India united only because of Constitution sakal
सप्तरंग

Republic Day राज्यघटनेमुळेच भारत एकसंध

जगातील अन्य देशांतून त्यांच्या देशाचे संविधान हे ‘इन द नेम ऑफ गॉड, इन द नेम ऑफ अल्लाह’ या नावाने तयार झालेले आहे

आशिष तागडे

भारतीय संविधान हे संविधानाच्या नावाने तयार झालेले आहे. जगातील अन्य देशांतून त्यांच्या देशाचे संविधान हे ‘इन द नेम ऑफ गॉड, इन द नेम ऑफ अल्लाह’ या नावाने तयार झालेले आहे. भारतीय राज्यघटनेत तसे झालेले नाही, हे आपल्या राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय राज्यघटना ही आम्ही भारतीय लोक, आम्ही असे ठरवतो, हा देश प्रजासत्ताक, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष करतो, समता, बंधुता देतो अशी मांडणी राज्यघटनेत केलेली आहे. राज्यघटना आम्ही निर्माण करतो आणि आम्हाला देतो आणि त्याचा आम्ही स्वीकार करतो अशी आपली राज्यघटना आहे. माझ्या लेखी आपल्या राज्यघटनेचे हे अनोखे वैशिष्ट्य आहे.

राज्यघटनेची तीन बलस्थाने...

१) सर्वांत प्रथम म्हणजे हा देश सार्वभौम आहे. म्हणजे काय तर, तुमचे अन्य राष्ट्रांशी संबंध ठरविण्याचे अधिकार आपल्या देशातील सरकारला आहेत. अंतर्गत निर्णयाचा अधिकार हा देशातील सरकारकडे असून तो घेण्यासाठी अन्य देशांनी दडपण, दबाव आणता कामा नये.

२) दुसरे बलस्थान म्हणजे, भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. अत्यंत रंगबिरंगी देश आहे. वेगळ्या भाषेत सांगायचे, म्हणजे आपला देश ‘रेन बो’ अर्थातच सप्तरंगी इंद्रधनुष्य असलेला देश आहे. आपल्या देशात विविध जाती, धर्म, प्रदेश, सांस्कृतिक समूह एकोप्याने नांदत आहेत. या सर्व समूहांना एकत्रित ठेवण्याचे सामर्थ्याचे काम, तत्त्व म्हणजे ‘प्रमाणि’, अर्थातच धर्मनिरपेक्षता. धर्म राष्ट्रीय नाही. प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य आहे. याचा थेट अर्थ असा की, इतरांचे धर्म स्वातंत्र्य नष्ट होता कामा नये. धर्मनिरपेक्षतता हे आपल्या लोकशाहीचे मूलभूत वैशिष्ट्य आहे.

३) आपला देश हा प्रजासत्ताक आहे. जगातील अन्य लोकशाही देशांमध्ये अजूनही राजेशाही कायम आहे. उदा. ब्रिटन, जपान. परंतु आपल्या देशातील लोकशाहीत केवळ लोकशाही आणि लोकशाहीच आहे. आपल्या राज्यघटनेमुळेच ही लोकशाही आहे.

राज्यघटनेमुळेच देश एकात्म

मी देशभरात फिरत असतो. वेगवेगळ्या समूहात, प्रदेशात फिरत असतो. यावेळी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते, ती म्हणजे, विभिन्न प्रदेशांत, वेगवेगळा धर्म, संस्कृती असणारे लोक एकत्रित नांदतात कसे? माझ्यापुढे खरोखरच हा मोठा प्रश्न होता. देशात संविधान येण्यापूर्वी भारत एक राष्ट्र नव्हते. राष्ट्रीयत्वाची भावना नव्हती. देशात वेगवेगळ्या प्रांतात राजे, सरदार होते आणि ते आपापल्या प्रदेशांच्या सरंक्षणासाठी आपापसांत लढत होते. भारतीय राज्यघटना निर्माण होताना घटना परिषदेने नमुद केलेले आहे, की भारत एक नव्हता. एक राष्ट्र, राष्ट्रीयत्व निर्माण होण्यात राज्यघटनेचे योगदान आहे. आपण केवळ राज्यघटनेमुळेच एकत्रित राहत आहोत. केवळ राज्यघटनेमुळेच देश एकात्म राहिला आहे. सर्व भारतीय एकत्रितरीत्या चांगल्या पद्धतीने नांदत आहोत.

धर्मनिरपेक्षतेवर संकट

जगाच्या इतिहासात १९९०च्या दशकानंतर ध्रुवीकरण करणाऱ्या दोन बाबी ठरल्या. त्यांना मी जुळी अपत्ये आहेत, असे समजतो. त्यातील पहिले अपत्य म्हणजे ‘जागतिकीकरण’. दुसरे म्हणजे आपण जगाच्या इतिहासाकडे पाहिल्यास असे लक्षात येईल की, सांस्कृतिक संघर्ष या काळात उभा ठाकलेला दिसतो. इस्लामचे आक्रमण आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी ख्रिश्चन, हिंदूही तितकेच आक्रमक झालेले आपल्याला दिसतात. भारतातही १९९०च्या दशकात जागतिकीकरणाचे वारे वहायला सुरुवात झाली. मनमोहनसिंग यांनी देशाचे आर्थिक धोरण जाहीर केले. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवानी यांनी रथयात्रा काढली. ही रथयात्रा देशातील विद्वेषाचे कारण ठरली. त्याचवेळी बाबरी मशिद पाडली गेली. ती पडल्यामुळे देशात दहशतवाद आला. तोपर्यंत भारतात दहशतवाद नव्हता. त्यानंतर देशात बॉम्बस्फोट झाले. देशातील दहशतवादाला रथयात्रेमुळे सुरवात झाली. त्याचे विषारी परिणाम आपण आज भोगत आहोत. त्यानंतरच देशात धार्मिक, जातीय राजकारण सुरू झाले. देशाच्या धर्मनिरपेक्षततेवर ते संकट असून त्याचा परिणाम होत आहे. धर्मसंसद हा वेगळाच प्रकार आहे. मी त्यांना संत नाही म्हणणार. भगवेधारी असा मी उल्लेख करतो. भगवेधारी स्त्रिया धर्मात द्वेष पसरवत आहेत. हे सर्व धर्मनिरपेक्षततेचे वैरी आहेत. देशात १९९०नंतर जागतिकीकरण आणि सांस्कृतिक, धर्म संघर्ष सुरू झाला. यामुळे देशाची पीछेहाट होणार आहे. हिंदूंची संख्या विविध जातीत आहे. जातीचे हितसंबंध परस्परांच्या विरोधात आणि विस्कळित आहेत. जातीच्या संघर्षात कोणीही विजयी होणार नाही. देशाच्या विकासासाठी शांतता महत्त्वाची आहे. ही शांतता नष्ट करण्याचे काम १९९०पासून सुरू आहे. काहींना इथे कायम संघर्ष पाहिजे आहे. अशा परिस्थितीत पंडित नेहरू यांच्या परराष्ट्र धोरणाची आवर्जून आठवण होते. देशात १९९० पासून शांतता नष्ट करण्याच्या आणि भारतीय राज्यघटनेलाही मोठा धोका आहे.

राज्यघटनेसमोरील धोके

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली, ते महत्त्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेबाबत केलेले पहिले भाषण खूप महत्त्वाचे आहे. सर्व भारतीयांनी ते आवर्जून ऐकले पाहिजे. पहिल्या भाषणात त्यांनी देशासमोरील आव्हाने सांगितली.

राज्यघटना कोण उद्ध्वस्त करेल यावरही त्यांनी त्या भाषणात भाष्य केले आहे. घटना परिषदेने राजकीय समता दिली आहे, आर्थिक समता दिलेली नाही. आर्थिक समता न दिलेले, दारिद्र्यात खितपत पडलेले, आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहिलेले पुढे येऊन राज्यघटना उद्ध्वस्त करतील, असे डॉ. आंबेडकर यांनी सांगितले आहे. तरुण आहेत, ज्यांच्यात पात्रता आहे, ज्यांच्या हाताला काम नाही असा जनसमुदाय विरोधी चळवळ उभी करेल. धर्मांध चळवळीमुळे तर राज्यघटना उद्ध्वस्त होण्याचा मोठा धोका मला जाणवतो. आपल्याला राज्यघटना एका हातात आणि दुसऱ्या हातात विषमता, दारिद्र्य, अपमान सहन करणारा समुदाय आणि त्यांना चेतावणी देणारे साहित्य घेऊन कधीच चालता येणार नाही. हिंदुत्ववाद, प्रादेशिकवाद, भाषावाद याचाही राज्यघटनेला मोठा धोका आहे. वैचारिक वास्तव लक्षात घेऊन धर्मग्रंथ फेकून द्यावे लागतील आणि राज्यघटना हा एकच पर्याय आपल्याला ठेवावा लागेल.

विविधतेने नटलेल्या देशाला राज्यघटनेने एकसंधपणे बांधून ठेवले आहे. भारतीय राज्यघटना प्रजासत्ताक आणि सार्वभौम आहे. धर्मनिरपेक्षतेच्या धोरणामुळे सर्व धर्मांचे स्वातंत्र्य कायम आहे. हिंदुत्ववाद, प्रादेशिकवाद, भाषावाद हे राज्यघटनेसमोरील मोठी आव्हाने आणि धोके आहेत. त्यावर वैचारिक वास्तवता हाच उपाय आहे.

रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT