Indians who went to Africa sakal
सप्तरंग

इंग्लंडमध्ये भारतासोबत नांदतेय आफ्रिका

आपण अन् आफ्रिकन्स फक्त आर्थिक व सामरिक बाबतीतच एकसारखे नाही आहोत. दोघांनाही ब्रिटिश साम्राज्याखाली पिचलेल्या जनतेचा इतिहास आहे.

अवतरण टीम

- वैभव वाळुंज

आपण अन् आफ्रिकन्स फक्त आर्थिक व सामरिक बाबतीतच एकसारखे नाही आहोत. दोघांनाही ब्रिटिश साम्राज्याखाली पिचलेल्या जनतेचा इतिहास आहे.

जुलै महिना इंग्लंड आणि पाश्चात्य देशांमध्ये हल्ली ‘साऊथ एशियन हेरिटेज मंथ’ अर्थात दक्षिण आशियामधून येणाऱ्या विविध वंशांच्या नागरिकांसाठी वारसा महिना म्हणून साजरा केला जातो. त्यात प्रामुख्याने भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातून इंग्लंडमध्ये स्थलांतर करणारे नागरिक असले, तरी त्यांचे प्रवास आपल्याला वाटतात तितके सरळ-सोपे नसतात.

इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या देशांमधून इंग्लंडमध्ये आलेल्या नागरिकांत विविध कारणांची आणि त्यांच्या अस्तित्वाची प्रचंड सरमिसळ झालेली आढळते अन् म्हणूनच अनेकदा हे प्रवास थेट नसून ते जगाच्या विविध टप्प्यांवर अन् कोपऱ्यांवर एकमेकांशी जोडलेले असतात. अगदी काही वर्षांपूर्वीच हे प्रवास लपवण्याकडे आणि त्यांची सर्व पाळेमुळे मिटवण्याकडे लोकांचा कल होता.

आपल्या भूतकाळातील प्रवासाविषयी बोलणे हे प्रवासी भारतीयांना किंवा दुसऱ्या देशांमध्ये जाऊन स्थायिक झालेल्या आणि तिथल्या पांढऱ्या नीतिमत्तेशी जुळवून घेणाऱ्या लोकांसाठी आयुष्यात घडून गेलेली एक चुकीची घटना एवढेच महत्त्व बाळगून होती, मात्र गेल्या काही वर्षांत आणि विशेषतः ब्लॅक लाईव्ह मॅटरसारख्या चळवळी सुरू झाल्यानंतर या वारशाकडे अजून डोळसपणे पाहणे सुरू झाले.

त्यातून फक्त कृष्णवर्णीय नाही; तर इतर वर्णाच्या लोकांनीही आपल्या अस्तित्वाची आणि प्रवासाची जपणूक करत त्याच्याविषयी अभिमान बाळगायला अन् त्याच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली व त्यातूनच ब्लॅक हिस्ट्रीसारखाच ब्राऊन हिस्ट्रीचाही एक नवा अध्याय समकालीन पाश्चात्त्य इतिहासात सुरू झाला. त्याचाच एक भाग म्हणजे ब्रिटनच्या अस्तित्वाशी सध्या जोडल्या गेलेल्या भारतीयांची आफ्रिकन पाळेमुळे यांचा इतिहास होय.

इतिहासाच्या वेगळ्या टप्प्यावर बंगाल आणि पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागांमधील नागरिक वेगवेगळ्या कारणांसाठी आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर, तसेच मॉरिशस आणि तत्सम बेटावरील वसाहतींच्या आर्थिक व्यवहारावर अवलंबून होते. त्यातील विविध ठिकाणांचा कारभार हा साम्राज्याच्या हद्दीमधून होत असल्याने व ब्रिटिश नौदलाचा त्याला पूर्ण पाठिंबा असल्याने त्याचे एक अभिन्न अंग अनायासे ब्रिटिश बेटांशी जोडले गेले होते.

म्हणूनच भारत आणि आफ्रिकेच्या संबंधांचा एक मोठा इतिहास असला तरी त्यांच्या नात्यातील व्हाया इंग्लंड गेलेल्या एका पर्वाची उजळणी या निमित्ताने ब्रिटनमध्ये भरली आहे. विविध कार्यक्रमांच्या, तसेच सरकारदरबारी त्यासाठी साजऱ्या केलेल्या उत्साहपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा इतिहास अजूनच झळाळून दिसतो आहे. विशेषतः येथील सध्याचे पंतप्रधान आणि माजी गृह सचिव हे दोघेही इंग्लंडमध्ये आफ्रिकेमधून आलेले भारतीय वंशाचे नागरिक असल्याने याला वेगळेच महत्त्व येते.

आपल्याकडे भारत आफ्रिकेसारखाच आहे, हे म्हणणे लोकांना बुचकळ्यात टाकते. नायजेरियात शेती करणाऱ्या कंपनीची किंवा किर्लोस्कर यांनी पूर्व आफ्रिकेत उभारलेल्या यशाची गाथा मात्र आपलीशी वाटते, पण हाच संबंध जेव्हा इंग्लंडच्या इतिहासामधून लावला जातो तेव्हा त्याच्याकडे काही प्रमाणात औत्सुक्यपूर्ण नजरेतून पाहिले जाते.

भारत आणि आफ्रिका यांची तुलना करायची म्हटले की, आपण आणि आफ्रिकन्स फक्त आर्थिक अन् सामरिक बाबतीतच एकसारखे नाही आहोत. या दोघांमध्ये ब्रिटिश साम्राज्याखाली पिचलेल्या जनतेचा इतिहास असला तरीही साम्राज्याच्या एकूण आर्थिक वळचणीला जाऊन बसलेल्या विविध उमरावांचा, तसेच सावकारी तत्त्वावर त्याचा पाया भरणाऱ्या लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता.

पूर्व आफ्रिकेत गुजराती व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या वखारी आणि व्यवसायातून भारताचा ब्रिटनशी होणारा प्रवास आफ्रिकेद्वारे सुरू झाला. भारत आणि आफ्रिका यांच्यातील तुलना अवाजवी वाटत असली तरी जगातील महत्त्वाच्या काही अर्थव्यवस्थांपैकी एक आणि नव्या जगाचे उभारते मानव संसाधनांचे इंजिन म्हणून समोर येणाऱ्या आफ्रिकन देशांचा इंग्लंडमधील आणि भारतातील विविध उद्योगांना पुरवल्या जाणाऱ्या कच्च्या मालासंदर्भातील सहभाग महत्त्वपूर्ण आहे.

एकीकडे मोरोक्को आणि तत्सम देश आफ्रिका ही ओळख बदलण्यासाठी आणि काही अंशी दुर्दैवीपणे पुसण्यासाठी काम करत आहेत, मात्र भारताच्या आणि इंग्लंडच्या सोबतीने या इतिहासाला नव्या वळणावर नेण्याचे काम केले जाऊ शकते. फ्रेंच आफ्रिकेत भारताला आता सॉफ्ट पॉवर म्हणून फक्त बॉलीवूड गाण्यांच्या पुढे जाण्याची गरज आहे.

भाषेच्या अडसराने आपण ते टाळत आलो, पण चीनमधील नागरिकांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून इथल्या प्रत्येक देशात आपले अस्तित्व प्रस्थापित केले आहे. हा प्रयत्न आपल्यालाही करता येईल. फ्रेंच आफ्रिकेत आपली छाप उमटवायची असेल, तर गांबिया हे सर्वात महत्त्वाचे ठाणे ठरू शकेल.

इंग्रजी बोलणाऱ्या या देशाची इतर फ्रेंच देशांच्या मधोमध असणारी आणि तरीही सागरी, खुष्की आणि हवाई मार्गाने युरोपसोबतच आशियाशी असणारी संपर्क साधने भारताला सहजी उपलब्ध आहेत. म्हणूनच ब्रिटनशी जोडलेल्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर सामरिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी भारताला हा वारसा महत्त्वाचा ठरणार आहे. अशी मैत्री आणि सामरिक युती करण्यासाठी आफ्रिकेतील देश प्रचंड उत्सुक आहेत.

भारताविषयी असणारे आकर्षण हा त्यातला महत्त्वाचा घटक. युरोपात जाण्याचे स्वप्न आणि त्याला लागणारी बौद्धिक-शैक्षणिक कुवत असणारे युवक तो मार्ग मिळाला नाही, तर सरकारी शिष्यवृत्तीधारक बनून भारतात येणे पसंत करतात. त्यांच्या भारतातील अस्तित्वाचा, राहणीमानाचा आणि त्यांना भारतीयांकडून मिळणाऱ्या सामाजिक वागणुकीचा दर्जा सुधारल्यास या मार्गाने भारताला प्रगतीची अनेक साधने उपलब्ध होणार आहेत.

मध्ययुगात आफ्रिकन गुलामांना मुक्त करून त्यांना सरदार म्हणून ठेवण्याची सशक्त परंपरा होती, म्हणून दख्खन भारतात मुघल साम्राज्यापासून स्वतंत्र राज्ये निर्माण होऊ शकली. आपल्याला आपल्या रूढीगत संकल्पनांचे अडथळे दूर सारून जगाच्या नव्या उभरत्या आफ्रिकन अर्थव्यवस्थेकडे बरोबरीचे भागीदार म्हणून पहावे लागेल. त्यासाठी भारतीयांच्या आणि आफ्रिकन नागरिकांच्या वर्तमानातील अन् इतिहासातील विविध टप्प्यांकडे साम्राज्याच्या पार्श्वभूमीवर पाहण्यासाठी जुलै महिन्यातील इतिहासपर्व मोठी संधी आहे.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्ती अंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT