ओमान  sakal
सप्तरंग

मनमोराचा पिसारा : ओमान

डोंगररांगांनी आणि नागमोडी रस्त्यांनी वेढलेलं मस्कत खूप सुंदर दिसत होतं. मुळात हे शहर वसलंय डोंगर पोखरून.

सकाळ वृत्तसेवा

-अनुजा बेंडखळे

हा कुठला देश? असं म्हणत म्हणत मी मस्कत या ओमानच्या राजधानीत प्रवेश केलासुद्धा. सुदैवाने वेळ सकाळची होती. विमानातून खाली दिसणारं मस्कत पाहिलं. डोंगररांगांनी आणि नागमोडी रस्त्यांनी वेढलेलं मस्कत खूप सुंदर दिसत होतं. मुळात हे शहर वसलंय डोंगर पोखरून. त्यामुळे मस्कतमध्ये कुठेही उभे राहिलात, तरी तुम्हाला डोंगर हा दिसणारच. तोही जवळून. अर्थात, हे डोंगर उघडे-बोडके असतात बरं का! मात्र पिवळसर, मातकट, जांभळट, हिरवट, लालसर अशा बऱ्याचशा शेडस् आपण एकेका डोंगरावर पाहतो आणि नकळत आपण यांच्या प्रेमात पडतो. संपूर्ण ओमानभर हे डोंगर आपल्या स्वागताला उभे असतात.

ओमान म्हणजे खजूर, उंट. बाहेरून आलेल्या सर्वांना ओमान देश आवडतो. कारण इथली स्वच्छता, उत्कृष्ट रस्ते, वाहतुकीची प्रचंड शिस्त. एकूण तेरा वर्षं आम्ही ओमानमध्ये राहिलो. माझे सासू-सासरे, आई-वडील येऊन राहून गेले. माझा मुलगा काही वर्षं इथं शिकला. आम्हाला आवडलंच ओमान.

मुळात ओमानी लोक कुटुंबवत्सल आणि मदत करणारे. रस्त्यात कुणाच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला तर स्वतःची गाडी थांबवून ते मदत करतात. वयस्कर लोकांचा मान ठेवतात. जग कितीही आधुनिक झालं, तरी ओमानी लोकांना फरक पडत नाही. त्यांना उंचच उंच टोलेजंग इमारतींचं जाळं नको आहे. त्यांना आपली घरं आणि पारंपरिक पद्धतच हवी आहे. म्हणून तर, गाडीने अवघ्या दोन तासांवर असलेल्या दुबईचा प्रभाव त्यांच्यावर नाही.

इथला ओमानी हलवा आणि बकलावा आपल्या जिभेवर एक अवीट ठसा उमटवतात. इथले स्वच्छ समुद्रकिनारे आपल्याला भुरळ पाडतात. माझ्या घरापासून गाडीने अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर समुद्र होता (ते सुख भारतात आल्यावर गेलं.). ओमानमध्ये आलेल्या जवळपास प्रत्येक भारतीयाला हा देश आवडतो.

इथला राजा सुलतान काबूस भारतात शिकला. त्यामुळे त्यांना भारताबद्दल विशेष प्रेम होतं. हा अत्यंत लोकप्रिय राजा बरं का. खूप वर्षं त्यांची सत्ता होती. ओमानचा अगदी कायापालट केला त्यांनी. आता या राजाचं निधन झालंय. पण त्यांचा एक किस्सा आहे. या राजाचे त्यावेळचे भारतातले एक शिक्षक होते शंकर दयाळ शर्मा.

शंकर दयाळ शर्मा पुढे राष्ट्रपती झाल्यावर जेव्हा ओमानला गेले तेव्हा, असं म्हणतात, की स्वतः सुलतान काबूस त्यांच्या स्वागताला गेले होते. खूप जंगी स्वागत झालं होतं शंकर दयाळ शर्मांचं. त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या होत्या. एकूणच, भारतीय माणसांबद्दल एक आपुलकी असते ओमानी लोकांना. ओमानच्या प्रगतीतही भारतीयांचा मोठा वाटा आहे. ओमानी लोक शांतताप्रिय आहेत. जगातला चौथा शांतताप्रिय देश आहे ओमान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT