो इथ आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी भारत ‘नाम’ राष्ट्रांच्या चळवळीच्या अग्रस्थानी होता. या अधिवेशनाला भारताकडून पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री उपस्थित राहीले. या दौऱ्यात त्यांचा मुक्काम हिल्टन या जगप्रसिध्द पंचतारांकीत हॉटेलमध्ये होता. मात्र शास्त्रींजी बाहेरचे जेवण आवडत नसायचे. म्हणून त्यांनी या दौऱ्यात एक छोटासा स्टोव्ह नेला होता. हॉटेलवर परतल्यानंतर ते या स्टोव्हवर जेवण बनवायचे. कुलदीप नायर तेव्हा यूएनआयचे वार्ताहर म्हणून दौरा कव्हर करत होते. त्यांना शास्त्रींजींचा हा साधेपणा भावला. देशाचा पंतप्रधान स्व;ताचे जेवण स्वता; बनवतो, या मथळ्याची बातमी त्यानी केली. मात्र प्रत्यक्षात या बातमीमुळे शास्त्रीजी अडचणीत आले. भारताच्या पंतप्रधानांच्या या कृतीने हॉटेलच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम झाल्याचे सांगत, हिल्टन हॉटेल व्यवस्थापनाने शास्त्रींजींना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला. मात्र इजिप्तचे तत्कालीन पंतप्रधान नासेर यांच्या मध्यस्थीमुळे ते प्रकरण थांबवले.
वीज वाचवण्यासाठी काळोखात
कामराज योजनेमुळे मंत्रीमंडळातील अनेकांना डच्चू देऊन पक्ष कार्यासाठी जुंपण्यात आले होते. या योजनेअंतर्गत लाल बहादूर शास्त्री यांचीही नेहरुजींच्या मंत्रीमंडळातून गच्छंती झाली. त्यादिवशी कुलदीप नायर हे लाल बहादूर शास्त्री यांना भेटायला भेटायले गेले.शास्त्रीजींच्या बंगल्यात संपुर्ण काळोख पसरला होता. लाल बहादूर शास्री दिवानखान्यात बसले होते. केवळ तिथलेच लाईट सुरु होते. इतर दिवे का बंद केलेत. हा प्रश्न विचाल्यावर शास्त्रींजींनी उत्तर दिले. आता मी मंत्री राहीलो नाही. त्यामुळे हे विद्युत बिल मलाचं भरावे लागेल. ते मला परवडणार नाही. त्यामुळे आवश्यक तेवढी विज वापरायचे मी ठरवले.
अतिरीक्त खर्चासाठी स्तंभलेखण
लालबहादूर शास्त्री खासदार असतांना त्यांना घरखर्च भागवणे कठिण जात असायचे. त्यावेळी खासदारांना जेमतेम 500 रुपये पगार होता. त्यात घरात भेटणाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची कायम वर्दळ असायची. त्यामुळे घरखर्चासाठी अतिरीक्त पैशै कसे जमवायचे या विवंचनेत शास्त्रीजी होते. कुलदीप नायर य़ांनी त्यांना चार वर्तमानपत्रात स्तंभलेखण करण्याचा सल्ला दिला. त्यानूसार लाल बहादूर शास्त्री चार इंग्रजी दैनिकात घोस्ट कॉलम लिहीयाचे. त्यातून महिन्याला प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 2 हजार रुपये मिळायचे. त्यातून शास्त्रींजीचा अतिरीक्त घरखर्च भागायचा.
राजभवनात गेले नाही
लाल बहादूर शास्त्री केंद्रीय गृहमंत्री असतांना जवाहरलाल नेहरु यांची बहिण विजयालक्ष्मी पंडीत या महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या. त्यावेळी बहुतांश केंद्रीय मंत्री मुंबईत आले की राजभवनात थांबत असायचे. विजयालक्ष्मी पंडीत यांनी नेहरुंना पत्र लिहून राजभवनाचे रुपांतर डाक बंगल्यात केल्याची तक्रार केली. गृहमंत्री असल्यामुळे शास्त्रींना या तक्रारीची एक प्रत मिळाली. लाल बहादूर शास्त्री यांना खूप दु;ख झाले. त्या दिवसापासून कुठल्याही परिस्थितीत राजभवनावर थांबायचे नाही अस त्यांनी ठरवलं. त्यानंतर मुंबईत लाल बहादूर शास्त्री आणि त्यांचा स्टाफ विमानतळावरचं थांबायचे.
मृत्यूनंतर बँक बॅलेंन्स शुन्य
ताश्कंद दौऱ्यावर असतांना लाल बहादूर शास्त्री यांचे हृदय विकाराचा तिव्र झटक्याने निधन झाले. मात्र गृहमंत्री, पंतप्रधान सारख्या सर्वोच्च पदावर गेलेल्या, लाल बहादूर शास्त्री यांचा बँक बँलेन्स अगदी शुन्य होता. त्यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते कामराज यांनी कुलदीप नायर यांना फोन करुन शास्त्रींच्या पश्चात त्यांच्या कुंटुबियांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल विचारणा केली. शास्त्रींजीनी आयुष्यभरात काहीच कमावले नसल्याचे ऐकुण त्यांना धक्काच बसला. कामराज यांनी दुसऱ्याच दिवशी विशेष कायदा पारीत करुन शास्त्रींजींच्या कुटुंबाला राहण्याची मोफत सोय केली आणि माजी पंतप्रधानाची पेंन्शन त्यांच्या पत्नीला लागू केली.
पोटच्या पोराला हाकलले
शास्त्रींजीचा लहान मुलगा हरी याचे काही व्यापाऱ्यासोबत घनिष्ठ संबध होते. वडिलांच्या अधिकार पदाचा वापर करुन त्याने काही कामे केल्याचा आरोप हरीवर लागला. लाल बहादुर शास्त्री यांच्या कानावर पडताच, त्यांनी आपल्या शासकीय बंगल्यावरुन मुलाला हाकलून दिले. पत्नीकडून विरोध होत असतांनाही शास्त्रीजी स्वता;ची तत्व जपण्यासाठी मुलाला दूर केलं.
मिना कुमारीला ओळखले नाही
एकदा लाल बहादूर शास्त्रीना तेव्हाचे प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी त्यांच्या ‘पाकीजा’ च्या फिल्म सेटवर आमंत्रित केलं. त्यांच्या सन्मानार्थ एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता. ‘पाकीजा’ च्या अभिनेत्री मीना कुमारी या त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीच्या अत्युचं शिखरावर होत्या. कमाल अमरोही यांनी शास्रींजींचे स्वागत केले आणि त्यांना मिना कुमारी यांच्यावर एक छोटेखानी भाषण देण्याची विनंती केली. मात्र त्यावेळी देशात सर्वाधिक लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या मिना कुमारीबद्दल शास्त्रीजींना काहीचं माहिती नव्हतं. त्यांनी हळूच कुलदीप नायर यांना या सदर अभिनेत्रीचे नाव काय आहे, हे विचारले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच, मला माफ करा मात्र मी आयुष्यात पहिल्यांदाचं, मिना कुमारी यांचे नाव ऐकले अशी थेट आणि जाहिर कबूलीही शास्त्रीजीनी दिली.
शो बघतांना अवघडले
केंद्रीय गृहमंत्री असतांना शास्त्रीजी एकदा रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी लेनिनग्राड शहरात त्यांना रशियन बोल्शेई बॅले ग्रूपचा शो पहायला आमंत्रित केल गेलं. शो पाहतांना शास्त्रीजी खूप अस्वस्थ होते. तेव्हा कुणीतरी त्यांना विचारलं शास्त्रीजी, तूम्ही ठिक आहात ना? त्यावेळी ते म्हणाले त्या नृत्यांगनांनी तोकडे कपडे घातले आहे.त्यामुळे माझी पत्नी शेजारी बसली असतांना शो बघतांना मला जरा अवघडल्यासारखे वाटतंय.
eight unknown facts about lal bahadur shastri a must read article
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.