Dr. Rahul Ranalkar esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : शिक्षक मतदार संघ अन् सुरस कहाण्या...

Teachers Constituency Election : शिक्षक मतदार संघासाठी येत्या २६ जून रोजी मतदान पार पडणार आहे. अगदी प्रारंभीच्या टप्प्यापासून ही निवडणूक विविध कारणांनी चर्चेत आलेली आहे. मोजक्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा हा प्रयत्न.

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

शिक्षक हा समाजातील अत्यंत जबाबदार घटक मानला जातो. शिक्षणासमोरील अनेक आव्हानांचा सामना सध्या शिक्षकांना करावा लागत आहे. शिक्षणासंदर्भात एका वाक्यात सांगायचं झाल्यास 'आभाळ फाटलंय, कुठं-कुठं ठिगळ लावणार' अशी परिस्थिती आहे. शिक्षक मतदार संघासाठी येत्या २६ जून रोजी मतदान पार पडणार आहे.

ही निवडणूक यंदा अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर चुरस अधिक वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते. शिक्षक मतदार यंदा कोणाच्या वाट्याला आमदारकी बहाल करणार हा उत्कंठेचा विषय निश्चितपणानं आहे. मात्र, अगदी प्रारंभीच्या टप्प्यापासून ही निवडणूक विविध कारणांनी चर्चेत आलेली आहे. मोजक्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा हा प्रयत्न.  (saptarang latest article on Teachers Constituency election)

पत्रकारितेतील काही मापदंड आहेत. बऱ्याच गोष्टी माहित असूनही त्या 'स्पष्टपणे' लिहिता येत नाहीत, किंवा अनेक विषयांवर 'जाहीरपणे' बोलता येत नाही. सध्या शिक्षक मतदार संघातील निवडणुकीबाबत अगदी अशाच प्रकारच्या वातावरण निर्मिती झालेली आहे. 'अनेक गोष्टी' अनेकांना माहित आहेत, पण त्यावर 'उघडपणे' बोलायला कुणीही तयार नाही.

मात्र, लोकशाही मूल्यांमध्ये एक गोष्ट पक्की आहे. ती म्हणजे, मतदारांना 'गृहित धरणं' दिग्गजांना, धुरंधरांना महागात पडतं, हे सगळ्या जनतेनी अलीकडेच पाहिलं आहे, अनुभवलं आहे. 'मतदार राजा असतो', हे मतदार नेहमीच कृतीतून दाखवत आला आहे. त्यात शिक्षक वर्गाचं म्हणाल तर सरस्वतीच्या या पूजकांपासून लपून राहील, असे काहीही नाही, त्यात माध्यम युगात तर ही बाब केवळ अशक्य आहे.   

शिक्षक हा सुज्ञ नागरीक असतो, तसंच 'समजणं' आणि 'उमजणं' यातील सीमारेषाही तो ओळखून असतो. नाव साधर्म्यामुळे उडवलेल्या गोंधळाची यथोचित दखल शिक्षक वर्गानं घेतली आहे. दिंडोरीतील 'बाबू भगरे पॅटर्न' राबवून शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची 'प्रयोगशील वृत्ती' शिक्षक मतदार संघात चालेल, अशी किंचितही शक्यता दिसत नाही.  (latest marathi news)

शिक्षकांची बुद्धी, मन, वाचा हे शाबूत असते, त्यामुळे शिक्षकांना 'अशिक्षित', 'अर्धशिक्षित' समजणे, सर्वथा चूक ठरेल, ही 'काळ्या दगडावरची पांढरी रेघ' मानायला हवी. नावात गल्लत करुन 'नको असलेल्या उमेदवारा'ला प्राधान्यक्रम दिला जाईल, हा समज शिक्षक निश्चितपणानं खोटा ठरवतील.

ज्या कहाण्या ऐकू येत आहेत, त्या सुरस आहेत. त्यात अगदी 'फिल्मी स्टाईल'ने उमेदवारांवर वॉच ठेवणे, अपहरण करणे, डांबून ठेवणे, धमकावणे, आमीष दाखवणे वगैरे प्रकार घडल्याचे काही दिग्गज मंडळी दबक्या आवाजात सांगत आहेत. माध्यमांमध्ये या प्रकारची माहितीही पोहोचली, तथापि, अधिकृत दुजोऱ्याअभावी या बाबी पटलावर आल्या नाहीत.

प्रश्न या कहाण्या पटलावर येण्याशी संबंधित नाही. तर महाराष्ट्रात अतिमागास राज्यांसारखी निवडणूक संस्कृती आणण्याच्या संदर्भातील आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं शिक्षकांचा प्रतिनिधी होण्यासाठी चाललं आहे. शिक्षकांचा प्रतिनिधी कोण? कसा? असला पाहिजे, हे शिक्षकांनी एव्हाना ठरवलेलं असावं.

शिक्षक मंडळी पुढच्या ८-९ दिवसांत काय-काय घडतंय, यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. निवडणुकीचा जो काही निकाल लागेल, त्याचा शिक्षकांना 'स्वाभिमान' वाटेल, की 'शर्मेनं मान खाली घालण्याची वेळ' येईल, यावर सध्या शिक्षण क्षेत्रात सखोल चिंतन सुरु आहे. तूर्त एवढंच !!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT