Rajaram Pangavhane esakal
सप्तरंग

दृष्टिकोन : राजेशाही, हुकूमशाही अन् लोकशाही

Marathi Article : व्यक्ती समूहाने राहू लागला. एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्यांच्यातील एक व्यक्ती नेतृत्व करू लागला. तो भविष्यात त्या टोळीचा प्रमुख सरदार आणि कालांतराने राजा झाला.

सकाळ वृत्तसेवा

लेखक : राजाराम पानगव्हाणे

व्यक्ती समूहाने राहू लागला. एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्यांच्यातील एक व्यक्ती नेतृत्व करू लागला. तो भविष्यात त्या टोळीचा प्रमुख सरदार आणि कालांतराने राजा झाला. आपल्या राज्याचा विस्तार करणे, सर्व व्यवहार, सत्ता आपल्या नेतृत्वाखालीच असणे अशा प्रकारची विचारसरणी रुजू लागली.

मात्र कालांतराने राजेशाही नष्ट झाली आणि लोकशाही आली. तेव्हा जनतेतून निवडलेले प्रतिनिधी कारभार बघू लागले. लोकशाहीने आपल्याला जसे हक्क दिले तशी जबाबदारीची जाणीवही दिली. मात्र आजही आपण हक्क आणि जबाबदारी याबाबत फारसे संवेदनशील आहोत, असे चित्र दुर्दैवाने दिसत नाही. (Nashik saptarang marathi article on Monarchy Dictatorship and Democracy news)

मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांचा विचार केल्यास पूर्वी माणूस टोळीच्या स्वरूपात वास्तव्य करायचा. तेव्हा त्या टोळीला एक नायक किंवा सरदार असायचा. अर्थातच, जो माणूस मुख्यत्वे पुरुष सर्वांत सामर्थ्यवान, बुद्धिवान असायचा तो त्या टोळीचा नायक किंवा म्होरक्या किंवा सरदार व्हायचा. त्याची मर्जी म्हणजेच त्या टोळीतला कायदा असायचा.

टोळीचे नायकत्व किंवा सरदारकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायची. मात्र त्याच टोळीतून किंवा बाजूच्या टोळीतून आव्हान निर्माण झाल्यास संघर्ष व्हायचा आणि मग त्यात ज्याचा टिकाव लागेल त्याची टोळी म्हणजेच राज्य मोठे व्हायचे. ज्याचा पराभव व्हायचा, त्याचे राज्य नामशेष व्हायचे किंवा दुसऱ्याचे मांडलिकत्व पत्करावे लागायचे. अर्थातच, ‘बळी तो कान पिळी’ या तत्त्वावर ही व्यवस्था चालायची.

राजेशाहीत काळानुसार बदल

परंतु राजा ही सर्वोच्च सत्ता असल्यामुळे सरतेशेवटी राजा हाच सर्वांत श्रेष्ठ गणला जायचा. अर्थातच, त्या राजेशाहीच्या स्वरूपातही कालानुरूप बदल होत गेले. राजा या संकल्पनेचे अत्यंत प्राथमिक स्वरूप टोळीचा नायक या स्वरूपात बघितले तर फार वावगे ठरणार नाही. कारण संपूर्ण टोळीत याच नायकाची किंवा सरदाराची सत्ता असायची आणि त्याचाच कायदा चालायचा, जो लिखित स्वरूपात नसायचा.

परंतु एखाद्या टोळीच्या नायकापेक्षा राजेशाहीत काही व्यवस्थापन आणि प्रशासन वगैरे होते. हे व्यवस्थापन आणि प्रशासन सांभाळण्यास राजाला सहाय्यक म्हणून राजाला योग्य वाटतील अशा माणसांची नेमणूक व्हायची. ज्याला आपण आज मंत्री किंवा सचिव म्हणतो. आपल्या देशात शतकानुशतके राजेशाही व्यवस्थाच होती. राजेपद मिळण्यासाठी कोणतीही अधिकृत निवडणूक वगैरे नसायची.  (latest marathi news)

मात्र त्या समाजातील तत्कालीन संकल्पनेनुसार श्रेष्ठ आणि बलवान व्यक्ती ही नेता व्हायची. या व्यवस्थेत राजाचे स्थान हे मुख्यत्वे घराणेशाहीच्या पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे म्हणजेच बहुतांशी वडिलांकडून ज्येष्ठ मुलाकडे जायचे आणि ही परंपरा सुरू राहायची. अर्थात, या राज्यांत युद्धे व्हायची आणि तहसुद्धा व्हायचे आणि परिस्थितीनुरूप राज्याच्या सीमासुद्धा बदलायच्या.

राजेही हुकूमशहाचे

राजा हे एकप्रकारे हुकूमशहाच असायचे. मात्र जगातील सर्व हुकूमशहा हे राजे होते, असे म्हणणे मात्र चुकीचे होईल. इतिहासातला सर्वांत मोठा हुकूमशहा म्हणजे जर्मनीचा ॲडाल्फ हिटलर. निवडणुकीत सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून निवडून आले आणि जर्मनीचे चान्सलर आणि नंतर देशाचे अध्यक्ष झाले.

पाकिस्तानच्या जनरल मुशर्रफ यांनी लष्करी बंडाळी केली आणि लोकनियुक्त सरकार उलथून पाडले. त्यानंतर निवडणुका घेऊन ते निवडून आले आणि देशाचे अध्यक्ष झाले. हे त्या देशाचे राजे नव्हे तर हुकूमशहा होते. अर्थात प्रत्येक हुकूमशहाची वेगळी कहाणी आहे. लीबियाचे गद्दाफी हे हुकूमशहा होते, पण राजे नव्हते.

लोकशाहीचे मूल्य अनोखे

आता जुनी वाटत असली तरीही लोकशाही हा त्या मानाने सर्वांत नवीन व्यवस्था प्रकार म्हणावा लागेल. पाश्चिमात्य जगात ही व्यवस्था आधी रुळली असली तरी भारतात ती गेल्या शतकात आली. १९४७ पूर्वी भारतात संस्थाने होती; जी विलीन झाल्यामुळे आजचा भारत आपल्याला दिसत आहे. या व्यवस्थेत देशातले नागरिक हे आपले प्रतिनिधी निवडतात आणि हे प्रतिनिधी पूर्वनियोजित काळासाठी देशाचा/राज्याचा राज्यकारभार सांभाळतात. (latest marathi news)

अर्थातच, कालावधी संपल्यावर त्यांनाही पुन्हा निवडणुकीस सामोरे जावे लागते. अर्थातच, हे सर्व घडवून आणण्यासाठी आणि देशाचे एकंदरीत व्यवस्थापन करण्यासाठी एक सुनिश्चित विचार असतो आणि संमत केलेली राज्यघटना असते. सर्व कायदे हे लिखित स्वरूपात असतात आणि त्याची अंमलबजावणी करायला न्यायव्यवस्था असते.

व्यवस्थेचे फायदे तसे तोटेही...

कोणतीही व्यवस्था म्हटली, की त्याचे फायदे आणि तोटे आलेच. लोकांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम हासुद्धा त्याचाच एक भाग आहे. अमेरिकेतील सर्वसामान्य माणूस हा व्यक्तिस्वातंत्र्य मानतो आणि दुसऱ्याला देतो. स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. मात्र रशियाचे विघटन झाल्यावर रशियात सामान्य माणसाची परिस्थिती म्हणजे अगदी ‘जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखी’ झालेली होती.

याचे मुख्य कारण म्हणजे कोणतीही मानसिक तयारी नसताना अनपेक्षितपणे मिळालेले स्वातंत्र्य. त्या काळात रशियन लोकांची अवस्था ही खरंच फार दयनीय झाली होती. कारण अनेक पिढ्या त्यांच्या आयुष्यातील सर्व निर्णय हे जणू सरकारच घेत होते आणि अचानक त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व निर्णय घ्यायला लावल्यावर दुसरे काय होणार?

जबाबदारीची जाणीव कधी?

राजेशाहीत जोपर्यंत राजाच्या मर्जीच्या बाहेर नागरिक जात नाहीत तोपर्यंत सर्व ठीक आहे. परंतु राजाच्या मर्जीचे उल्लंघन झाल्यास त्याचे परिणाम काहीही व्हायचे. अगदी शिरच्छेदही. यामानाने स्थिर झालेल्या लोकशाहीतले नागरिक त्यामानाने जास्त परिपक्व असतात. त्यांना त्यांच्या हक्काची आणि जबाबदारीची जाणीव असते. भारतात स्थिर लोकशाही आहे.

मात्र जबाबदारीची जाणीव आणि हक्काबाबत पुरेशी जाणीव लोकांना आहे असे संपूर्ण चित्र मात्र दिसत नाही. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही अजून लोकांना शौचालयाचा वापर करा, रस्त्यावर थुंकू नका, वाहतुकीचा नियम पाळा वगैरे अगदी मूलभूत गोष्टीसुद्धा सांगाव्या लागतात. हे चित्र बदलायला पाहिजे. लोकांनी हक्कासह जबाबदारीची जाणीवही लक्षात घ्यायला हवी तरच लोकशाहीचे खरे मूल्य त्यांना समजेल.

(लेखक ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT