Inspirational story of lady esakal
सप्तरंग

खवा विक्रीतून 'तिने' निर्माण केली स्वतःची ओळख

विजयकुमार इंगळे : सकाळ वृत्तसेवा


कुटुंबाच्या जगण्याची लढाई लढण्यासाठी उत्तर प्रदेशातून थेट महाराष्ट्रात स्थलांतरित व्हावे लागले... मात्र परिस्थितीला बसून राहण्याची मुभा नाही, या वाक्यावर ठाम राहत तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते. कष्ट उपसण्यासाठी नेहमीच सरसावत किरणताईंनी आपल्या दुबे कुटुंबाला उभे करतानाच खवा विक्री व्यवसायानिमित्ताने आर्थिक घडी बसवत स्वतःची ओळख उभी केली.

किरण त्रिवेणीप्रसाद दुबे... शिक्षण जेमतेम आठवी... माहेर मुंबईतील, तर सासर उत्तर प्रदेशच्या वाराणसीजवळील ग्यानपूर येथील... वडील पंचम मिश्रा रिक्षाचालक. परिस्थिती जेमतेम असल्याने शिक्षण अर्ध्यावरच सुटले आणि १९९९ मध्ये वडिलांनी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मुलगी किरणताई यांचा ग्यानपूर येथील दुबे परिवारातील त्रिवेणीप्रसाद यांच्याशी झाला. सासरीही परिस्थिती बेताचीच असल्याने शेतमजुरी करण्यातच कुटुंबाला कसरत करावी लागत होती. त्यामुळे त्रिवेणीप्रसाद हे महाराष्ट्रात एका नातलगाच्या मदतीने कामासाठी महाराष्ट्रात आले. या काळात पडेल ते काम किरणताई गावी, तर पती त्रिवेणीप्रसाद करत होते. कुटुंबाची ओढाताण होऊ नये यासाठी त्रिवेणीप्रसाद यांनी कुटुंबाला आपल्यासमवेत आणले. याच काळात शुभम, श्रद्धा, रुद्र आणि आशुतोष या मुलांमुळे कुटुंबाची सदस्यसंख्याही वाढली होती.

नायगाव (ता. येवला) येथे नातेवाइकांकडील मुक्काम थेट चिचोंडी येथे कामानिमित्ताने हलविला. गावाच्या वेशीवर एका रूममध्ये आपला संसार थाटला. प्रारंभी पडेल ते काम करणाऱ्या कुटुंबासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. मात्र पती त्रिवेणीप्रसाद यांना खंबीर आधार देत परिस्थिती कशीही आली तरी मागे हटणार नाही, असा चंगच किरणताईंनी बांधला. गावाकडे मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या खवा निर्मितीचा व्यवसाय दुबे कुटुंबाने सुरू केला. या व्यवसायात भांडवलाची फारशी गरज नसल्याचे ओळखून किरणताईंनी पतीच्या मदतीने दूध आटविण्यासाठी सुरवात केली. येथूनच खऱ्या अर्थाने कुटुंबाला उभारी मिळाली. प्रारंभी दिवसाकाठी खवा निर्मितीतून दोनशे रुपये मिळत होते. मात्र ही रक्कम या कुटुंबासाठी मैलाचा दगड ठरली. किरणताईंनी दिवसभर कष्ट करत बनविलेल्या खव्याची विक्री करण्यासाठी त्रिवेणीप्रसाद खेड्यांवर विक्रीसाठी जाऊ लागले.

जीवघेणा प्रसंग गुदरला...

येवला तालुक्यासह जवळच्या मालेगाव, कोपरगाव, संगमनेर, नगर भागात किरणताईंनी तयार केलेला खवा त्रिवेणीप्रसाद यांनी विक्रीसाठी नेत दुबे कुटुंबाने आपली ओळख उभी केली. याच काळात २०१३ मध्ये येवल्याजवळ मांजामुळे गळा चिरल्याने पती त्रिवेणीप्रसाद दैव बलवत्तर म्हणून बचावले. मात्र तेव्हा खवानिर्मितीपासून ते बाजारात पोचविण्यापर्यंत सर्व कामे किरणताईंनी स्वतःकडे घेतली. आपल्या कुटुंबाला आधार देत असतानाच कष्टासाठी कुठेही कमी न पडता त्यांनी आज मिळविलेले यश नक्कीच अभिमानास्पद आहे. किरणताईंच्या खव्याने पंचक्रोशीत आपली ओळख उभी करतानाच तयार केलेल्या खव्याचा ब्रॅन्ड करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

स्वप्नपूर्तीचा आनंद

लग्नानंतर उत्तर प्रदेशातून थेट महाराष्ट्रातील येवला तालुका गाठल्यानंतर एक वेळ खायची भ्रांत आणि निवाऱ्याची सोय नसताना काढलेली प्रतिकूल परिस्थिती आठवल्यानंतर डोळे भरून येतात. मात्र खवानिर्मिती उद्योगातून किरणताई यांच्या परिवाराने स्वमालकीचे प्रशस्त घर तसेच चिचोंडी येथे जमीनही खरेदी केली आहे. मुलांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख करावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच शिक्षणासाठी कुठेही कमी पडणार नाही, असा चंगच बांधलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT