Social Media sakal
सप्तरंग

सोनेरी स्वप्नं : खरेपणा उजेडात आणणारी पार्टी

‘तुम्ही सोशल मीडियावर तर चिकने दिसता. प्रत्यक्षात तुमचं तोंड तर लय काळवंडलयं,’ बुलढाण्यातल्या छोट्याशा खेडेगावातून आलेला एकजण असं म्हणाला आणि खऱ्या अर्थानं माझं तोंड काळवंडलं.

नितीन थोरात

‘तुम्ही सोशल मीडियावर तर चिकने दिसता. प्रत्यक्षात तुमचं तोंड तर लय काळवंडलयं,’ बुलढाण्यातल्या छोट्याशा खेडेगावातून आलेला एकजण असं म्हणाला आणि खऱ्या अर्थानं माझं तोंड काळवंडलं.

‘तुम्ही सोशल मीडियावर तर चिकने दिसता. प्रत्यक्षात तुमचं तोंड तर लय काळवंडलयं,’ बुलढाण्यातल्या छोट्याशा खेडेगावातून आलेला एकजण असं म्हणाला आणि खऱ्या अर्थानं माझं तोंड काळवंडलं. सोशल मीडियासारख्या आभासी जगातल्या सर्वपक्षीय लोकांना एकत्र आणणाऱ्या ‘पार्टी ट्रस्ट’ नावाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. पुण्याजवळच्या जांभूळवाडी परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि महाराष्ट्रभरातले जवळपास दीड हजार अनोळखी लोक इथं एकत्र आले होते. ‘पार्टी ट्रस्ट’च्या आयोजकांनी लेखक या नात्यानं मला फुकटचं आमंत्रण दिलं होतं. फुकटात मटण खायला मिळणार आणि हजारो लोकांसमोर रुबाब झाडता येणार म्हणून मीही कसलीच भिडस्त न बाळगता तोऱ्यात हजर राहिलो.

तिथं गेल्यावर मात्र वास्तव आणि आभासी आयुष्यातला फरक जाणवू लागला. फेसबुकवर ओळखू येणारे लोक प्रत्यक्षात ओळखू येत नव्हते. फेसबुकवर तरुण वाटणारी पोरं प्रत्यक्षात म्हातारी वाटत होती. तर सोशल मीडियावर दिवसरात्र आया-बहिणीवरून शिव्या देणाऱ्या काडीपैलवानांची तब्येत पाहून त्यांची कीव येत होती. फेक अकांऊटवाले जेव्हा ओरिजनल नावं सांगत होती, तेव्हा धक्का बसत होता तर कुणी येऊन मी तुमचा फॅन आहे असं म्हणत होता तेव्हा सुखाचा गार वाराही भासत होता. सारं काही स्वप्नवत होतं. शंभरेक पोरांनी फोटो काढल्यामुळं नवरदेवाचा फिल येत होता. इतक्यात एकजण आला आणि बाजूला घेऊन बोलू लागला.

‘तुम्हाला प्रत्यक्षात बघून माझा मूडच गेला हो सर,’ त्याच्या या एकाच वाक्यानं माझं तोंड पडलं. तो पुढं बोलू लागला, ‘तुम्ही फेसबुकवर लय चिकने दिसता. प्रत्यक्षात तुमचा चेहरा पार काळवंडलाय. केस तर खरोखरच पिकल्यात. लय वय झाल्यासारखं वाटतयं तुमचं. आजवर मी तुम्हाला दादा म्हणायचो. पण, इथून पुढं आठवणीनं काका म्हणेल.’ निर्विकार चेहरा करून तो असं बोलला आणि खांद्यावर हात ठेवत त्यानं एक सेल्फी काढला. एवढंच कमी का काय, पुन्हा मोबाईलमधला फोटो दाखवत म्हणाला, ‘तुम्हीच बघा फोटोत किती छान दिसता आणि प्रत्यक्षात बघा कसं दिसता?’

त्याच्या प्रश्नावर काही उत्तर देणार तोच त्याला कुणीतरी आवाज दिला आणि तो निघून गेला. त्याचं बोलणं दीड हजारातल्या कुणीही ऐकलं नव्हतं याचा आनंद मनात दाबून ठेवला आणि पुन्हा हसतमुखानं गर्दीत घुसलो. सोशल मीडियावर जगताना हेच तर भान ठेवायचं असतं, कधी ना कधी बुरखा आपलाही फाटणार असतो, तोवर खरेपणा लपवून खोटेपणा जगासमोर मांडायचा असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT