independence day 2022 industrial development 
सप्तरंग

शाश्वत औद्योगिक विकास

कापड उद्योग आणि पोलादनिर्मितीचे प्रकल्प या होत्या प्राचीन भारतातील औद्योगिक प्रगतीच्या खुणा

सकाळ वृत्तसेवा

औद्योगिक विकास

कृषी-संस्कृतीची पूजा करणारे अशी भारतीय संस्कृतीची ओळख. मात्र, या शेतकी परंपरेचा आदर करतानाच येथे कायम औद्योगीकरणाची कास धरली गेली. कापड उद्योग आणि पोलादनिर्मितीचे प्रकल्प या होत्या प्राचीन भारतातील औद्योगिक प्रगतीच्या खुणा. इसवीसन १८०० ते १९०० या काळात जगातील कापड उद्योगाचे कर्णधारपद भारताकडे होते. कापड उद्योगाबरोबरच स्थानिक उत्पादनांचा कच्चा माल म्हणून वापर करत. पंचक्रोशीतले कारागीर ही भारतीय उद्योगसंस्कृतीची ओळख होती, ती पुन्हा प्रस्थापित करावी.

-----------------

भौतिक

उद्योग समाजाच्या भल्यासाठी असावेत अन ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’चा मार्ग त्यातून अनुसरला जावा.‘उद्यमेनही संसिंद्धीम कार्याणि’ असा मूलमंत्र असलेली कार्यसंस्कृती समाजात रुजवण्याचा भारताचा प्रयत्न असावा.

उद्योगांचा विस्तार भारताच्या आर्थिक संपन्नेत आवश्यक आहे. हे उद्योग ऊर्जा वाढविण्यासाठी कसा सहयोग देतील, हे पाहावे.

धातू, कापडनिर्मिती यांत भारताकडे अत्यंत प्रगल्भ ज्ञान उपलब्ध आहे. त्याचा वापर उद्योगासाठी आवश्यक कौशल्यांसाठी करावा. त्याचा उपयोग देशातील रोजगारनिर्मिती वाढण्यासाठीही होईल.

उद्योगांतून मिळालेल्या संपत्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करण्याच्या परंपरेला बळ द्यावे.

तमिळनाडूत कोळसा जाळून त्या ऊर्जेवर पोलादनिर्मितीचा प्रकल्प १८३० ते १८६६ या काळात सुरू होता. हे भारतातले सर्वांत पहिले औद्योगीकरण मानले जाते. प्रचंड स्तरावर ऊर्जेची निर्मिती उद्योगासाठी आवश्यक ठरते हे भारतीयांना ज्ञात होते.

उद्योगांनी आपापल्या कुवतीप्रमाणे मागे पडलेल्या घटकांना मदत करावी. त्यांना रोजगारामध्ये योग्य स्थान मिळाल्यास बेरोजगारी कमी होण्यात हातभार लागू शकतो.

--------------------------

भविष्यातील अपेक्षा

औद्योगिक विकास हा प्रगतीचा मूलमंत्र. भारतीय संकल्पनेत विकासाला वैचारिक अधिष्ठान देण्याचे बळ आहे. विकास हा भौतिक सुख ओरबाडण्याच्या स्वरूपापुरता मर्यादित असू नये.

-----------------------

भविष्यातील अपेक्षा

उद्योगांचा विस्तार भारताच्या आर्थिक संपन्नेत आवश्यक आहे. हे उद्योग ऊर्जा वाढविण्यासाठी कसा सहयोग देतील हे आपल्याल पाहावे लागेल.

--------------------

भविष्यातील अपेक्षा

उद्योगांतून रोजगार व जीडीपीमधील वाढ याचबरोबर रोजगारांना उद्योगांकडून प्रोत्साहन दिले जाते का, हे पाहावे. .

-----------------------

भविष्यातील अपेक्षा

उद्योगातून मिळालेल्या संपत्तीचा वापर आपल्याच समाजाच्या भल्यासाठी करण्याच्या आपल्या परंपरेला बळ द्या.

----------------------

भविष्यातील अपेक्षा

औद्योगिक प्रगती करताना इतरांना त्रास न होईल, असे वर्तन असावे व उद्योग पर्यावरणपूरक असतील, हेही पाहावे.

--------------------------

आध्यात्मिक

उद्योग व्यवसाय करावा, पण त्यात आसक्ती नसावी हा विचार तुकाराम महाराजांनी मांडला आहे, त्याचे आचरण व्हावे.

आपली संपूर्ण परंपरा ऐश्‍वर्य आणि श्रीमंतीचा पुरस्कार करणारी आहे. चांगल्या मनाने, कोणताही गैरव्यवहार न करता संपत्ती कमावणे ही श्रीमंती असते. ही तत्त्वे उद्योगांत रुजवली पाहिजते.

औद्योगिक विकासाची शाश्वत व्याख्या जगासमोर आणता येईल. राष्ट्राला स्वदेशीच्या मार्गाने स्वयंपूर्णतेकडे आणि संपन्नतेकडे नेण्याचा प्रयत्न करण्यात यावा.

शासकीय पातळीवर उद्योगांचा विचार करताना उद्योगांच्या विकेंद्रीकरणाचा प्रयत्न करावा.

केवळ काही भागांचीच प्रगती होऊन चालणार नाही. महाराष्ट्राचा विचार करता मुंबई, पुणे या संपन्न भागासह ठाणे, सोलापूर, नागपूर, सांगली या विभागांंत काहीसा औद्योगिक विकास झालेला आढळून येतो. उद्योजकतेला पोषक वातावरण असल्याने अन्यत्र विकासाची गंगा पोहोचवावी.

रोजगार सर्वांना मिळावा, अशी रचना देशभरात निर्माण करायला हवी. त्याचबरोबर रोजगारातून मिळणार पैसा योग्य ठिकाणी खर्च करण्याचा संस्कार आजच्या तरुण पिढीला दिला जावा.

---------------

  • २ लाख १९ हजार महाराष्ट्रातील छोट्या-मोठ्या उद्योगांची एकूण संख्या

  • २८ लाख महाराष्ट्रातील नोंदणीकृत औद्योगिक कामगार

  • २७ राज्यात आयटी पार्क

  • ७ राज्यात विशेष औद्योगिक क्षेत्रे

-------------------

अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणा योग्यरीतीने राबविल्या गेल्या पाहिजेत. आजच्या औद्योगिक जागतिकीकरणात आर्थिक सत्तेच्या उभारणीची दृष्टी ठेवूनच महत्त्वाकांक्षा, धाडस, चिकाटी, सकारात्मक मानसिक रचना, उत्साह अंगीकारत आपल्याला पुढे जावे लागेल. भारताने जगाला आयुर्वेद दिला, विकासाचे सर्वसमावेशक प्रारूप दिले. पुढचे शतक हे भारताचे शतक असेल, तो मार्ग शाश्वत औद्योगिक विकासातूनच पुढे जाईल.

- देवेश पेंढरकर, संचालक, विको लेबॉरेटरीज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT