लेखक : राजाराम पानगव्हाणे
आजच्या काळात काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल राखणे खूप कठीण आहे. ताणतणाव हा जवळपास प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग बनत चालला आहे. ऑफिसचे काम असो की कौटुंबिक टेन्शन, इच्छा असूनही त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे नसते. ताण माणसाच्या वैयक्तिक जीवनावर वर्चस्व गाजवू लागला आहे.
त्यामुळे मन अस्वस्थ होऊ लागते. रागात माणसाला प्रत्येक गोष्टीची चिडचिड येते आणि अशावेळी झोप न येण्यासारख्या समस्या सुरू होतात. अशा परिस्थितीत छोटे-छोटे बदल तुमचे जीवन सुधारून ते तणावमुक्त करू शकतात. जर दिवसाचा शेवट थकवा आणि निराशेने झाला असेल तर तुम्ही तणावात आहात असे समजा.
याचा अर्थ तणावाचा (Stress) तुमच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे डोकेदुखी, झोप न येणे, पाचन समस्या, जास्त घाम येणे, थकवा आणि अशक्तपणा येतो. ही तणावाची लक्षणे असू शकतात. पण हे सगळे करताना ताणतणावाचा तणाव येणार नाही, याचीही खबरदारी घ्यायला हवी. (nashik saptarang latest article on stress relief marathi news)
जीवनात समतोल निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी आठवडाभर आधीच योजना बनवा जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ घालवत विचार करावा लागणार नाही. आपण काय करतो, की आपल्याकडे असलेली शिल्लक कामे करण्यापेक्षा दुसऱ्या कमी महत्त्वाच्या कामांमध्ये वेळ घालवतो.
त्यामुळे साचलेल्या कामांची यादी वाढत जाते व अचानक सर्व कामे एकदा अंगावर येऊन पडली की तणाव निर्माण होतो. त्यामुळे करावयाची कामे यांना प्राधान्य क्रमांक द्या व त्यानुसार ती करा. अगोदर काही काम केल्याने आठवड्याच्या शेवटी कोणतेही दडपण येणार नाही आणि तुम्ही आरामात राहाल.
व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकवेळा आपण स्वतःला वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत स्वत:ला काही मिनिटे वेळ देणे आवश्यक आहे. हे तणाव टाळण्यास मदत करते. कामाच्या दरम्यान, प्रसन्नतेने काम करा. हलकेफुलके हास्यविनोद, थोड्या गप्पा यामुळे तणाव कमी होतो. सुट्टीच्या दिवशी मोबाईल फोन आणि लॅपटॉपपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
संपर्क माध्यमांपासून जर आपण थोडे लांब राहिलो तर सुरुवातीला थोडे अवघडल्यासारखे होते. आपल्यात अस्वस्थपणा निर्माण होतो. कारण आपले टच स्क्रीनच्या भोवती आयुष्य वेढलेले आहे. पण तुमच्या लक्षात येईल, की एक दोन तास जर मोबाईलचा संपर्क टाळला तर काही दिवसानंतर तुम्हाला अधिक प्रसन्न व तणावरहित वातावरण अनुभवायला मिळेल.
हसत-खेळत राहा, व्यक्त व्हा, मनात घुसमट निर्माण होऊ देऊ नका. तणावासारखी परिस्थिती खूप गंभीर असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांशी सुसंवाद वाढवा. अशा वेळी हीच माणसे खूप उपयोगी पडतात. तणाव कमी होण्यास मदत होते.
तसेच ताण कमी करण्यासाठी कामाचा प्राधान्यक्रम ठरवा, याचा खूप फायदा होईल. तणावाचे सर्वांत मूळ कारण आहे, एकमेकांना समजून न घेणे. आपण सांगतो काय? समोरचा समजतो काय? याचे आदान प्रदान व्यवस्थितरित्या होत नाही. म्हणूनच सर्वाधिक तणाव निर्माण होतो. (Latest Marathi News)
एक छोटसं उदाहरण आहे, ते आपण बघूया. तीन माणसे एका ठिकाणी काम करत होते. तिथे दुसरा व्यक्ती आला आणि त्याने पहिल्याला विचारले, "तू इथे काय करीत आहेस?" त्या माणसाने वर पहिले आणि म्हणाला, "तू आंधळा आहेस का? तुला दिसत नाही, मी दगड फोडतोय ते? ही व्यक्ती पुढच्या माणसाकडे गेली आणि विचारले, "तू इथे काय करीत आहेस?"
त्या माणसाने वर पाहिले आणि म्हणाला, "माझे पोट भरण्यासाठी काहीतरी करावे लागते, म्हणून मी इथे आलो आहे आणि त्यांनी मला जे काही करायला सांगितले ते करतो आहे. मला फक्त माझे पोट भरायचे आहे, एवढेच." तो तिसऱ्या माणसाकडे गेला आणि त्याने विचारले, "तू इथे काय करतोय?" तो माणूस मोठ्या आनंदाने उभा राहिला आणि म्हणाला, “मी येथे एक सुंदर मंदिर बांधत आहे!”
ते सर्व जण एकसारखेच काम करत होते, परंतु ते जे काही करत होते, त्यांच्या अनुभवांमध्ये जगाएवढे अंतर होते. प्रत्येक मनुष्य, त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी, ते जे काही करत आहेत. ते या तीन संदर्भांपैकी एखाद्यामध्ये काम करू शकतात आणि हेच एखाद्याच्या जीवनाची गुणवत्ता ठरवते, प्रत्यक्षात ती व्यक्ती काय काम करते, यामुळे नाही.
एखादे कार्य किती सोपे किंवा गुंतागुंतीचे आहे, याने तुमच्या जीवनाची गुणवत्ता बदलत नाही. तुम्ही ते कोणत्या संदर्भाने करता याने तुमच्या जीवनाची गुणवत्ता बदलते. जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता, तेव्हाची मनस्थिती चांगली असते. तेव्हा तुम्ही खूप काही करण्यासाठी तयार असता. मात्र, जेव्हा तुम्ही तणावात असता, तेव्हा तुम्हाला अगदी सोप्या गोष्टीही करण्याची इच्छा नसते.
आपल्याला सर्वांत पहिली आणि सर्वांत महत्वाची गोष्ट करण्याची गरज आहे, ती म्हणजे मनुष्याला शांत आणि आनंदी बनवणे. तुम्ही जर योग्य प्रकारचा योग केल्यास हे नक्कीच घडेल. कारण योग एक व्यक्तिनिष्ठ विज्ञान आहे, जर ते योग्य प्रकारे केले तर ते एका चमत्काराप्रमाणे कार्य करेल.
आपण आनंदी राहिलो तरच समाजामध्ये आनंद निर्माण होईल. मतभेद व मनभेद नष्ट होतील. एखादा व्यक्ती आपल्याला का आवडत नाही किंवा त्याचे विचार आपणास का पटत नाही, याचे मुख्य कारण म्हणजे तो आपल्या मनासारखा वागत नाही. यापलीकडे दुसरे काहीही कारण नाही. त्यामुळे आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असो. आपण समजून घेतले पाहिजे.
(लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.