Indipendence day 2022 rural development 
सप्तरंग

Independence Day 2022: भारतीयत्वाचा मूळ भाव खेड्यातूनच वृद्धिंगत

शेतीबरोबरच देशातील सहा लाखांवर खेडी हा भारताचा आत्मा आहे

सकाळ वृत्तसेवा

शेतीबरोबरच देशातील सहा लाखांवर खेडी हा भारताचा आत्मा आहे, असे म्हटले जाते. या खेड्यांतील आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेला आता घरघर लागली आहे. खेड्यांमधील चैतन्य परत जिवंत करायचे असेल, तर धोरणांपासून ते व्यवस्थांपर्यंत खूप काही बदलावे लागेल. निसर्गस्नेही रचना हा या व्यवस्थेचा अविभाज्य भाग होता, तो पुनर्स्थापित करावा लागेल.

भौतिक

स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर गावे हा भारताच्या कृषी, सामाजिक आणि आध्यात्मिक रचनेचा गाभा आहे.

भारतीय परंपरा लोकशिक्षणाचे महत्त्वाचे साधन आहे. आजही काही ठिकाणी या परंपरा जपल्या जातात. स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला आजच्या काळात आपण चक्रीय अर्थव्यवस्था (Circular Economy) असे म्हणतो.

आजही खेड्यांतील काही चालीरीती पूर्वी होत्या तेवढ्या उपयुक्त आहेत. जसे की, शेतकरी हा यजमान मानला जायचा आणि इतर कौशल्य असलेले आणि शेती नसलेले कारागीर त्याला मदत करायचे. ही परस्पर पूरक व्यवस्था होती.

शेतीशी पूरक बाबींची पूर्तता करणाऱ्या समाजाची उपजीविका गाव पूर्ण करू शकते, त्यासाठी भारतीय परंपरेचे पुनरुत्थान गरजेचे.

आपली ग्रामरचना या सर्वांना पूरक अशीच होती. त्या वेळेची सुबत्ता ही शेती आणि पशुधन यामध्येच होती. ही रचना आत्मनिर्भर आणि परस्परपूरक होती. आपली ग्रामव्यवस्था मजबूत आणि एकसंध असल्याने अनेक आक्रमणे झाली तरी ती अबाधित राहिली.

ग्राम स्वराज्याची संकल्पना समजून घेणे गरजेचे. आपली खेडी भारताइतकी जुनी आहेत. शहरे मात्र नंतर तयार झाली आहेत.

------------------------

भविष्यातील अपेक्षा

स्वच्छता, जलसंधारण, शिक्षण, शाश्‍वत शेती, आरोग्य आदी सोयींमुळे गावांचे स्वरूप पालटले आहे. राज्याची एकूण व्याप्ती लक्षात घऊन सरकारने या प्रयत्नांना आणखी बळ द्यायला हवे.

-----------------------

भविष्यातील अपेक्षा

स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, जलनिस्सारण, रस्ते, जलसुरक्षा, नदी-नाले-ओढे यांच्यावरील अतिक्रमणे सरकारने हटवावीत.

------------------------

भविष्यातील अपेक्षा

राज्यातील सुमारे ६० टक्के ग्रामपंचायती सातत्याने दुष्काळाच्या सावटाखाली असतात. त्यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ते टाळण्यासाठी जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात.

------------------------

भविष्यातील अपेक्षा

ग्रामीण जीवनाचे संपूर्ण चक्र उलटे फिरविता येणार नाही. गावातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केल्यास स्थलांतर थांबेल. सरकारने त्यासाठी खासगी क्षेत्राचीही मदत घ्यावी.

------------------------

भविष्यातील अपेक्षा

तेराव्या वित्त आयोगाने थेट करातील काही वाटा सुनिश्‍चित करून स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. रचनात्मक कामांची उभारणी केल्यास शाश्‍वत ग्रामविकासाचे स्वप्न निश्‍चितपणे साकार होईल.

------------------------

भविष्यातील अपेक्षा

२०६० मध्ये देशाची लोकसंख्या सुमारे १६० कोटींच्या आसपास जाण्याचा अंदाज. नागरी प्रशासनावरील ताण आणि समस्यांचा अभ्यास करून सरकारने ग्रामीण आणि शहरी आराखडे तयार करावेत.

आध्यात्मिक

आपले बहुतांश सण, उत्सव शेती आणि ग्रामीण प्रथा-परंपरांशी संबंधित आहेत. पोळा सणादिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करून गावभर त्यांची मिरवणूक हा केवळ सोपस्कार नसून वर्षभर आपल्यासाठी अन्न देणाऱ्या श्रमशक्तीचा तो सन्मान आहे. दसरा, दिवाळी, पाडवा हे सणही कृषी आणि ग्रामीण व्यवस्थेचाच भाग आहेत. भजन, कीर्तन, अाध्यात्मिक सोहळे साजरे करण्यासाठी गावांनी वारंवार एकत्र आले पाहिजे.

आपली ईश्वर, भगवंताची व्याख्या म्हणजे पंचमहाभूते. आपल्याला वारशात मिळालेली अबाधित निसर्गसंपदा, नद्या, जैवविविधता, वनराई येत्या काळात जपणे आवश्यक आहे.

गंगा, गोदावरी खोऱ्यांत पहिल्यांदा वसाहती झाल्या. गोदावरी खोऱ्यातील वसाहतीस ‘अश्मक’ असे संबोधले जायचे. याच काळात प्रशासकीय चौकट अस्तित्वात आली, स्थिर झाली आणि त्यात सुधारणा होत गेली. कौटिल्य आणि पाणिनी यांच्या साहित्यात त्याचा उल्लेख आहे.

मोहंजोदाडो, हडप्पा आणि तत्कालीन मानवी सभ्यतांचा उदय हे पहिले नागरीकरण. यामधील महत्त्वाची बाब म्हणजे भारतीयत्वाचा मूळ भाव हा खेड्यातूनच वृद्धिंगत झाला.

प्राचीन काळात ग्रामस्तरावर स्थानिक संस्था अस्तित्वात होत्या. त्यांना सभा, ग्रामणी, ग्रामवृद्ध अशा संज्ञा होत्या. गावातील तंटे गावातच मिटविण्याची व्यवस्था होती.

--------

११,२३,७४,०००

महाराष्ट्राची लोकसंख्या

६,१५,५६,०००

ग्रामीण लोकसंख्या

३६ (ग्रामीण ३४) : जिल्हे

३५५ (३५१ ग्रामीण) : तालुके

२७,९२४ : ग्रामपंचायत संख्या

------------

खेडी हा आपल्या भारतीय अर्थ आणि सामजिक व्यवस्थेचा कणा आहे. आपले पंचांग निसर्गाशी अनुरूप आहे. भारतीय परंपरा या केवळ समारंभ नसून तो जीवनशैलीचा भाग आहे. परस्पर संबंध दृढ करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हा याचा गाभा. मॉन्सून हा आपल्या देशाच्या समृद्धीचा पाया. मुबलक शेतजमीन, पशुधन ही आपली संसाधने आणि संपत्ती. याचे संरक्षण करणे आणि ते अबाधितपणे पुढील पिढीला हस्तांतरित करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा समग्र दृष्टीने ग्रामविकासाकडे पाहावे लागेल.

- डॉ. सुमंत पांडे, ग्रामविकासाचे अभ्यासक आणि माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT