Mokale-Vha 
सप्तरंग

#MokaleVha : महत्त्व मानसिक आरोग्याचे!

प्रा. डॉ. रघू राघवन, मानसिक आरोग्य तज्ज्ञ, दी मॉनफोर्ट विद्यापीठ, यु.के.

जगभरातून येत असलेल्या अहवालानुसार कोव्हिड १९ मुळे अनेकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. परिणामी त्यांना मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. यामुळेच आपल्याला मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार यातील फरक समजावून घेणे आवश्यक आहे. जगभरातील एकूण आजारांच्या १५ टक्के आजार हे मानसिक आजार आहेत. भारतामध्ये प्रत्येक ७ लोकांमागे एका व्यक्तीला आयुष्यातून एकदा तरी मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. याबद्दल असलेल्या अज्ञानामुळे मानसिक आजार गंभीर वळण घेतात. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण, २०१७ नुसार १८ वर्षांवरील ११ टक्के नागरिकांना मानसिक आरोग्याच्या अडचणी असतात. हा आकडा प्रत्यक्षात पाहिला तर जवळपास १५ करोड लोकांना मानसिक आरोग्याच्या समस्या असतात. तरीही मानसिक आरोग्य या विषयाला हवे तेवढे महत्त्व दिले जात नाही. यामुळेच आज आपण मानसिक आरोग्य आणि आजार याबद्दल समजून घेणार आहोत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मानसिक आरोग्य म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, मानसिक आरोग्याशिवाय कोणतेही आरोग्य हे निरोगी नसते. मानसिक आरोग्य म्हणजे, स्व-जागृकता, सकारात्मक विचारसरणी, आपल्या दैनंदिन जीवनातील मानसिक तणाव ओळखणे व त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे होय. चांगले मानसिक आरोग्य म्हणजे, आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचे, भावनांचे, क्रियांचे किंवा स्वभावाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे होय.
    
मानसिक आरोग्याची गरज का?
चांगले मानसिक आरोग्य आपल्याला तणाव, राग, दुःख, नैराश्य, नकारात्मक विचार, भावभावना अशा दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींवर मात व व्यवस्थापन करण्यास मदत करते. तसेच आपल्यामध्ये एक अशी ताकद निर्माण तयार करते, ज्यामुळे आपला स्वतःवर, आपल्या कुटुंबावर, कामावर आणि सामाजिक आयुष्यावर वाईट परिणाम करणारा ताण, नकारात्मक विचार यांना ओळखून वेळीच दूर ठेवण्यास मदत करते. 

आपल्यापैकी सर्वजण आयुष्यात एकदा तरी नैराश्य, दुःख, ताणतणावाला सामोरे गेलेले असतात. जे कधीतरी आपल्या मानसिक आरोग्याला आव्हान देतात. हे आव्हान आपल्या शारीरिक आरोग्याला आव्हान देण्यासारखेच असते. याचाच अर्थ आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलत असतो, तेव्हा आपण मानसिकदृष्ट्य़ा तंदुरुस्त राहण्याबाबत बोलत असतो. मानसिकदृष्ट्य़ा तंदुरुस्त राहणे याचाच अर्थ आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर आपण कसे मात करतो, आपण इतरांशी कसे वागतो, कुटुंबाला, मित्रमैत्रिणींना, आणि आपल्या संपर्कातील लोकांना किती समजावून घेतो हे होय. 

मानसिक आजार म्हणजे काय?
मानसिक आजार आपल्या विचार करण्याच्या पद्धती, भावना आणि इतरांशी आपले वागणे यावर परिणाम करते. जागतिक आरोग्य संघटनेनेही हे नमूद केले आहे की, मानसिक आजाराबाबत असलेल्या गैरसमजामुळे याकडे चुकीच्या नजरेने पाहिले जाते. याबाबत म्हणावी तशी जनजागृती समाजात न झाल्याने व गैरसमजांमुळे मानसिक आजार झालेल्या रुग्णांना अनेक गंभीर परिणाम भोगावे लागतात. यामध्ये विविध परिणाम होतात जसे की,
१.    जेल, रुग्णालयात शारीरिक आणि लैगिंक अत्याचार केला जातो.
२.    त्यांचे राजकीय आणि नागरिकत्वाच्या अधिकारांवर मर्यादा आणल्या जातात. कारण ते आपल्या आयुष्याबाबतचे निर्णय घेण्यास सक्षम नसल्याचे समजले जाते. 
३. त्यांना समाजातील कुठल्याही कार्यात सहभागी होण्यापासून वंचित ठेवले जाते. 
४. त्यांच्या मानसिक आरोग्याच्या बाबतीतच नव्हे तर इतरही शारीरिक आजारांबाबतही त्यांना योग्य ते उपचार वेळेवर मिळण्यास कठीण असते. 
५. त्यांच्या अडचणीच्या वेळेस मदतीचा हात पुढे येण्याची शक्यताही कमी असते. 
 
चांगले मानसिक आरोग्य याचा अर्थ आपल्या ताणतणावांकडे दुर्लक्ष 
करून आनंदी राहणे नव्हे, तर आपल्या ताणतणावांचे योग्य व्यवस्थापन करणे हे असते. मानसिक आरोग्य म्हणजे आपण एकटे नाही आहोत ही भावना. आपल्यामध्ये येणारी एक अशी जागृकता जी आपला तणाव, अडचणी यांसारखे मानसिक आजार ओळखून त्यावर उपाय करते. सार्वजनिक आरोग्य सेवांप्रमाणेच आता सार्वजनिक मानसिक आरोग्य सेवा असण्याचीही गरज आहे. ज्याचा उपयोग आपल्याला लोकांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, मानसिक आजार असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी होईल

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT