Marriage sakal
सप्तरंग

नातेसंबंध त्यांचे; अन् चवताळताहेत भलतेच!

आपण समाज म्हणून एकूणच लग्नव्यवस्थेकडे, घटस्फोट, प्रेम आणि आकर्षणातून निर्माण होणाऱ्या मानवी व्यवहारांकडे फारच उथळ नजरेनं बघतो.

मुक्ता चैतन्य

आपण समाज म्हणून एकूणच लग्नव्यवस्थेकडे, घटस्फोट, प्रेम आणि आकर्षणातून निर्माण होणाऱ्या मानवी व्यवहारांकडे फारच उथळ नजरेनं बघतो. प्रेमात पडलात तर लग्न केलंच पाहिजे, ब्रेकअपनंतर मित्र-मैत्रिणी राहू शकत नाही, घटस्फोट झाला तर खुन्नस दिलीच पाहिजे, का? कशासाठी? माणूस त्या पलीकडे बराच काही असतो, हे आपण कधी समजून घेणार? विविध मानवी नातेसंबंध स्वीकारण्यासाठी, त्याकडे निकोप नजरेनं बघण्यासाठी जी सहिष्णुता लागते, जी संवेदनशीलता लागते ती भारतीय समाजात दुर्दैवाने विकसित होऊ शकलेली नाही.

आमिर खान आणि रीना दत्ता यांचा एकत्र फोटो माध्यमांमध्ये झळकल्याबरोबर वाह्यात कॉमेंट्सना सुरुवात झाली. ‘प्रेम होतं तर लग्न मोडलेच का’पासून काय वाटेल ते... खरंतर हे काही नवीन नाहीये. प्रियांका चोप्राने, मिलिंद सोमणने लग्न केलं तेव्हा त्यांच्या आणि त्यांच्या जोडीदाराच्या वयातल्या अंतरांवरून लोकांनी सोशल मीडियावर अर्वाच्च चर्चा केली होती.

आशीष विद्यार्थीने दुसरं लग्न केलं तेव्हा त्यांच्या रंगावरून लोक हसले, अत्यंत मूर्ख कॉमेंट्स करत राहिले. गमतीचा भाग असा की एरवी बुद्धिवादी लिहिणारे, विचारी वाटणारे लोकही यात सहज सहभागी होताना दिसले, दिसतात. दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात किती डोकावायचं, किती त्यावर बोलायचं याचं भान अनेकांना नसतं.

विशेषतः स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा विषय आला की घालून दिलेल्या पारंपरिक चौकटींच्या पलीकडे कुणी काही केलं की लोक चवताळल्यासारखे बोलायला लागतात. पूर्वी या गोष्टी घराच्या चार भिंतीत सुरू होत्या, आता त्या सोशल मीडियाच्या चव्हाट्यावर बघायला मिळतात. आणि त्यानिमित्ताने भारतीय समाज लग्न, घटस्फोट, मानवी नातेसंबंध यांना धरून किती बाळबोध आहे याची पुन:पुन्हा जाणीव होत राहते.

आमिर खान आणि रिना दत्ताचा एकत्र फोटो खरंतर किती सुंदर आहे. सहज आहे. त्यांच्या नात्यात असलेली सहजता त्यातून दिसतेय. लग्न, घटस्फोट या सगळ्याच्या पलीकडे त्यांच्यात असलेली मैत्री आणि माणूस म्हणून असलेलं कनेक्शन त्यातून सहज बघायला मिळतंय. त्यांनी किती तरी आठवणी एकत्र बनवल्या आहेत. त्यांना दोन मुलं आहेत, अशा वेळी घटस्फोट झाला म्हणून त्यांनी एकमेकांचं तोंड बघायचं नाही, एकमेकांना खुन्नस द्यायची?

माणूस म्हणून असलेलं कनेक्शन पण तोडून टाकायचं का? कशासाठी? समाज म्हणून जर आपण असली काही अपेक्षा करणार असू तर आपण फक्त बालिश नाहीयोत; पण माणूस नावाची गुंतागुंत आपल्याला समजलेलीच नाहीये, असं म्हणावं लागेल.

आपण समाज म्हणून एकूणच लग्नव्यवस्थेकडे, घटस्फोट, प्रेम आणि आकर्षणातून निर्माण होणाऱ्या मानवी व्यवहारांकडे फारच उथळ नजरेनं बघतो. प्रेमात पडलात तर लग्न केलंच पाहिजे, ब्रेकअपनंतर मित्र-मैत्रिणी राहू शकत नाही, घटस्फोट झाला तर खुन्नस दिलीच पाहिजे? का? कशासाठी?

माणूस त्या पलीकडे बराच काही असतो, हे आपण कधी समजून घेणार? एखाद्याला प्रेमात पडूनही लग्नाच्या बंधनात अडकणं नको असू शकतं, ब्रेकअपनंतर मैत्री ठेवण्याची इच्छा असू शकते आणि घटस्फोटानंतर कधी काळी जे काही शेअर केलेलं आहे, ज्या स्मृती आहेत त्यांना प्रामाणिक राहावं असं वाटत असेल... सहज मनात ‘लम्हें’ सिनेमाच्या आठवणी आल्या.

मानवी नातेसंबंधांविषयी, प्रेमाच्या, सहजीवनाच्या कल्पनांविषयी, सेक्सविषयी आपण निरनिराळ्या माध्यमांमधून शिकत असतो. दुर्दैवाने या गोष्टी शिकवण्याची, समजावून सांगण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. कुटुंबांमधून अनेकदा या सगळ्या विषयाला धरून प्रचंड संकुचित विचार असतो. स्वतःच्या वडिलांच्या वयाच्या माणसाच्या प्रेमात कसं काय कुणी पडू शकतं?

ज्या मुलीवर प्रेम केलं तिच्या मुलीवरही ‘त्या’ दृष्टीने प्रेम करायचं? वडिलांच्या वयाच्या पुरुषाच्या प्रेमात एखाद्या तरुणीने पडणं, ज्या मुलीवर निस्सीम प्रेम केलं, जिचं आपल्यावर प्रेम नव्हतं, तिच्या मुलीवर प्रेम बसणं, ते अमान्य करण्यापासून सुरू झालेला प्रवास स्वतःच्या मनाला हाक देऊन प्रेम मान्य करण्यापर्यंत येऊन पोचणं हे माणूस असणं आहे. नात्यांचा सुरेख गोफ आहे ‘लम्हें’ म्हणजे!

सध्या गाजत असलेल्या रॉकी रानी सिनेमातले रानीच्या वडिलांचं पात्रही असंच चौकटीबाहेर विचार करायला भाग पाडतं. रानीच्या आई-वडिलांमध्ये असलेलं नातं, त्यातली सहजता आणि शबाना आझमी-धर्मेंद्र यांनी निभावलेल्या भूमिकांमधली उत्कटता समजायला बराच काळ जावा लागेल कदाचित.

प्रौढ वयात होणारी भेट, त्या ळी एकमेकांना मिठीत घ्यावं, एकमेकांचं चुंबन घेण्याची ओढ हे सगळेच विषय एरवीच्या भारतीय मनाला झेपणारे नाहीत. कारण माणसांकडे माणूस म्हणून बघण्यापेक्षा व्यवस्था म्हणून बघण्याकडे सगळा कल असतो.

लग्न केलेल्या माणसांकडे व्यक्ती म्हणून न बघता, कुटुंब व्यवस्था म्हणून बघणं, घटस्फोट झालेल्या किंवा जोडीदार गमावलेल्या व्यक्तींकडेही माणूस म्हणून बघण्यापेक्षा त्यांच्यावर चिकटलेलं लेबल म्हणून बघणं या सगळ्या संस्कारांच्या किचकिचाटातून मानवी नाती नानाविध रंगांची असू शकतात, त्यात बरोबर आणि चूक यापलीकडची गुंतागुंत असू शकते हे लक्षातच येत नाही.

आणि मग आहे त्या चौकटीच्या बाहेर पाऊल ठेवणाऱ्यांना नावं ठेवण्यात, त्यांच्याविषयी कुत्सित गॉसिप करण्यात भारतीय माणसांचा बहुतांशी वेळ जात असतो. मी नुकतीच एक कोरियन सीरिअल बघितली. रिप्लाय १९८८ नावाची. तशी जुनी सीरिअल आहे. त्यात जोडीदार गमावलेले दोन शेजारी आहेत. एक बाई, एक पुरुष. दोघांना टीनएज मुलं आहेत.

त्यातल्या स्त्रीला पहिल्या मुलानंतर बऱ्याच मोठ्या अंतराने झालेली मुलगीही आहे. दोघांचेही जोडीदार नाहीत. अशा ळी शेजारी आहेत म्हणून गावगप्पा आणि गॉसिप करण्यापेक्षा त्यांना एकमेकांचा आधार मिळाला तर? हा विचार शेजारपाजारचेही करतात आणि त्यांची मुलंही करतात. कसलाही गाजावाजा न करता एक दिवस ते एकत्र राहायला सुरुवात करतात. हे किती सहज आणि सोपं आहे.

पण यात जर आपण पन्नाशीला आल्यावर लग्न कशाला हवं, मुलं झाली की मोठी; तरीही अजून लैंगिक गरजा आहेत? काय बेशरम लोक आहेत, मानसिक आधार द्यायला मुलं काय कमी पडतात का, आता या वयात दुसरं लग्न कशाला, यांसारखे अत्यंत अवाजवी विषय आणले तर कधीही एक सुंदर नातं निर्माण होऊ शकत नाही.

मुळात भारतीय माणसांची अडचण एकच आहे, लग्न, घटस्फोट, विधवा-विधुर या पलीकडे माणसांनी नात्यात केलेले प्रयोग त्यांनी फारसे आजूबाजूला बघितलेले नाहीत.

मूल होऊ शकत असूनही मूल दत्तक घेणारी जोडपी, समलिंगी विवाह, बायसेक्शुल व्यक्तीशी केलेला विवाह, एकाऐवजी दोन वेळा झालेला घटस्फोट, त्यानंतरही दोन्ही जोडीदारांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध, नवरा गेल्यानंतर सासू सासरे आणि आई-वडील यांच्याबरोबर एकत्रितपणे उभं केलेलं नवं कुटुंब, तृतीयपंथी व्यक्तीचं आई होणं, पुरुषानं आई आणि बाबा या दोन्ही भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं पार पाडणं, लग्न न करताही आईबाप होणं असे नात्यांचे संयोग भारतीय समाजात होत नाहीत, त्यामुळे माणसांनी ते विशेष बघितलेले नसतात.

परिणामतः विविध मानवी नातेसंबंध स्वीकारण्यासाठी, त्याकडे निकोप नजरेनं बघण्यासाठी जी सहिष्णुता लागते, जी संवेदनशीलता लागते ती भारतीय समाजात दुर्दैवाने विकसित होऊ शकलेली नाही. त्यामुळे आमिर खान त्याच्या पहिल्या बायकोबरोबर हसत-खेळत गप्पा मारताना दिसला की माणसं बिथरतात, असं काहीतरी सहज शक्य आहे, हे त्यांच्या कर्मठ मनाला आणि संस्कारांना पटत नाही, रुचत नाही. कालपर्यंत ते या गोष्टी घरात, मित्रपरिवारात बोलत होते, आज सोशल मीडियावर जाऊन सगळी गरळ ओकतात.

मानवी नातेसंबंधांचं वैविध्य आणि त्यातली गुंतागुंत समजून घ्यायला आजही भारतीय समाज तयार नाही. तो बऱ्यापैकी कमकुवत आहे आणि अतिशय बालिश आहे.

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका डिजिटल माध्यमाच्या अभ्यासक असून, विविध विषयांवर लेखन करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT