Pakhara Book Writing by Childrens Sakal
सप्तरंग

पाड्यातल्या मुलांनी लिहिलं एक पुस्तक

आपल्या भागातल्या पक्ष्यांविषयी मुलांनी लिहिलं, त्यांची पक्ष्यांविषयीची निरीक्षणं एखाद्या संशोधनातनं मांडलेल्या पक्षी पुस्तकापेक्षा कमी नव्हती.

जयश्री कुलकर्णी

आपल्या भागातल्या पक्ष्यांविषयी मुलांनी लिहिलं, त्यांची पक्ष्यांविषयीची निरीक्षणं एखाद्या संशोधनातनं मांडलेल्या पक्षी पुस्तकापेक्षा कमी नव्हती.

आपल्या भागातल्या पक्ष्यांविषयी मुलांनी लिहिलं, त्यांची पक्ष्यांविषयीची निरीक्षणं एखाद्या संशोधनातनं मांडलेल्या पक्षी पुस्तकापेक्षा कमी नव्हती. या प्रकल्पादरम्यानची प्रक्रिया, निरीक्षणं हे सगळं मुला-मुलींनी त्यांच्या भाषेत, शैलीत लिहिलंय. तेच आम्ही ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापलं आहे.

नईच्या मेरं हबा, हुंबाला पाणी तुंबा... नईच्या मेरं काकडी, नई चालली वाकडी वाकडी नईवर (नदीवर) जायचं, डुंबायचं, उंबरावरून उड्या टाकायच्या. खडकालगतची खेकडी पकडायची, ती भुजून(भाजून) खायची. कधी बाबाबरोबर जंगलात जायचं, सरपण आणायचं. कैऱ्या पाडायला-अळवा खायला जंगलात हिंडायचं. कापरीत लपायचं. झाडावर सरसर चढायचं. भात लावताना चिखलाने एकमेकांना माखवायचं आणि असे कित्येक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे हेच करायचं! हे कुणीतरी खरंच जगतंय. मुक्त, आनंदी, मोकळं... अजूनही समाजमाध्यमांच्या गुंतागुंतीच्या काळातही.

ही पोरं-पोरी जंगलाबरोबरीनेच वाढतात... त्यांना जंगलाची भाषा कळते. बाफळी, लोत, सरंबल या आणि अशा अनेक भाज्या आपल्या जंगलात कुठे सापडतात, त्या कशा शिजवायच्या हे त्यांना माहीत. कुठला पक्षी एका वेळेस किती अंडी देतो, घरटं कसं बांधतो, भारद्वाज कसा फार उंच उडत नाही, डोंगराच्या टिगीला राहतो, हारुड पक्षी कसा उपडा पडून मरतो, नदीतले मासे, खेकडे... हे सगळं त्यांना कुणीही पुस्तकातनं शिकवलेलं नाही. हा तर त्यांच्या दिवसाचा अविभाज्य तुकडा.

शाळेतल्या चौकटीत मात्र हे कुठेतरी हरवतं.. मग यांचा हा मुक्तपणा, मोकळेपणा त्यांच्यातली चमक कुठे जाते? ती असतेच, पण चार भिंतीत सापडत नाही. ती कशी पकडता येईल?

मग आम्ही जव्हारमधल्या जि. प. शाळांत मुलांच्या भवतालातले विषय घेऊन बोलायला सुरुवात केली. आशय त्यांच्या ओळखीचाच. त्यांच्या रोजच्या आयुष्यातले अनेक विषय काढले. त्याभोवती खूप गप्पा मारल्या. गप्पा-गप्पांत छोटे-मोठे अनुभव कागदावर उतरवले. गावात लग्न असतं तेव्हा ते काय काय करतात, बाहेरगावी बाचकी बांधून जेव्हा कामासाठी चार पैसे कमवायला जातात तेव्हा तिथे कंत्राटदाराबरोबर काय भानगडी होतात, खेळताना काय भांडणं होतात, जंगलात शेवळा गवसायला जाताना कसा सापच पाठी लागतो... आणि पाहता पाहता २५ शाळांमधल्या ४०० मुला-मुलींनी त्यांचे अनेक अनुभव, सणांविषयी, भाज्या, खेळ त्यांच्या प्रक्रियेविषयी भरभरून लिहिलं.

मुलांसाठी हे विषय ओळखीचे असले तरी आपला अनुभव मांडता येणं, हे ते नव्यानेच करत होते. त्यातल्या जागा शोधत होते. त्यांच्या गोष्टींत गावातल्या लग्नातल्या पात्रांविषयी तपशील होते, काही ठिकाणी खेकडे पकडण्याच्या प्रक्रियांविषयी सविस्तर लिहिलं होतं, पक्ष्यांच्या शिकारीचे अनुभव होते. पोहताना, पाण्यात डुंबताना केलेल्या मज्जा होत्या... या नुसत्या घटना नव्हत्या तर कित्तीतरी मजेचे, भीतीचे, रागाचे क्षण ते त्यांच्या लेखनात पकडू शकले याचं कौतुक वाटतं. या प्रक्रियेतून गेलेल्या सगळ्यांनाच त्यांचे अनुभव लेखनात पकडता आले असं नाही, पण त्यातल्या काहींनी ते तोंडी सांगितलं. त्यावर गप्पा मारल्या. शब्दांत कसं मांडता येईल याचाही प्रयत्न झाला.

त्यांच्याकडे खूप सांगण्यासारखं होतंच, आहेच. पण हे त्यांचे विषय पुस्तकात सापडत नाहीत. मग मुलांसाठी पुस्तकातले निबंध आणि हे बंधरहित जगणं सांधलंच जात नाही. मोठं होण्याच्या भानगडीत मग ते असंच विरून जातं. या सगळ्या गोष्टी आम्ही कॅलेंडरच्या माध्यमातून छापल्या. या गोष्टी वाचलेल्या अनेकांनी त्यांचं स्तिमितपण आमच्यापर्यंत पोचवलं. खेडेगावात राहणाऱ्यांचं दुर्गम-अडचणींचं-अभावाचं जग त्यांना माहीत होतं; पण मुलांच्या आनंदाच्या अस्सल जागा मात्र मुलांनीच त्यांच्यापर्यंत थेट पोचवल्या. आम्ही फक्त माध्यम बनलो. मुलांच्या या अभिव्यक्तीला भरपूर प्रेम आणि प्रोत्साहन मिळालं.

जंगलफेऱ्यांदरम्यान तर आपणच तोकडे वाटायला लागतो, इतकं भरभरून सांगतात पोरं. कुठला पक्षी घरटं कसं बनवतो, एका वेळी अंडी किती घालतो, उन्हाळ्यात, पावसाळ्यात की हिवाळ्यात दिसतो? शेगटाच्या झाडावर की हेदीच्या झाडावर दिसतो, असं सगळं या मुलांना पाठ. रंगाने सारखा असला तरी एका खुणेने वेगळा पक्षी आहे. ही त्यांची नजर थक्क करणारी होती. घरट्यांची वर्णनं तर अशी करतात की पक्षी आणि घरटं जसच्या तसं उभं राहत होतं डोळ्यांसमोर. आणि मग कातऱ्याला का कातऱ्या म्हणतात, त्याची नखं कशी कात्रीसारखी असतात, बांडोळा कसा धुराशीच दिसतो, कन्हूरला कसा एका वेळी २०-२४ अंडी देतो. अशा सगळ्या तपशिलांवर पोरांबरोबर ‘पक्षी गप्पा’ चांगल्याच रंगतात.

गप्पा मारता मारता माहीत असलेल्या पक्ष्यांची यादी काढायला घेतली आणि ६८ पक्षी निघाले. आपल्याकडे इतके पक्षी आहेत याची नोंद घेतली गेली आणि या निमित्ताने पहिल्यांदाच मोजलं! पक्षी गोष्टी लिहिताना त्यात पक्ष्यांच्या शिकारीचेही अनुभव होते. एखादा पक्षी कसा पकडायचा, कसा भुजून खायचा याचंही सविस्तर वर्णन मुलांनी त्यांच्या अनुभवलेखनात केलं. अशा प्रसंगी तुम्ही पक्ष्यांची शिकार करणं कसं योग्य नाही हे मुलांना सांगता आलं असतं, पटवताही आलं असतं; पण तिथल्या तिथे हा शिक्का मारला असता तर त्याचा परिणाम वेगळा झाला असता.

शिकार वाईट, पक्षी पकडून भुजून खाणं वाईट इथूनच सुरुवात केली तर संवाद सुरू व्हायच्या आधीच संपेल. मग आपल्याच अनुभवांना तटस्थ कसं पाहता येईल? एखादे पक्षी आपल्या भागात केव्हा केव्हाच दिसतात, नंतर गायब होतात; असं का बरं होत असावं? आपण खातो त्या पक्ष्यांची घरटी आपल्याकडे दिसतात का? अशा प्रश्नांकडे वळवून अभ्यासातून मतं तयार होण्याकडे कल व्हावा. त्यांच्या निरीक्षणांना एका मोठ्या चित्राची जोड देणे, सूक्ष्मरीत्या त्याला अभ्यासणे याकडे वळणे अधिक योग्य ठरेल.

आपल्या भागातल्या पक्ष्यांविषयी मुलांनी लिहिलं, त्यांची पक्ष्यांविषयीची निरीक्षणं एखाद संशोधनातनं मांडलेल्या पक्षी पुस्तकापेक्षा कमी नव्हती. या प्रकल्पादरम्यानची प्रक्रिया, निरीक्षणं हे सगळं मुलां-मुलींनी त्यांच्या भाषेत, शैलीत लिहिलंय. तेच आम्ही ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापलं आहे. या पक्षी प्रकल्पादरम्यान पक्ष्यांची केवळ माहिती नाही तर त्यापलीकडे जाऊन तर्कसंगती, अंदाज लावता येणं, खोलात निरीक्षणं करता येणं, सहसंबंध ओळखता येणं या आकलन टप्प्यांवरही काम झालं. आजवर पुस्तकातली अनोळखी माहिती वाचणाऱ्या मुलांनी ‘पाखरां’ आणि कॅलेंडरच्या निमित्ताने स्वत:च एक माहितीचा स्रोत तयार केलाय. त्यांच्यासाठी हे समृद्ध शैक्षणिक अनुभव ठरलेत.

केव्हा केव्हा शाळेतल्या चार भिंतीत ही पोरं गप्प गप्प वाटतात, पुढे यायला घाबरतात. असंच आत्तापर्यंत बहुतेकांचं मत पडतं ‘यांच्या’विषयी. ‘त्याच पोरा-पोरींनी’ लिहिलेलं पहिलंवहिलं पुस्तक- ‘पाखरां’ आणि त्यांच्याच जगाविषयी त्यांनीच लिहिलेल्या या गोष्टींचं कॅलेंडर!

(लेखिका वयम् चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT