pune sakal
सप्तरंग

नाद ॐकाराचा

भौतिक, मानसिक व सामाजिक शरीराच्या पलीकडे असणाऱ्या आध्यात्मिक शरीराचे आरोग्य होय.

सकाळ वृत्तसेवा

नाद ॐकाराचा

ॐ हा अनाहत नाद मानला गेलेला आहे. कोणत्याही आघाताशिवाय उत्पन्न झालेला नाद म्हणजे ॐ. ॐकाराला ‘एकाक्षर परब्रह्म’ असेही म्हणतात. ईश्‍वराचे ध्वनिरूप म्हणजे ॐकार असल्याचे संदर्भ अनेक ग्रंथांमध्ये आहेत. भारतीय परंपरेने सर्व संगीताची व मंत्रांचीही सुरुवात ॐ नेच केली. त्याला पुढे ‘नोम्-तोम्’ जोडले गेले. तेव्हा प्रत्येकाने जर स्वतःचे जीवनगाणे ॐ ने सुरू केले तर या गाण्याने आरोग्य चांगले राहील. ॐ मध्ये विलीन झाल्यावर समाधान, शांतिपूर्ण असा मुक्तीचा आनंद मिळतोच.

मुक्ती म्हणजे भौतिक, मानसिक व सामाजिक शरीराच्या पलीकडे असणाऱ्या आध्यात्मिक शरीराचे आरोग्य होय. मनाची आतील शुद्धी करण्यासाठी नाडीशोधन आवश्यक असते. तेव्हा योग, आसने, प्राणायाम यांच्याद्वारे योगसाधना करून नंतर मंत्रयोग किंवा नादयोगाचा अभ्यास करण्यामुळे साधनेची गोडी निर्माण होईल आणि आपण ॐकाराच्या नादी लागू शकू. ॐकार गुंजनामुळे ही क्रिया फार सोप्या रीतीने होते. साधनेमुळे येणारे अनुभव वाढल्यामुळे विश्वास वाढून आपल्या शक्तीची सृजनात्मक कार्यासाठी उत्थान अवस्था येऊन आपल्याला पुढे जाता येते. मिळालेली सिद्धी व ज्ञान परमेश्वराने समाजासाठी दिलेले आहे हे ओळखून स्वतःचा अहंकार न वाढवता इतरांबरोबर काम करता येईल. विश्वबंधुत्वाची कल्पना अंगी बाणवायची, आलेल्या सूक्ष्मत्वाचा आनंद घेत ॐकार नादात प्रगत व्हायचे, येणाऱ्या प्रणवाचा अनुभव घेऊन कळायला अवघड पण केवळ अनुभवगम्य असलेल्या प्राणशक्तीत आपला लय साधून, आपण अत्युच्च अवस्थेला यायचे असते, अशी आहे ही सात अंगे असलेली सप्तरंगी ॐकारसाधना. ही साधना ‘सोम’ ध्यानयोगातून साधता येतेच.

ॐ मुळे होणारे शारीरिक फायदे

ॐ जलद म्हटला तर जवळ जवळ भस्त्रिका, कपालभाती केल्याचा लाभ होतो आणि तो शरीराच्या खालच्या विभागावर अधिक कार्य करतो. दीर्घ पद्धतीने म्हटला तर छाती व फुप्फुसांवर कार्य करतो आणि लोम-अनुलोमाचा लाभ देतो. अनुनासिकयुक्त प्लूत पद्धतीने म्हणजे अतिशय लांबवून म्हटला तर मस्तकावर काम करतो. या गुंजनातून ऐकू येणारी आस किंवा वातावरणाने दिलेला प्रतिध्वनी ऐकण्याने व त्याकडे लक्ष ठेवण्याने लययोग साधतो आणि साधना सोपी होते.

ॐकार म्हणत असताना प्रत्येक वेळी पोटाची हालचाल व्हावी. आपल्याला ऐकू जाईल इतपत आवाज असावा आणि स्वतः ऐकणे हे प्रणवोपासनेतील वा ॐकार गुंजनातील मर्म विसरू नये. कर्मकांडाची कमीत कमी बंधने, परंतु माणुसकीची विशेष बंधने असलेली, परमेश्वरावर प्रेम व्यक्त करण्यासाठीचे साधन म्हणून अवलंबिलेली अशी ही अत्यंत सोपी ‘संतुलन ॐ ध्यान योगा’तील ॐकार मंत्र गुंजनाची प्रत्यक्ष साधना माणसाच्या जीवनात प्रगतीसाठी मार्गदर्शन करणारीच असणार आहे.

ज्याप्रमाणे तंबोऱ्याचा षड्ज व पंचम लावल्यानंतर गांधार, निषाद वगैरे इतर स्वरांचा गुंजारव आपल्याला ऐकू येतो, त्याप्रमाणे हा आसमंतातला ॐकार ऐकण्याच्या अवस्थेत आल्यानंतर ॐकाराची उपासना खऱ्या अर्थाने सुरू केली, असे आपल्याला म्हणता येईल. शरीरातील षट्चक्रांचा अभ्यास करीत असताना आपण म्हटले होते की, या ठिकाणी षट्चक्रांपेक्षा सोपी पण सर्व चक्रांना उपयोगी असलेली ॐकाराची वा प्रणवाची उपासना यातून सिद्ध होईल. सकाळी उठल्यावर ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी वा रात्री झोपण्यापूर्वी ॐकाराची उपासना सुरू करावी.

ॐकार साधना कशी करावी?

ॐ चा उच्चार करताना सुरुवातीला ‘ओ’ म्हणायचा नसून अ-उ-म याप्रमाणे उच्चारण करावे.

सुरुवातीला ऱ्हस्व, दीर्घ, प्लूत असे तीन प्रकारचे उच्चार करावे.

ऱ्हस्व म्हणजे अत्यंत कमी वेळात म्हटलेला ॐ.

दीर्घ म्हणजे अउऽऽऽम्ऽऽऽ

ऱ्हस्व ॐकार म्हणत असताना नाभीपाशी हालचाल जाणवेल.

दीर्घ ॐकार म्हणत असताना तो आपल्याला छाती आणि फुप्फुसांमध्ये जाणवेल.

प्लूत म्हणजे ॐकाराचे अत्यंत लांब उच्चारण करीत असताना त्याला अनुनासिकेत न्यावे.

ऱ्हस्व ॐ म्हणत असता ‘अ’काराला; दीर्घ ॐ म्हणत असता ‘उ’काराला व प्लूत ॐ म्हणत असता ‘म’काराला महत्त्व दिल्यासारखे असते.

कोंबडा आरवताना तो कू -कू ऽऽऽकू ऽऽऽऽऽऽऽ असा आवाज काढतो तेव्हा लागलेला वेळ - पहिला ऱ्हस्व, दसरा दीर्घ व तिसरा प्लूत मात्रेचा असतो असे समजले जाते.

श्वासावर नियंत्रण ठेवून ॐकार एकाच स्वरात म्हणावा

एक ॐकार छोटा, कमी वेळाचा ऱ्हस्व ॐकारासारखा; तर दसरा मोठा - प्लूत असे म्हणू नये. श्वास लागू नये, अशी योजना करून ॐकार म्हणावा.

त्यानंतर ॐकाराला उचलून मस्तकात आणल्यानंतर बिंदूस्वरूप ॐकाराचा नाद बाहेरून गुंजन केल्यासारखा ऐकावा.

ॐकार म्हणताना आपण एकसमयावच्छेदे करून ऐकणे.

अ) शारीरिक परिणाम

याच्या कंपनांमुळे Pituitary gland (पियूष ग्रंथी)ला उत्तेजना मिळून संपूर्ण शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य सुधारते. पर्यायाने Thyroid, Sugar, भावनांचे चढ-उतार, पाळीचे विकार या सर्वांमध्ये संतुलन येत जाते.

हृदय, मेंदू अशा महत्त्‍वाच्या अवयवांचे काम सुधारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT