लेखक : राजाराम पानगव्हाणे
सध्या प्रत्येकाला आरोग्याची काहीना काही समस्या भेडसावत आहे. असं क्वचितच कोणीतरी असेल, की ज्याला कुठलीही शारीरिक समस्या नाही. या समस्येचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला, तर तो आपण करत असलेल्या आहारामध्ये आहे. अवेळी जेवण, योग्य प्रथिने असलेले अन्न न खाणे व बाहेरील पदार्थास प्राधान्य यामुळे आरोग्य बिघडण्याचे प्रमाण अधिक आहे.
या सर्वांचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी आजाराचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे आहार कोणता घ्यावा, याबद्दल तरी किमान आपण काळजी घेतली पाहिजे. योग्यवेळी, योग्य प्रमाणात आहार घेतला, तर आपण अनेक आजारांपासून मुक्त होऊ शकतो. (nashik saptarang on Diet Take right amount at right time)
किमान सवयी लावून घ्या
निरोगी जीवन जगण्यासाठी चांगल्या सवयी फार महत्त्वाच्या असतात. संतुलित आहार हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या जुनाट आजारांपासून बचाव करू शकतो. योग्य भागांमध्ये विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ खाणे, हायड्रेटेड राहणे, प्रक्रिया केलेले आणि साखरयुक्त पदार्थ मर्यादित करणे हे चांगल्या खाण्याच्या सवयींचे प्रमुख घटक आहेत. सजग खाण्याचा सराव करणेदेखील महत्त्वाचे आहे. अन्न खाण्याचा आनंद घेणे आणि भूक, परिपूर्णतेच्या संकेतांकडे लक्ष देणे समाविष्ट आहे. या सवयींचे पालन करून तुम्ही तुमचे एकूणच आरोग्य आणि कल्याण सुधारू शकता.
सर्व आजारांचे मूळ आहारात
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आरोग्याची काहीना काही समस्या भेडसावत आहे. अगदी तरुणांमध्येही त्याचे प्रमाण वाढत आहे. असं क्वचितच एखादाच असेल ज्याला कुठलीही शारीरिक समस्या नाही. आहाराचे बदलते स्वरूप, वातावरणातील अनिश्चित बदल आदी घटकांचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. यामुळे आजाराचे प्रमाणही वाढत आहे. सर्व आजारांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपण आहार कसा, कोणत्या वेळी आणि किती पौष्टिक घेतो, यावर बरेचसे काही अवलंबून असते.
सूर्यास्तापूर्वी जेवण उत्तमच
अलीकडच्या डाएटच्या बाबतीत एवढा संभ्रम निर्माण झाला आहे, की कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीदेखील एका बाबतीत सर्व आहारतज्ज्ञांचे एकमत होते, ते म्हणजे सूर्यास्ताआधी जेवणे. या गोष्टीला धर्मशास्त्रानेही दुजोरा दिला आहे. एवढेच नाही, तर पूर्वी या गोष्टींचे कटाक्षाने पालन केले जात असे. एवढेच काय, तर निसर्गात डोकावले तर पशू-पक्षीदेखील सूर्यास्तानंतर खात-पित नाही. याचा अर्थ हा नियम निसर्गाला अनुसरून आहे का? (latest marathi news)
रात्रीचे जेवण देते रोगांना आमंत्रण
सूर्यास्ताआधी जेवल्याने पचनक्रिया नियंत्रित राहते. सेवन केलेले अन्न दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत व्यवस्थित पचते. या काळात अन्न पचायला पुरेसा वेळ मिळतो. याउलट उशिरा जेवल्याने आणि लगेच झोपल्याने अन्न पचत नाही आणि त्याचे रूपांत ऊर्जेत न होता मेद वृद्धीत होते.
सूर्यास्तापूर्वी जेवल्यास रात्री झोप पूर्ण होते. सकाळी वेळेत पोट साफ होते. दिवसभर थकवा जाणवत नाही. सूर्यास्तानंतर सूर्यप्रकाशाअभावी वातावरणात सूक्ष्म जिवाणूंचे साम्राज्य वाढते. ते जिवाणू अन्नात शिरकाव करतात आणि त्यामुळे अनेक व्याधी जडतात. वातावरणात आलेले जडत्व आपल्या शरीरालाही जाणवते.
पण त्याकडे दुर्लक्ष करून आपण जेवतो आणि अनेक आजारांना आमंत्रण देतो. सूर्यास्तानंतर प्रकृतीत अनेक बदल घडतात. पशू-पक्षीदेखील सूर्यास्ताआधी जेवून झोपी जातात. आपल्या शरीरावर निसर्गाचा प्रभाव पडत असतो. आपण प्रकृतीशी जेवढे जुळवून घेऊ, तेवढे निरोगी राहू, म्हणून ही दिनचर्या आत्मसात करणे सोयीस्कर ठरते.
निरोगी जीवनासाठी महत्त्वाच्या टिप्स
- संतुलित पोषणासाठी विविध अन्न गटातील विविध पदार्थ खा.
- शुगर आणि प्रिझर्वेटिव्हजसह प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा संपूर्ण प्रक्रिया न केलेले अन्न निवडा.
- फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांसाठी भरपूर फळे आणि भाज्या खा.
- चिकन, मासे किंवा शेंगा यांसारख्या पातळ प्रथिने स्रोतांची निवड करा.
- संतुलित आहारास प्राधान्य द्या.
प्रौढांसाठी संतुलित आहाराचे महत्त्व
प्रौढांसाठी उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहाराचे महत्त्व आवश्यक आहे. संतुलित आहाराचे निरीक्षण करून प्रौढांना अनेक फायदे मिळू शकतात. ज्यामुळे जीवनाची गुणवत्ता सुधारते आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो. संतुलित आहारामुळे जास्त कॅलरीजशिवाय आवश्यक पोषक तत्त्वे प्रदान करते.
निरोगी शरीरामुळे वजन कमी करण्याबरोबरच कमी ठेवण्यास मदत करते. पोषक समृद्ध अन्न सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, टाइप- २ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग यांसारख्या परिस्थितींचा धोका कमी होतो. योग्य पोषण आहार शरीराचे पोषण करते आणि त्यामुळे ऊर्जापातळी वाढते आणि उत्पादकता वाढते.
पोषक समृद्ध अन्न मेंदूच्या कार्यास, मूडचे नियमन आणि तणाव व्यवस्थापनास समर्थन देतात. नैराश्य, चिंता आणि संज्ञानात्मक घट होण्याचा धोका कमी करतात. फायबर, फळे, भाज्या आणि प्रोबायोटिक्स समृद्ध आहार नियमित आतड्यांची हालचाल आणि निरोगी आतडे मायक्रोबायोमला प्रोत्साहन देतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.