women life sakal
सप्तरंग

सुखाचा शोध घरातच घ्या!

११ वर्षं एका लग्नात राहूनही एक महिला आपल्या शारीरिक सुखाचा पूर्ण उपभोग घेऊ शकत नाही. तिची ती इच्छा अतृप्तच राहते.

अवतरण टीम

- डॉ. सबिहा, contact@drsabiha.com

११ वर्षं एका लग्नात राहूनही एक महिला आपल्या शारीरिक सुखाचा पूर्ण उपभोग घेऊ शकत नाही. तिची ती इच्छा अतृप्तच राहते. ते सुख कसं मिळवता येतं याचं शिक्षण तिला नसल्यामुळे ती आपली मर्यादा ओलांडण्याचं धाडस करते. ‘सेक्स अॅज अॅन इमोशन अॅण्ड सेक्स अॅज अॅन अॅक्ट’ याचं शिक्षण जर एका जोडप्याला नसेल तर त्याचा काय परिणाम एका नात्यावर होऊ शकतो हे समजून घेण्याची गरज आहे.

मी आज मांडणारी केस स्टडी खरंच अनोखी आहे. सेक्सबाबतच्या शिक्षणाच्या उद्देशाने ती शेवटपर्यंत वाचा. सेक्स आणि एज्युकेशन अन् सेक्स आणि पॉर्न याचा किती परिणाम एका जोडप्यावर वर्षानुवर्षं होऊ शकतो हे त्यातून कळेल. कारण पॉर्नमध्ये जे दाखवलं जातं त्याची अपेक्षा आपण खऱ्या आयुष्यातही कधी कधी करतो. पाॅर्नमध्ये एंटरटेन्मेंट असते. त्यात रिॲलिटी नसते. रिल आणि रियल लाइफ खूप वेगळं असतं.

स्त्री आणि पुरुषाचं शरीर अन् प्लेजरचं काय शरीरशास्त्र आहे, काय मानसशास्त्र आहे, शरीरसुख म्हणजे नेमकं काय, मोठमोठे अवयव असणं म्हणजे प्लेजर का, खूप वेळपर्यंत संभोग करणं म्हणजेच आनंद का, पुरुषाच्या अवयवाची ताठरता खूप वेळ टिकून राहणं महत्त्वाचं आहे का, पुरुषाच्या लिंगाचं इरेक्शन ती स्त्री किती आणि कशी आणून देते यावर मग ती किती हॉट आहे, असं गणित लावायचं का...? अशा मुद्द्यांबाबत कधी बोललं गेलेलंच नाहीय.

त्याबाबत कधी माहीतही नसतं. माझ्या शरीराला काय केलं म्हणजे मला सुख मिळतं हे जर स्त्रियांना माहीतच नसेल आणि ते फक्त कुणाकडून ऐकलेलं असेल, कुठेतरी पाहिलेलं असेल किंवा किटी ग्रुपमध्ये बोललं गेलं असेल, की माझा नवरा एका रात्रीत बऱ्याच वेळा करतो... माझ्या नवरा असं करतो, माझी कंबर नाजूक आहे... अशा चर्चा म्हणजे सेक्स आहे काय? हे म्हणजे सुख आहे का? हे म्हणजे समाधान आहे का...?

अशा गोष्टींबाबत योग्य वेळी योग्य पद्धतीने शिक्षण मिळालेलं नसेल तर नात्यात सगळं व्यवस्थित चालणाऱ्या जोडप्यांमध्येसुद्धा मोठा दुरावा येऊ शकतो. त्यांच्यात टोकाची समस्या निर्माण होऊ शकते आणि वाईट गोष्ट म्हणजे अशा वेळी त्यांना योग्य प्रशिक्षण नाही आणि नंतर कोणा तज्ज्ञ डॉक्टरची मदतही नाही, असा गुंता निर्माण होतो. कारण तुम्हाला त्याबाबत मर्यादित ज्ञान असतं. असं ज्ञान नसेल तर काय होऊ शकतं याची एक पुसटशी कल्पना तुम्हाला आजच्या केसमधून मिळेल.

एका तिशीतल्या महिलेने माझं सेशन बुक केलं होतं. तिच्या लग्नाला साधारण ११ वर्षं झाली होती. तिला सात-आठ वर्षांचं मूल होतं. त्याचं ॲरेंज मॅरेज होतं. तिच्या हिशेबाने तिच्या लग्नात तिला कसलीच तक्रार नव्हती. नवऱ्याने तिला आर्थिक-सामाजिक सुख सगळं काही दिलं होतं. तिचं एकच म्हणणं होतं, की ‘मॅडम गेल्या दहा वर्षांत माझ्या नवऱ्याने एक मिनिटाच्याही वर सेक्स केलेला नाही. अगदी तीस-चाळीस सेकंदांतच आमचा सेक्स संपतो.

मला काही कळतच नाही असं का? त्यातून मला सुखच मिळत नाही. त्याबाबत आम्ही आपसात कधी बोललेलोही नाही...’ मग मी तिला विचारलं, की ‘‘तुला सेल्फ प्लेजर पद्धत, हस्तमैथुन वगैरे काही माहीत आहे का?’ त्यावर ती म्हणाली, ‘‘नाही डॉक्टर. ते सगळं काय असतं? ते सगळं कशाला? ते म्हणजे कुठे सेक्स असतं?’ मी तिला सेक्सची परिभाषा विचारली तेव्हा ती म्हणाली, ‘मॅडम मी तुमच्या सेशनमध्ये का आली ते ऐका...’ तिला सेल्फ प्लेजर म्हणजे काय, तुम्ही स्वतःच्या शरीराची गरज ओळखून त्याला कशाप्रकारे सुख देऊ शकता इत्यादी गोष्टीत रस नव्हता.

ती सांगत होती, ‘डॉक्टर, समाजात मोठी प्रतिष्ठा असलेल्या एका व्यक्तीच्या सहवासात मी आले. त्यांना भेटल्यावर माझा मनावरचा ताबा सुटला आणि मी त्यांच्यासोबत गेलं वर्षभर सेक्स केलं. तुम्हाला पटणार नाही; पण तो अनुभव खूपच सुखावणारा होता. म्हणजे मला पहिल्यांदा लक्षात आलं, की मग इतकी वर्षं मला काहीच माहिती नव्हतं. काहीच अनुभवलेलं नाही मी. मी त्या व्यक्तीसोबत खूप सुंदर सेक्स अनुभवला.’

‘नक्की काय झालं, की तुला वाटतं की तू परमसुखाचा आनंद घेतला,’ असा प्रश्न मी तिला केला. त्यावर तिचं म्हणणं होतं, ‘मॅडम, ते तीन-तीन तास सेक्स करू शकतात. खूप वेळ आमचे शारीरिक संबंध सुरू राहतात. ते खऱ्या अर्थाने लैंगिक समाधान देतात. मला ते पेनिट्रेशन हवं असतं. मला त्यातून आनंद मिळतो.’’ मी तिला आता कशासाठी सेशन बुक केलं, असा प्रश्न केला.

तर ती म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला आमच्या संबंधाबाबत समजलं तेव्हा मी त्याच्याजवळ कबुली दिली, की मला आपल्या लग्नातून हवं तसं सुख मिळत नाहीय...’ ‘त्या गृहस्थांवर आता तुझं प्रेम आहे का,’ असा प्रश्न मी तिला विचारला. तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला नेमकं सांगता येणार नाही; पण ते माझ्या एकटीसोबत सेक्स नाही करत. खूप जणींबरोबर त्यांनी संबंध ठेवलेले आहेत; पण त्यांचं म्हणणं आहे, की जसं त्यांना माझ्यासोबत जमतं तसं कुणासोबत जमलेलं नाही.

इतका वेळ ते कोणाशी करू शकत नाही आणि हेच मला खूप भारी वाटतं.’ ती पुढे म्हणाली, की ‘ते खूप श्रीमंत आहेत. प्रतिष्ठित आहेत. ते माझ्याशी लग्न नाही करणार; पण मला एखादं चांगलं घर घेऊन देतील. महिन्याला पन्नास हजार देतील...’ मग मी तिला विचारलं, ‘तसं पाहिजे का तुला?’ त्यावर ती म्हणाली, ‘पाहिजे की नाही मला माहीत नाही; पण सध्या माझ्या नवऱ्याला हे सगळं कळल्यामुळे त्यांनी मला नजरकैद करून घरात ठेवलं आहे.

मला घराबाहेरच जायची परवानगी नाही. वर्षभर इतके सुंदर शरीरसंबंध ठेवल्यामुळे मला त्याची खूप गरज आहे. माझ्या शरीरात आग आग होते. मला सांगा हे चुकीचं आहे का...?’ त्यावर मी म्हटलं, की सेक्सची इच्छा असणं, तो करावासा वाटणं किंवा अधिक करावासा वाटणंही साधारण बाब आहे. तुझा तुझ्या नवऱ्याबरोबर काय संवाद झाला, असा प्रश्न मी तिला विचारला. तेव्हा ती म्हणाली, की ‘आम्ही संवाद साधला तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं, की मला ते सुख खूप वेळ हवं असतं; पण तुमच्याकडून ते होत नाही.’

‘तुम्ही दोघांनी कधी एखाद्या सेक्स कोचकडे कपल थेरपी किंवा कपल सेशन घेतलं आहे का...’ असं मी तिला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, ‘नाही मॅडम, ते त्यासाठी कधीच तयार होणार नाहीत. उलट हे सगळं झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं, की तुम्ही मला नजरकैदेत ठेवलं तर मी असं नाही राहू शकणार. मी घर सोडून जाणार; पण मी आई-वडिलांकडे जाऊ शकत नाही. आपले आई-बाबा अशा गोष्टीसाठी कधीच पाठिंबा देणार नाही.

त्या व्यक्तीकडे मी जाऊ नाही इच्छित. कारण तसं आयुष्यही मला नकोय.’ ‘तू तुझ्या पायावर उभी आहेस का,’ असा प्रश्न मी तिला विचारला. त्यावर ती म्हणाली, ‘नाही मॅडम, या वयात मी आता काय करणार?’ मी लागलीच तिला म्हटलं, की ‘तुला शारीरिक सुख मिळत नाही तेव्हा तू बंड करतेस, मग आर्थिक सुखासाठी तू बंड का नाही करत. हे योग्य आहे का?’

माझ्या अशा काही प्रश्नांमुळे ती थोडीशी विचारात पडली; पण एक सेक्स कोच म्हणून मला कळत होतं, की तिची शारीरिक भूक खूप जास्त होती आणि वस्तुस्थिती म्हणजे ती दहा वर्षं अतृप्त होती. कुठेतरी एका माणसाकडून तिला एक विशिष्ट प्रकारची तृप्ती मिळत होती... तिने बोलण्याच्या ओघात सांगितलं, ‘‘मी माझ्या नवऱ्याला एक प्रपोजल दिलंय, की तुम्ही सांगाल तसं मी ऐकते; पण मला महिन्यातून एकदा का होईना त्या व्यक्तीसोबत शरीरसुख अनुभवायचं आहे.

मला त्यासाठी परवानगी द्या.’ ते ऐकून थोडा वेळ मीही निःशब्द झाले. कारण तिची शारीरिक भूक इतकी जास्त होती, की तिला तिथे सामाजिक मूल्याचे धडे देण्यात काहीच फायदा नव्हता. काय बरोबर आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे... समाजाचे नियम, लग्नाचं बंधन वगैरे ऐकण्याच्या मनस्थितीत ती नव्हती; कारण ती खूप उपाशी होती... जेव्हा एखादा माणूस खूप उपाशी असतो तेव्हा त्याला खायला हवं असंत.

मग ते चमच्याने खा, काट्या- चमच्याने खा, काचेच्या प्लेटमध्ये खा किंवा चांगले व्यवस्थित नॅपकिन ठेवून खा हे त्याला कळत नाही. चार दिवसाचं शिळं अन्न असलं तरी तो खायला तयार होतो. चोरी करून खायला तयार होतो, कारण त्याला भूक लागलेली असते. अशीच अवस्था त्या महिलेची होती. तिला मी विचारलं, ‘तुझ्या नवऱ्याने कधी तरी सांगितलं असेल ना, की आपण एखाद्या तज्ज्ञ डाॅक्टरची मदत घेऊ...’ त्यावर ती म्हणाली, ‘नाही, त्यांनी मला एक पर्याय दिला.

ते म्हणाले, त्या माणसासोबत शरीरसंबंध नको ठेवू. तुला पेड सेक्स करायचा आहे तर मी पैसे भरतो. इतर पुरुषही आहेत, की ज्यांना पैसे दिले की ते तुला हवं तसं सुख देऊ शकतात..’ तिचं हे बोलणंही निःशब्द करणारंच होतं माझ्यासाठी. कारण इथेही नैसर्गिकरीत्या काहीच बोलणं होत नव्हतं. इथेही सोपा आणि सोयीस्कर मार्ग शोधण्याचाच प्रकार होता. तसं त्या स्त्रीला नको होतं. मी म्हटलं, ‘पुढचं तू जर त्या स्थितीत असशील ऐकायच्या तर मी बोलायला तयार आहे. तुमच्या जोडीत सगळं व्यवस्थित आहे.

तुझ्यात आणि नवऱ्यात बाकी सगळं चांगलं आहे; पण शारीरिक संबंध व्यवस्थित होत नाहीय. तुला पेनेटेट्रिव्ह सेक्सबद्दलच माहिती आहे. तुला नॉनपेनेट्रेटिव्ह सेक्स असतो, नॉनपेनेट्रेटिव्ह ऑर्गाझम असतात हे माहीत आहे का?’ मी तिला समजावलं, की ‘स्त्रीच्या वलवाच्या मागे एक अवयव असतं. क्लिटोरिस नावाचं. क्लिटोरिस पूर्णपणे उद्दिपित करायला वलवामध्ये लिंगाचा प्रवेश नाही लागत.

बोटांनी, स्पर्शाने, चांगले प्लेजर टॉइज वापरून किंवा लुब्रिकंट वापरून आपण ते उत्तेजित करू शकतो. तुझ्या नवऱ्यात ताठरपणा किंवा शीघ्रपतनाची समस्या असेल तर तो त्याचं बोट, स्पर्श, लुब्रिकंट किंवा सेक्स टॉइज वापरून तुला तो आनंद तुला तुझ्याच बेडरूममध्ये दररोज देऊ शकतो. ज्याला आम्ही नॉनपेनेट्रेटिव्ह ऑर्गाझम म्हणतो.’’ मुख्य म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्‍या सिद्ध झालेलं आहे, की पेनेट्रेटिव्ह ऑर्गाझम फार दुर्मिळ आहे.

म्हणजे लिंग योनीमध्ये जाऊन मिळालेल्या सुखाला खूप वेळ लागतो... म्हणूनच तर ती म्हणायची ना, की तीन-तीन तास सेक्स होतो; पण तीन तास एक अशी व्यक्ती तुम्हाला पेनेट्रेटिव्ह सेक्स देऊ शकतो की ज्याने काहीतरी त्यासाठीच्या गोळ्या घेतल्या असतील. त्याने इरेक्शनसाठी काहीतरी पर्याय शोधला असेल; पण तसं आयुष्यभर नाही राहणार. स्त्रीसाठी क्लिटोरल स्टिम्युलेशन महत्त्वाचं असतं.

मला त्याचं शरीरशास्त्र, शरीरविज्ञान आणि त्याचं मानसशास्त्र पुढील १५ मिनिटं तिला समजवायला लागलं. कुठे वलवा आहे, कुठे व्हजायना असतो, कुठे क्लिटोरिस असतं, लिंग आत गेल्याने नाही तर बाहेरून कशी उत्तेजना मिळू शकते हे मी तिला सांगितलं आणि विचारलं, तुझा नवरा शिकायला तयार होईल का हे? तेव्हा तिने प्रतिप्रश्न केला, की ‘‘का नाही होणार? प्लेजरसाठी हे सगळं ते नक्की शिकायला तयार होतील.’

एवढा विश्वास त्या स्त्रीला होता. मग मी म्हणाले, ‘पुढच्या सेशनमध्ये तुम्ही दोघांनी या आणि हे एकदा समजून घ्या. पुढचे सहा-सात महिने ते करून पाहा. मग बघा तुमचा हरवलेला स्पार्क परत येईल. तुझी शारीरिक भूक भागली जाईल. तुमच्या नात्यातली ओढ परत येईल... तू तुझ्या लग्नाच्या चौकटीत राहून स्वतःची शारीरिक भूक भागवू शकतेस.

नवऱ्याच्या मदतीनेही ती भागवून घेऊ शकतेस आणि आणि एक सुखी स्त्री म्हणून राहू शकतेस...’ ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात कुठे ना कुठे समाधान दिसत होतं. पाहायला गेलं, तर इमोशनलपेक्षा बायोलॉजिकल भूक तिला जास्त होती. हे असणं सामान्य आहे. त्या मागचं शिक्षण नसल्यामुळे एवढा सगळा फापटपसारा झाला होता. ती म्हणाली, ‘मॅडम हे तर कधी कोणी सांगितलंच नाही. असं कधी मॉडेल पाहिलंच नाही. असं काही असतं हे माहितीच नाही...’

सुख म्हणजे मिठासारखे आहे जे तुम्ही चाखलेलंच नाहीय. ते मीठ तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या शरीरात घालून ते अजून नमकीन, अजून टेस्टी करू शकता. हे शिक्षण महत्त्वाचं आहे. त्यासाठी विश्वासू प्रशिक्षित आणि तज्ज्ञ डाॅक्टर आणि सेक्स कोच महत्त्वाचा आहे. समाजात अशी स्पेस महत्त्वाची आहे, की जिथे अशा विषयावर बोललं जाईल. कारण बरीच जोडपी, मग ती उच्च शिक्षित असो की इतर आजही फक्त शरीरशास्त्र आणि मानसशास्त्राच्या शिक्षणाअभावी त्यांच्यात दुरावा येतो.

(लेखिका प्रसिद्ध ‘सेक्स आणि रिलेशनशिप कोच’ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार घसरणीसह बंद; मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?

NCP Vidhan Sabha List: राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर,'वडगावशेरी'चा सस्पेन्स कायम! 'या' मतदारसंघांत काय होणार?

IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया हुकूमी पत्ता टाकणार; युवा खेळाडू ऑस्ट्रेलियाची गोची करणार

Marathi Movie: सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला; चित्रपटात झळकणार ४ जोड्या, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Zee Marathi Award 2024 : झी मराठीच्या नायिकांनी साकारल्या नवशक्ती ; प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

SCROLL FOR NEXT