Prachi Gavaskar writes global indian share market American famous stock trader Jesse Livermore sakal
सप्तरंग

Share Market : शेअर बाजारातली शोकान्तिका

वॉल स्ट्रीटवरील बादशहा अशी ओळख असलेल्या अत्यंत बुद्धिमान अशा जेसी लिव्हरमोर यांनी लाखोंची संपत्ती कमावली.

सकाळ वृत्तसेवा

वॉल स्ट्रीटवरील बादशहा अशी ओळख असलेल्या अत्यंत बुद्धिमान अशा जेसी लिव्हरमोर यांनी लाखोंची संपत्ती कमावली.

- प्राची गावस्कर

शेअर बाजारातील आकडे गेल्या अनेक शतकांपासून अनेकांना भूरळ घालत आले आहेत. शेअर बाजारात योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर रावाचा रंक होऊ शकतो, मात्र निर्णय चुकले तर रावाचा रंक होण्यासही वेळ लागत नाही. याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.

गेल्या शतकातील अमेरिकेतील प्रसिद्ध शेअर ट्रेडर जेसी लिव्हरमोर हेदेखील असेच एक उदाहरण आहे. वॉल स्ट्रीटवरील बादशहा अशी ओळख असलेल्या अत्यंत बुद्धिमान अशा जेसी लिव्हरमोर यांनी लाखोंची संपत्ती कमावली. मात्र शेअर बाजारातील काही चुकीच्या निर्णयाची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली आणि अखेर त्यांनी आत्महत्या केली.

अशा या बुद्धिमान शेअर ट्रेडर आणि गुंतवणूकदाराची उत्कंठावर्धक जीवनकहाणी रिमिनिसन्स ऑफ ए स्टॉक ऑपरेटर अर्थात स्टॉक ऑपरेटरच्या आठवणी या मराठीतील अनुवादीत पुस्तकात वाचायला मिळते.

मूळ इंग्रजी पुस्तक रिमिनिसन्स ऑफ ए स्टॉक ऑपरेटर हे अमेरिकेतील अर्थविषयक पत्रकार, लेखक, राजकारणी एडविन लेफेव्हेरे यांनी लिहिले असून, याचा मराठी अनुवाद डॉ. कमलेश सोमण आणि जीवन आनंदगांवकर यांनी केला आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या लिव्हरमोर यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी शेअर बाजारात पैसे गुंतविण्यास सुरुवात केली.

शेअरच्या किमतीतील चढउतारांनी त्यांना भूरळ घातली आणि त्यांनी या आकड्यांचा सखोल अभ्यास करून शेअरची खरेदी विक्री करण्यास सुरुवात केली. स्वतःचे ठोकताळे बांधून शेअरची खरेदी विक्री करणाऱ्या लिव्हरमोर यांनी शेअरच्या किमती वाढवायच्या, घसरवायच्या यात हातोटी मिळवली होती. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शेअर बाजारात त्यांना कंपन्या किंवा स्थानिक दलाल व्यवहार करण्यास मनाई करत.

ज्या काळात कोणत्याही कंपनीच्या शेअरची सखोल आणि अचूक माहिती मिळणे अशक्य होते, त्या काळात त्यातील किमतींच्या चढउतारांचा अभ्यास करून लिव्हरमोर यांनी आपली एक प्रणाली तयार केली होती. त्याआधारावर त्यांनी न्यू यॉर्क गाठले आणि प्रसिद्ध वॉल स्ट्रीटवर ट्रेडिंग सुरू केले. तिथले अनुभवही विलक्षण आहेत.

त्याकाळच्या वातावरणात ते घेऊन जातात. एकदा तर तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी लिव्हरमोर यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करून शेअर बाजाराला अडचणीत न आणण्याविषयी विनंती केली होती. १९२९ मधील वॉल स्ट्रीट क्रॅश मध्ये त्यांनी एकाच दिवसात जवळजवळ १० कोटी डॉलरची कमाई केली होती.

जगातील सर्वांत श्रीमंतामध्ये स्थान मिळवणाऱ्या लिव्हरमोर यांना काही वेळा चुकीच्या निर्णयांमुळे सर्व संपत्तीही गमवावी लागली. दोनवेळा त्यांनी दिवाळखोरीचा सामना केला. एकदा ते त्यातूनही बाहेर पडले. दुसऱ्यावेळी मात्र ते शक्य झाले नाही आणि त्यातूनच वयाच्या त्रेसष्ठाव्या वर्षी त्यांनी १९४० मध्ये आत्महत्या केली.

त्यांच्या आयुष्यातील अनेक आर्थिक चढउतारांचा प्रवास मनोरंजक आणि नाट्यमय आहे. त्यांना अनुभवातून आलेले शहाणपण गुंतवणूकदारांसाठी उद्बोधक आहेत. गेल्या शतकातील अमेरिकेतील शेअर बाजाराचे स्वरुप,

तिथल्या कामकाजाची पद्धत, लिव्हरमोर यांच्या अभ्यासाची पद्धत, त्यांच्या चलाख खेळ्या वाचकांची उत्सुकता वाढवते. त्याकाळी शेअर बाजाराच्या व्यवहाराबाबत वापरले जाणारे बकेटशॉप, टिकरटेप, बुसेल असे शब्द जुन्या काळातील वातावरणाशी ओळख करून देतात.

शेअर मार्केटमधील शेअरच्या किंमती किती वेळात आणि कशा बदलतील, या विषयी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. तुमचा अंदाज कधी खरा ठरेल आणि कधी तो फसेल, हे ही कोणी सांगू शकणार नाही. खरेदी करण्याची एक (योग्य) वेळ असते, विक्री करण्याची देखील एक (योग्य) वेळ असते आणि काहीही न करण्याची देखील एक वेळ असते.

मार्केट कधीही चुकीचे नसते, मार्केटविषयीची मते मात्र अनेकदा चुकीची असतात. वाढणारे स्टॉक खरेदी करा आणि पडणारे स्टॉक विक्री करा, असे त्यांचे अनेक सल्ले या पुस्तकात उद्धृत केले आहेत. ते शेअर बाजारात उतरू इच्छिणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांना नक्कीच उपयुक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT