Obesity sakal
सप्तरंग

शाळेतील ऊन-पाऊस

लठ्ठपणा आणी वाढते आजारपण हे आजकालच्या लहान मुलांमध्ये वाढणारी मोठी समस्या होत आहे. लहान वयामध्ये वाढणारे हॉर्मोन्सचे आजार ही आजच्या पालकांची चिंतेची बाब आहे.

अवतरण टीम

- डॉ. मंजुषा मोरे

लठ्ठपणा आणी वाढते आजारपण हे आजकालच्या लहान मुलांमध्ये वाढणारी मोठी समस्या होत आहे. लहान वयामध्ये वाढणारे हॉर्मोन्सचे आजार ही आजच्या पालकांची चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता पालक आणी शाळांमध्ये आहाराबद्दल जागरुकता वाढत आहे.

लठ्ठपणा आणी वाढते आजारपण हे आजकालच्या लहान मुलांमध्ये वाढणारी मोठी समस्या होत आहे. लहान वयामध्ये वाढणारे हॉर्मोन्सचे आजार ही आजच्या पालकांची चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता पालक आणी शाळांमध्ये आहाराबद्दल जागरुकता वाढत आहे.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (Indian council of Medical Research) यांनी सर्व वयांसाठी आहार भत्ता शिफारस केलेला आहे. यामध्ये रोजच्या आहारात किती उष्मांक, प्रथिने, जीवनसत्वे घ्यावी याचे भारतीय लोकांसाठी प्रमाण ठरवून दिले आहे. यानुसार हल्लीच्या शाळांमध्ये आहाराबद्दल जागरूकता वाढवण्यात येत आहे.

यामध्ये सांगितल्याप्रमाणे १० ते १५ वर्षांच्या मुलांसाठी २००० ते २५०० असा उष्मांकाचे आणि ५५ ते ६० ग्रॅम प्रथिनांचे प्रमाण आहे. पण हे प्रमाण प्रत्येक मुलामुलीमागे बदलू शकते. कारण प्रत्येकाचे वजन, उंची, वय, शारिरीक क्षमता इ. घटकामध्ये विविधता असते.

टि.व्ही., मोबाईल, आणि सहज उपलब्ध असलेल्या साधनांमुळे जंक फुड आणि फास्ट फुड खाण्याचे प्रमाण वाढते आहे. जाहिराती, सवलती आणि व्यस्त वेळापत्रक यामुळे रेडी टू इट पदार्थ, फास्ट फुड यांना जास्त पसंती दिली जाते.

जंक फुड हा असा पदार्थ आहे ज्यामध्ये भरपुर प्रमाणात साखर किंवा चरबी असते. यामध्ये आवश्‍यक जीवनसत्वे, प्रथिने आणि खनिजे यांसाखरे घटक अगदी सुक्ष्म प्रमाणात असतात. हल्ली बऱ्याच सुपरमार्केट, दुकानांमध्ये हे सहज प्रमाणात आढळते. तरुण पिढीचा फास्ट फुड व जंक फुडकडे जास्त भर असतो.

अशा पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे हॉर्मोनल बदल, कमी वयात लठ्ठपणा, छोटे छोटे आजार लवकर होण्याची वेळ येते. जास्त करून याचे वाईट परिणाम लवकर दिसत नाहीत; पण कालांतराने अतिसेवनाचे परिणाम भयानक असू शकतात.

फास्ट फुडमध्ये उच्च प्रमाणात कॅलरी (उष्मांक) व चरबीयुक्त पदार्थांचा समावेश असतो. यामध्ये पिझ्झा, बर्गर, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ इ.चा समावेश आहे. याच्या अतिसेवनामुळे लहान वयात हृदयविकर, मधुमेह, कोलेस्टेरॉल, दमा इ. आरोग्याच्या व्याधी उद्भवू शकतात. तरूण महिला व मुलींमध्ये यामुळे होर्मोनल बदल खुप प्रमाणात दिसू लागले आहेत. त्यामुळे पाळीच्या समस्या, मधुमेह, लठ्ठपणा वाढत चालला आहे. तरुण मुलांमध्ये वाढणारी पोटाची चरबी, वजनवाढ, चयापचय तक्रारी, हृदयरोग इ. आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत.

यासर्वांसाठी उपाय म्हणजे योग्य आहाराचे नियोजन व व्यायाम. बहुतेक सर्व फास्ट फुड आणि जंक फुड खाल्ल्याने वरील समस्या उद्भवतात. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी करणे व त्यासोबत योग्य आहार मार्गदर्शन घेणे हे आजच्या पिढीसाठी खुप महत्त्वाचे आहे. शाळांमध्ये याबद्दलची जागरूकता वाढत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पुढाकारामुळे आहारतज्ञांचे मार्गदर्शन व सांगितलेले उपाय तरुण पिढीसाठी उपायकारक ठरत आहेत. यासाठी आपणही काही बदल करू शकतो.

जंक फुडमध्ये पोषक तत्त्वांचा अभाव असतो. उच्च उष्मांक, जास्त चरबी, साखर प्रक्रिया केलेले असते. जंक फूडची काही उदाहरणे अशी आहेत :-

- केक आणि बिस्कीटे

- चिप्स, बर्गर, पिझ्झा.

- चॉकलेट, मिठाई

- प्रक्रिया केलेले मांस

- साखरयुक्त पेय

- मद्यपी पेय इ.

अशा सर्व पदार्थांमध्ये मैदा, बटर, साखर, तेल इ. पदार्थांचे प्रमाण खुप जास्त असते. असे पदार्थ सतत खाल्ल्यामुळे लठ्ठ‌पणा, भूक व पचनशक्ती कमी होणे, नैराश्य, अपुरी वाढ आणि अपचन, स्मरणशक्ती समस्या, मानसिक अस्थिरता याशिवाय मधुमेह, हृद‌यरोग, होर्मोन्सच्या समस्या इ. अनेक दुष्परिणाम जाणवू शकतात.

अशा खाण्यांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे वाढ खुंटणे, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती, सुस्ती येणे; शिवाय प्रक्रिया केलेले असल्यामुळे अनेक शारिरीक परीणामदेखील जाणवू शकतात उदा. चिंता, तणाव, आतड्यांचे त्रास, उदासिणपणा असे अनेक मानसिक, शारिरीक त्रासही वाढतात.

हल्ली लहान मुले व तरुण वर्ग या जंक फुडकडे जास्त आकर्शित होत आहेत. याचे कारण म्हणजे सहज उपलब्धता, स्वस्त दर, सतत दिसणारी प्रलोभने यामुळे जंक फुड हवेहवेसे वाटते. जंक फुड बनवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते, त्यामध्ये कृत्रिम रंग, चव बदलण्यासाठी प्लेवरिंग्ज असतात; शिवाय त्याच्या जाहिराती व स्वस्त दरामुळे ते सतत खावेसे वाटतात. लहानपणापासून, चॉकलेट, केक, बिस्किट, चिप्स असे पदार्थ सहजपणे किंवा सतत सणासमारंभाला मुलांना खायला दिले जातात. परिणामी त्यांना त्याची सवय होते व आवड निर्माण होते. नैसर्गिक जिवनसत्त्वे व त्याचे फायदे वडीलधाऱ्यांनाच माहित नसल्यामुळे मुलांना त्याची काही माहिती नसते. शिवाय धकाधकीच्या जीवनात घरामध्ये ताजे अन्न बनवून खाण्यापेक्षा सहज उपलब्ध असलेले अन्न सतत दिले जाते. उदा. चिप्स, शितपेय. त्यामुळे त्याचे अतिसेवन होऊन मुलांना लहान वयापासून व्याधी व आजार संभवतात. यासाठी पालकवर्गाने जागरूकता दाखवायला हवी. शाळेमध्ये व महाविद्यालयामध्ये निरोगी व योग्य आहार मार्गदर्शन व्हायला हवे.

निरोगी अन्नाची निवड करणेही महत्त्वाचे. यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे :-

- कोणतेही पॅकबंद पदार्थ खरेदी करताना त्यावरील पोषकतत्वे वाचणे (फूड लेबल्स)

- कमी फॅट, शुगर फ्री अशा दिशाभूल करणाऱ्या प्रलोभनांपासून दुरच राहणे.

- पास्ता, ब्रेड, मैदा यासारख्या पदार्थांसाठी गहु, बाजरी, ज्वारी अशी धान्ये पर्याय म्हणून निवडा.

- कमी चरबी, मीठ, साखर, बटर, डालडा, सॅचुरेटेड फॅट असे लिहीलेले पदार्थ जास्तीत जास्त टाळा.

नैसर्गिक फळे, भाज्या यावर जास्त भर द्यावा. प्रक्रिया केलेले फळांचे रस, त्यामध्ये साखर घालून बनवलेले पदार्थ टाळावेत.

सुकामेवा, मोड आलेली कडधान्ये, डाळी; शिवाय अंडी, मासे, चिकन अशा प्रथिनयुक्त पदार्थाच्या निरोगी पाककृती निवडाव्यात.

तंतुमय पदार्थ जसे की फळे, काकडी, गाजर, बीट अशा गोष्टींचे आकर्षक पदार्थ बनवावेत, जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळेल.

हंगामी ताजे पदार्थ बनवून द्या. मुलांना खरेदीपासून बनवण्यापर्यंतच्या सर्व कार्यात सहभागी करा व माहिती द्या; जेणेकरून त्यांना महत्त्व समजेल.

योग्य मार्गदर्शनाखाली नवीन नवीन शारिरीक व्यायाम शिकवा

जंकफुड सतत का खावेसे वाटते; अकर्षित का होतो?

- जंक फुड बनवताना त्यात वापरलेले कृत्रिम रंग, चव बदलण्यासाठी वापरलेली रसायने. यामुळे ते अधिक चविष्ट होतात.

या रसायनांमुळे ते पदार्थ खाल्ल्यानंतर मेंदू डोपामाइन नावाचे रसायन सोडते. डोपामाइन हा एक रासायनिक संदेशवाहक आहे. तो मेंदूच्या वेगवेगळ्या भागातील पेशींवर प्रभाव करतो.

- याचे काम आहे आपण काही आनंददायक केल्यानंतर चांगली भावना निर्माण करणे.

- जंक फुड खाण्यामुळे रासायनिक गर्दीमुळे मेंदू अधिक प्रमाणात डोपामाइन सोडतो. परिणामी त्या पदार्थाची / चवीचे व्यसन लागते. म्हणून आपण जंक फुडकडे जास्त आकर्षित होतो.

रोजच्या जीवनात हे छोटे बदलदेखील उपायकारक ठरू शकतात. रोज ३० ते ४० मि. योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा. जंक फुड व फास्ट फूडसाठी दर महिन्याला काटेकोरपणे कमी प्रमाणात व चांगल्या स्वच्छ ठिकाणी खाणे. आहारामध्ये ताजे घरगुती अन्नाचा उपयोग करणे, ज्यात मध्यम उष्मांक, जास्त प्रमाणात प्रथिने व जीवनसत्त्वांचा समावेश करणे फायद्याचे ठरू शकते. आहारतज्ञांकडून योग्य तो सल्ला घ्यावा. कारण प्रत्येक व्यक्तीसाठी लागणारी जीवनसत्त्वांची आवश्यकता वेगळी वेगळी असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT