laapataa ladies Movie esakal
सप्तरंग

Laapataa ladies Movie - विशेष : लापता लेडीज'ला खुणावतंय ऑस्कर

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक चित्रपट आणि पात्र यशस्वी होण्यासाठी योग्य कलाकारांची निवडही तेवढीच महत्त्वाची ठरते यावर माझा ठाम विश्वास आहे.

‘लापता लेडीज’ चित्रपटाने (laapataa ladies Movie) जनमनाचा ठाव घेतला. सर्वांनीच त्याचं कौतुक केलं. २०२५ साठीच्या ऑस्कर पुरस्कारांच्या (Oscar Awards) शर्यतीत उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीमध्ये त्याची निवड झाल्याने भारतीय चित्रपटसृष्टीत आनंदाचं वातावरण आहे. देशातील पितृसत्ताक व्यवस्थेवर विनोदाच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्या आपल्या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शिका किरण राव (Directed by Kiran Rao) यांनी सर्वांनाच यशाचं श्रेय दिलं. अभूतपूर्व कौतुकाची थाप आमच्या पाठीवर पडली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सिनेमाच्या यशाचा आनंद त्यांच्याच शब्दात...

‘लापता लेडीज’ चित्रपट आमच्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. ‘ऑस्कर’सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत भारतातर्फे तो पाठवण्यात आल्याची बाब खूपच रोमांचित करणारी आहे. आमच्या सर्व टीमचं हे यश आहे. आमच्या चित्रपटाची अन् कामाची योग्य दखल घेतली गेल्याची भावना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. ऑस्करसाठीची निवड म्हणजे एक अभूतपूर्व कौतुकाची थाप आहे. आम्ही खरंच खूप उत्साहित आणि आनंदी आहोत. मात्र, त्याच वेळी अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यात खूप मोठी आव्‍हानंही आहेत, याची जाणीवही आम्हाला आहे. सर्व प्रवासात आमीर खान, एकेपी आणि जिओ स्टुडिओसारख्या सहकाऱ्यांची मदत अन् संपूर्ण देशाने आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबाबत आम्ही खूपच भाग्यवान आहोत.

आमचा सिनेमा ऑस्करला गवसणी घालेल याबाबत माझ्यासह आम्ही सर्वच जण खूप आशावादी आहोत. स्पर्धा अत्यंत चुरशीची आहे; पण ‘लापता लेडीज’ला मिळालेला प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे. या प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाची मेहनत आणि कल्पकतेचाच हा दाखला आहे. आम्हाला मिळालेल्या सन्मानाबाबत सर्वांचे आभार आणि त्याच्या जोरावरच अधिक दर्जेदार काम करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. एक चित्रपट निर्माती म्हणून एखादा विषय किंवा संकल्पनेविषयी असलेली आत्मीयताच कलाकृतीत उतरवण्याचा प्रयत्न मी करते. चित्रपट म्हणून संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली. ‘लापता लेडीज’ची कथा माझा अनुभव आणि विश्‍वास यांच्याशी मिळतीजुळती आहे. तो चित्रपट माझ्या अगदी जवळचा आहे. म्हणूनच आजचा सन्मान खूपच समाधान देणारा आहे. चित्रपटाच्या कथेसाठीचे श्रेय मी आमीर खानला देईन.

त्याने एक सर्वोत्कृष्ट कथा माझ्यापर्यंत पोहोचवली. पटकथाकारांच्या एका स्पर्धेत ती कथा आमीरच्या वाचनात आली. स्पर्धेत तिला दुसरं स्थान मिळालं होतं. तेव्‍हापासून ती कथा आमीरच्या डोक्यात घोळत होती आणि तिथूनच आमच्या चित्रपटाच्या सुंदर प्रवासाला सुरुवात झाली. ‘लापता लेडीज’ नावाची एक सर्वोत्तम कलाकृती आज जन्माला आली असून त्यामागचे खरे जादूगार आहेत, बिपलाब गोस्वामी, स्नेहा देसाई आणि दिव्‍यानिधी शर्मा... त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.

एका गावातली ‘स्टोरी ऑफ होप’ चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यासाठी आम्ही विनोदाचा वापर विचारपूर्वक केला. मला वाटतं, कोणताही सिनेमा उपदेशात्मक न होता कथेतील महत्त्वाचे बारकावे रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हास्य-विनोदाचा मार्ग अनोखा ठरतो. भावनांचा अतिरेक होऊ न देता गंभीर विषयही प्रेक्षकांपर्यंत परिणामकारक पोहोचवण्याचं काम विनोद करत असतो आणि कलाकार त्या कथेत वेगळीच जादू भरतो. ती संपूर्ण कथा आणि त्यातील ओळी त्याच्याच होऊन जातात. अक्षरश: प्रत्येकानेच चित्रपटासाठी मनापासून काम केलं आहे. प्रत्येक कलाकार आपली व्यक्तिरेखा अक्षरशः जगला आहे. आपल्या कामावरील प्रेमामुळेच त्यांना ते शक्य झालं, असं म्हणता येईल. चित्रपटनिर्मितीचा सर्व प्रवास खरंच खूप यशस्वी ठरला. ऑस्करपर्यंत पोहोचेपर्यंत तो असाच सुरू राहील, असा विश्वास आहे.

आम्ही चित्रपटातून जो संदेश देण्याचा प्रयत्न केला तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला याचंही एक वेगळंच समाधान आहे. आम्हाला जे साध्य करायचं होतं ते समजून घेतलं गेलं आणि त्याचं कौतुक झालं, ही बाब एका चित्रपट निर्मात्यासाठी खूप सुखावणारी आहे. आव्हानात्मक परिस्थितीतही आशेसाठी नेहमीच जागा असते आणि माझ्यासाठी चित्रपटातून मिळालेला हा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. मला वाटतं की, तो सर्वांशीच संबंधित आहे.

प्रत्येक चित्रपट आणि पात्र यशस्वी होण्यासाठी योग्य कलाकारांची निवडही तेवढीच महत्त्वाची ठरते यावर माझा ठाम विश्वास आहे. आमच्या चित्रपटासाठी यथोचित कलाकार शोधण्याचं संपूर्ण श्रेय आमचे कास्टिंग डायरेक्टर रोमिल यांना जातं. जेव्हा त्यांनी मला स्पर्श श्रीवास्तव, नित्यांशी गोयल और प्रतिभा रांता यांच्या कामाबाबतच्या काही टेप दाखवल्या तेव्हाच आम्हाला आमचे ‘दीपक, फूल आणि जया’ सापडले अन् त्यावर तातडीने आमचं एकमत झालं. छाया कदम आणि रवी किशन यांच्या कामाबद्दल प्रश्नच नव्हता. आमच्या परिचयाचेच ते कलाकार आहेत. आम्हाला त्यांच्यासोबत काम करायचंच होते, कारण ते या भूमिकेसाठी योग्य होते.

मी असं म्हणेन की, चित्रपटासाठी सर्व कलाकारांचा उत्साह आणि समर्पण अद्‍भुत गोष्ट होती. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनेक अविस्मरणीय क्षण घडले. असं एखादं दृश्य किंवा किस्सा सांगणं खूप कठीण आहे; पण आमच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस सर्वात भावनिक होता. कारण आम्ही खूप उत्सुकतेने आणि अक्षरशः झोकून देत काम करत मैत्रीपूर्ण वातावरणात एकत्र येत अगदी प्रेमाने चित्रपट बनवला होता. त्यामुळे आमच्यात एक भावनिक बंध निर्माण होणं स्वाभाविकच आहे. ऑस्करच्या शर्यतीत भारताच्या वतीने आमचा चित्रपट जाणं म्हणजे खरंच एक अभिमानाचा क्षण आहे. आता ‘लापता लेडीज’ला ऑस्कर खुणावतंय... भारताप्रमाणेच आमच्या चित्रपटाचा जगभर आवाज घुमेल यात शंकाच नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Retention : MS Dhoni अनकॅप्ड खेळाडू, परदेशी खेळाडूंवर बंदीची तलवार... BCCI ने जाहीर केले ८ महत्त्वाचे नियम

IND vs BAN 2nd Test : दुसऱ्या दिवसावर पडलं पावसाचं पाणी, भारतात ९ वर्षांनी पहिल्यांदाच असं झालंय

Manoj Jarange: यंदा मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'येथे' होणार भव्य-दिव्य कार्यक्रम, उद्या बीडमध्ये बैठक

IND vs BAN: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कॅप्टन, तर 150 kmph वेगात बॉलिंग करणाऱ्या मयंक यादवलाही संधी

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार'' राज ठाकरेंनी मांडलं गणित

SCROLL FOR NEXT