Plastic Bags sakal
सप्तरंग

प्लास्टिक पिशव्यांचं स्लो पॉयझन!

जगभरात दर मिनिटाला एक दशलक्ष प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. प्लास्टिक पिशव्यांचं विघटन होत नाही, तरी आपण त्या वापरतो...

अवतरण टीम

- जुही चावला-मेहता

जगभरात दर मिनिटाला एक दशलक्ष प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. प्लास्टिक पिशव्यांचं विघटन होत नाही, तरी आपण त्या वापरतो... प्लास्टिक पिशव्यांचं स्लो पाॅयझन आपलं आयुष्य पोखरतंय...

मागील लेखात आपण प्लास्टिक बाटल्यांविषयी पाहिलं. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या आपल्या प्रत्येकाच्या घरात पसरलेल्या असतात. जिकडे-तिकडे त्यांचा पसारा असतो. गादीखाली, किचनच्या कपाटामध्ये, फ्रिजच्या साईडला, बाल्कनीमध्ये... जिथे विचार करणं शक्य असेल-नसेल तिथे त्यांचे वास्तव्य असते. दुकानातून सामान आणलं, बाजारातून भाजी आणली किंवा मॉलमधून कपडे आणले की त्या सर्व गोष्टी त्यातून आपल्या घरात प्रवेश करतात. तुम्हाला कल्पना आलीच असेल, की मी कशाबद्दल बोलते आहे... मी बोलते आहे, प्लास्टिक पिशव्यांबद्दल...

पूर्वी शहराबाहेर पडल्यावर हिरवीगार झाडी दिसायची; पण आता दिसतात ते प्लास्टिकच्या पिशव्यांचे डोंगर. शहरातील कचरा व्यवस्थापनात प्लास्टिक पिशव्यांची मुख्य समस्या आहे. ज्याचा त्रास रस्त्यावरील प्राण्यांना जास्त होतो. जगभरात दर मिनिटाला एक दशलक्ष प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. सतत साचत चाललेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्यामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचते.

प्लास्टिक पिशव्यांच्या समस्येमागे अनेक कारणं आहेत. जसं प्लास्टिक पिशव्यांमुळे दरवर्षी सुमारे एक लाख प्राणी मारले जातात. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेलं किंवा गरम केलेलं जेवण खाल्ल्याने अल्सर, दमा, लठ्ठपणा आणि काही कर्करोग उद्‍भवतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये काही रसायनं असतात, जी गरम झाल्यावर अन्नपदार्थांमध्ये मिसळतात.

प्लास्टिक पिशव्यांमध्ये न्यूरोटॉक्सिक, कार्सिनोजेनिक आणि हार्मोन-विघटनकारी रसायनांचा समावेश आहे. त्यामुळे जमीन, पाणी आणि वायुप्रदूषण वाढतं. प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे मलनिस्सारण वाहिनी तुंबते. लँडफिल साईट अर्थात डम्पिंग ग्राऊंडमधील प्लास्टिक पिशव्यांमधून निघणारी रसायनं जमीन प्रदूषित करतात. प्लास्टिक पिशव्या नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा आहे ज्याचं विघटन होऊ शकत नाही. परिणामी पर्यावरणात प्रदूषण होतं आणि त्याची मोठी किंमत मानवाबरोबरच प्राण्यांनाही चुकवावी लागते आहे.

आपण बातम्यांमध्ये वाचलं असेल किंवा व्हिडीओंमध्ये पाहिलं असेल, की अनेक देशांमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर शुल्क आकारलं जातं. त्याचं एकमेव कारण म्हणजे, प्लास्टिक पिशव्यांचं विघटन होण्यासाठी अनेक वर्षं लागतात. त्याशिवाय प्लास्टिकच्या पिशव्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यातील विषारी रसायनं जमिनीत मुरतात.

जर त्या जाळल्या तर त्यातून निघणारी विषारी रसायनं हवेत मिसळतात आणि वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरतात. प्लास्टिक पिशव्यांमध्ये असणाऱ्या कार्सिनोजेनिक घटकांमुळे कॅन्सर होण्याची शक्यता उद्‍भवते. दररोज हजारो पिशव्या लँडफिल साईटमध्ये टाकल्या जातात. त्या कुजत असल्याने त्यातून मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड वायू अन् अत्यंत विषारी द्रव उत्सर्जित होतात, ज्याने जमीन प्रदूषित होते.

प्लास्टिक पिशव्यांमधून निघणाऱ्या कचऱ्यामुळे आपल्याला, प्राण्यांना आणि पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिक पिशव्यांमध्ये अडकून अनेक प्राणी मृत्युमुखी पडतात. बऱ्याचदा आपण शिळे अन्न प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून कचराकुंडीत टाकतो. प्राण्यांना अशा गोष्टीची जाणीव नसल्यामुळे ते अशा प्लास्टिक पिशव्याच अन्न म्हणून खातात.

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर काही व्हिडीओ पाहिले असतील... कासवाच्या नाकातून प्लास्टिक फोर्क काढणं, पक्ष्याच्या पोटातून प्लास्टिक तुकडे किंवा झाकण काढणं, माशांच्या पोटातून प्लास्टिक पिशव्या काढणं इत्यादींसारखे अनेक प्रकार आपण व्हिडीओत पाहिले असतील. अशा मुक्या प्राण्यांना होणाऱ्या वेदना पाहून आपल्याला त्रास होतो; पण त्यावर आपण उपाय म्हणून काय करतो? प्लास्टिक वापरणं बंद करतो का?

सागरी आणि गोड्या पाण्याच्या वातावरणात प्लास्टिक प्रदूषण म्हणजे अलीकडेच जागतिक समस्या म्हणून ओळखली गेली आहे. प्लास्टिक पिशव्यांमुळे केवळ सागरी जीवनालाच नव्हे; तर शेतजमिनीलाही धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिकचा कचरा प्रभावीपणे कमी करण्यासाठी त्याचा वापर कमी करण्याची गरज आहे. त्याचा अर्थ आपल्या दैनंदिन सवयींमध्ये बदल करणं एकमेव उपाय आहे. प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारं प्रदूषण आणि त्याच्या पर्यायांविषयी जागरूकता निर्माण करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो? तर...

  • बाहेर जाताना प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा

  • भाजीवाला-दुकानदाराकडून प्लास्टिक पिशव्या घेणं टाळा

  • गरज असल्यास कागदी पिशव्यांचा वापर करा

प्लास्टिक पिशव्या आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे; पण त्यावर काहीतरी पर्यायी मार्ग शोधणं गरजेचं आहे. प्लास्टिक प्रदूषणाचा पूर दिवसेंदिवस वाढत जातो आहे. मुकी जनावरं, जमीन, हवा, पाणी इत्यादी सर्वांवर त्याचा परिणाम तर होतो आहेच; पण तेच आता आपल्या शरीरातसुद्धा प्रवेश करायला लागलं आहे. त्याचा परिणाम आपल्या मुलांवरदेखील होतो आहे.

आपल्या दैनंदिन आयुष्यात काही बदल करून आपल्याला प्लास्टिक प्रदूषण काही प्रमाणात का होईना थांबवता येईल. तुम्हीदेखील प्लास्टिकला पर्याय म्हणून काय वापरता आणि तुमच्याकडे त्याबाबत अजून काही उपाय आहेत का, ते मला जरूर कळवा.

juhichawlaoffice@gmail.com

(शब्दांकन : नीलिमा बसाळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT